Breaking News

Pravin Gaikar

उरणमध्ये 31 जणांची कोरोनावर मात

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 146  झाली होती. त्यातील 126 बरे आलेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे उरणकरांंच्या चिंतेत आणखीनच भर पडत चालली असतानाच सोमवारी (दि. 25) कोरोनाग्रस्त 51 रुग्णांपैकी 31 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. फक्त 20 कोरोना …

Read More »

राज्यात आमचे नाही तर शिवसेनेचे सरकार

पृथ्वीराज चव्हाण यांचे अजब वक्तव्य मुंबई : प्रतिनिधी – राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, मात्र माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असल्याने खळबळ माजली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीराज चव्हाण राज्यात शिवसेनेचे सरकार असल्याचे सांगत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही पृथ्वीराज …

Read More »

शिहू येथे एक जण कोरोनाबाधित

पाली : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्याला दिवसागणिक कोरोनाचा विळखा घट्ट बसत असताना शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव वेगाने होताना दिसतोय. नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील व शिहू ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या चोळेटेप गावातील 61 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शिहू विभागात खळबळ उडाली आहे. ही महिला विक्रोळी मुंबई येथून 16 मे …

Read More »

भाजप मुरूड तालुका, जिल्हा कार्यकारिणी नियुक्त्या जाहीर

मुरुड : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या आदेशानूसार पक्षाच्या ध्येयधोरणानूसार तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सन 2020 ते सन 2023 या तीन वर्षीय कालावधीकरीता तालुका व जिल्हा कार्यकारिणी नियुक्ती शिफारस करण्यात आली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचितांना नियुक्ती पत्र घरपोच देण्यात येणार असल्याची माहिती …

Read More »

रायगडातील आठ एसटी आगारांमधून होणार मालवाहतूक

अलिबाग : प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या बसमधून मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसर आता एसटीच्या आगरांमधून मालवाहतूक करण्यात येणार आहे. रायगड विभागातील एसटीच्या आठ आगार व 13 बसस्थानकांमधून मालवाहतूक केली जाणार आहे. कोविड-19च्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण भारतात टाळेबंदी करण्यात आली. त्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागला …

Read More »

पनवेल महसूल खात्याचे शिलेदार नव्हे देवदूत

पनवेल : प्रतिनिधी – नैसर्गिक आपत्ती आली की महसूल कर्मचारी शासनाचे प्रतिनिधी नुकसानीच्या पंचनाम्यापासून मदत वाटण्यापर्यंतची  काम करीत असतात. या वाटपात झालेल्या गोंधळाच्या कहाण्या आपण नंतर अनेक दिवस ऐकत असतो पण याला काही अपवाद ही असतात. पनवेलचे मंडळ अधिकारी संदीप रोडे, करंजाडेचे तेलंगे अण्णा, तलाठी राठोड ही त्याची उदाहरण म्हणता …

Read More »

कोरोनाच्या संकटामुळे घरातच ईद साजरी

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई रमजानचा महिना मुस्लिम धर्मियांचा सर्वात पवित्र महिना समजला जातो. तर महिनाभरच्या रोजा केल्यावर व चंद्र दिसल्यावर जगभरात ईद साजरी केली जाते. मात्र सध्या कोविडमुळे संपूर्ण जग थांबलेले आहे. वर्षभर ईदची वाट पाहणार्‍या नवी मुंबईतील मुस्लिम बांधवांनी मात्र काहीशा अनुत्साहाने घरात राहून ईद साजरी …

Read More »

नवी मुंबईत सोसायट्यांमध्ये येणार्यांची माहिती पालिकेला द्यावी लागणार

नवी मुंबई : बातमीदार – कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने सोसायटीमध्ये बाहेरगांवाहून आलेल्या व्यक्तींची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेस त्वरित कळवावी लागणार आहे. कोविड विषाणूचा प्रसार नवी मुंबईत वाढत चालला आहे. त्यात छुप्या पद्धतीने मुंबईतून नवी मुंबईत येणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. कोविडचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच संसर्ग वाढवणारी साखळी तोडण्यासाठी पालिकेने कडक …

Read More »

कंटेन्मेंट झोन वगळून नियमानूसार रिक्षा, टॅक्सी सुरु करण्यात यावी

भाजप नेते निर्णुण कवळे यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – कंटेन्मेंट झोन वगळता सुरक्षित पडदा अंतर कीट लाऊन तत्काळ रिक्षा व टॅक्सी सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतुक संघटनेचे उपाध्यक्ष निर्गुण रमेश कवळे यांनी केली आहे. या संदर्भात कवळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना …

Read More »

नवी मुंबई पालिकेतील कामगारांना एक कोटी रुपयांचा विमा सुरू करा

माजी खासदार संजीव नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत सर्व कंत्राटी व कायम कामगार कर्मचारी अधिकारी रात्रंदिवस आपल्या जीवाचा धोका पत्करून कोरोना महामारी विरोधात लढत आहेत. त्यांच्या अधक प्रयत्नामुळे नवी मुंबई महानगरपालिका भागातील जनतेस या महामारी परिस्थितीत देखील नागरी सुविधा सक्षम रित्या पुरविण्यात …

Read More »