Breaking News

Pravin Gaikar

कामोठ्यात अंडरग्राऊंड केबल कार्यान्वित

भाजप नगरसेवक विकास घरत यांचे प्रयत्न कामोठे : रामप्रहर वृत्त – थोडासा पाऊस पडला किंवा वारा सुटला तरी देखील वीज गुल विजेच्या लपंडावामुळे कामोठ्यातीलरहिवासी त्रस्त झाले होते. या त्रासाचे मुख्य कारण म्हणजे जुनाट ओव्हर हेड केबल वायर हे लक्षात आल्यावर सोमवारी (दि. 24) प्रभाग क्र 13 चे भाजप नगरसेवक विकास …

Read More »

गणेश विसर्जनस्थळी भाजपतर्फे चोख व्यवस्था

उरण नगर परिषदेकडून सुविधा उरण : वार्ताहर – आपल्या लाडक्या बाप्पांनी भक्तांनी सेवा केल्यानंतर दीड  दिवसांच्या गणपतींना रविवारी (दि.23) भावपूर्ण निरोप देण्यात आला. या वेळी उरण नगर परिषद नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

सुधागडात आदिवासी सैनिकी प्रशिक्षण केंद्राची मागणी

पाली : प्रतिनिधी – शासनाच्या वतीने सुधागड तालुक्यात आदिवासी सैनिकी प्रशिक्षण केंद्र (फोर्स अकॅडमी) लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी रमेश पवार यांच्या नेतृत्वात पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना निवेदन देण्यात आले …

Read More »

अलिबाग-मुरूड मेडिकल असोसिएशन देणार सेवा

कोरोना रुग्णांच्या नि:शुल्क सेवेसाठी डॉक्टर सरसावले मुरूड : प्रतिनिधी – येथील डॉ. मयूर कल्याणी व त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील इतर सहकारी तसेच अलिबाग-मुरूड मेडिकल असोसिएशनमधील काही डॉक्टर्स अलिबाग व मुरूड या दोन तालुक्यांतील होम क्वारंटाइन व आयसोलेशनमधील कोरोना रुग्णांचे दैनंदिन अहवाल तपासणी व मार्गदर्शन करण्यासाठी नि:शुल्क सेवा देणार आहेत. होम आयसोलेटेड …

Read More »

मानिवलीतील शेतकर्यांची पुलाअभावी परवड

कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील मानिवली गावातील शेतकर्‍यांची पुलाअभावी पंचाईत झाली आहे. गावातील शेतकर्‍यांची 80 टक्के शेती नदीच्या पलीकडे असल्याने आणि पलीकडे जाण्यासाठी पूल नसल्याने शेतकर्‍यांना शेतीकडे जाण्यासाठी तब्बल सात-आठ किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत आहे. मानिवली गावातील शेतकर्‍यांची पोश्री नदीच्या पलीकडे म्हणजे पाषाणे, आर्डे आणि खाड्याचा पाडा भागात …

Read More »

श्रद्धा आणि सबुरी

गेल्या दहा दिवसांमध्ये मुंबई महानगर प्रदेशात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली दिसते. ठाणे शहरात रिकव्हरी रेट 89 टक्के इतका झाला असून उत्तम रिकव्हरी रेट असलेले ठाणे हे देशभरातील दुसर्‍या क्रमांकाचे शहर ठरले आहे. कल्याण-डोंबिवली, पालघर या भागांमध्ये गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत होते व तो आरोग्य यंत्रणांच्या चिंतेचा …

Read More »

ऐन सणासुदीतही विजेचा लपंडाव

मूर्तीकारांना घ्यावा लागतोय जनरेटरचा आधार चिरनेर : वार्ताहर – ऐन सणासुदीच्या म्हणजे गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येवून, ठेपला असून श्री गणरायाची मुर्ती घडविणारे मूर्तीकार सध्या रंगसंगतीच्या कामात गुंतले आहेत. त्यांना स्प्रेद्वारे शेडींगचे रंगकाम करतांना विजे विना मोठी समस्या निर्माण होत आहे. वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने येथील मूर्तीकारांना नाहक भाड्याच्या …

Read More »

स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

उरण : वार्ताहर – भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने नगर परिषद येथील सभागृहात रविवारी (दि. 16) अभिवादन करण्यात आले. या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, …

Read More »

टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी रक्तदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त – युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा सगळीकडेच आहे. तरीही मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी पुढे येत रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच भाजप उत्तर …

Read More »

पोलिसांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – बद्री केदार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि कळंबोली भाजप मंडळ उपाध्यक्ष दिलीप बिष्ट यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलीस ठाण्यात सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले. या वेळी पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड उपस्थित होते. या वेळी दिलीप बिष्ट यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटात पोलीस दल …

Read More »