उरण तालुक्यातील चिरनेर हे छोटेसे गाव श्री क्षेत्र महागणपती आणि 1930 साली झालेला जंगल सत्याग्रह या दोन गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे. श्री क्षेत्र महागणपती हे चिरनेर गावाचे ग्रामदैवत. चिरनेर गावात महागणपतीचे पूर्वाभिमुखी मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप गेल्या काही वर्षात बांधलेला असला, तरी गर्भगृह आपले जुनेपण टिकवून आहे. गर्भगृहात असलेली गणपतीची मूर्ती …
Read More »सामान्यांसाठी आरोग्य सुविधा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीतून व सततच्या पाठपुराव्यातून अशा रीतीने साकारलेले 100 खाटांचे पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि 20 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर यांचा लोकार्पण सोहळा बुधवारी पार पडला. कुटुंबातील एखादी जरी व्यक्ती आजारी असेल आणि तिला सातत्यपूर्ण आरोग्यसेवेची गरज भासत असेल, तर अवघ्या घराच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. …
Read More »भाजपतर्फे पनवेल, उरण मतदारसंघांमध्ये विकासकामांचा धूमधडाका
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षातर्फे अविरतपणे विकास सुरू असून, पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघांमध्ये रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला आला. ही सर्व कामे सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »वर्ल्ड थ्रो बॉलमध्ये ओमकार बोबडेचे सुयश
कामोठे : रामप्रहर वृत्त येथील ओमकार राजेंद्र बोबडे व भारतीय संघाने वर्ल्ड थ्रो बॉल चॅम्पियनशिप, क्वालालंपूर मलेशिया इथे 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधित झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करीत सुवर्ण पदक जिंकले. या कामगिरीमुळे ओमकारची डिसेंबरमध्ये अमेरिकेत होणार्या स्पर्धेत निवड झाली आहे. ओमकार व पूर्ण भारतीय संघावर या कामगिरीबद्दल …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण
कळंबोली ः रामप्रहर वृत्त कळंबोली भाजपच्या वतीने पर्यावरणाचे संवर्धन व प्रदूषणावर मात, हा संदेश देताना आमदार प्रशांत ठाकूर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन भाजपचे कळंबोली शहर उपाध्यक्ष व समाजसेवक नितीन काळे व भाजप कळंबोली शहर उपाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते. हे स्पर्धेचे दुसरे वर्षे असून या स्पर्धेत श्रींची आकर्षक …
Read More »ओरायन मॉलमधील मोदक स्पर्धेत महिलांसह पुरुषांचा सहभाग
पनवेल ः वार्ताहर नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणार्या पनवेलमधील ओरायन मॉलमध्ये पारंपरिक मोदक स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या स्पर्धेत 55 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यात महिलांसह पुरुषांनी सुद्धा सहभाग घेतल्याने त्यांचे आयोजकांतर्फे कौतुक करण्यात आले. या स्पर्धेत उपस्थित स्पर्धकांनी उकडीच्या मोदकासह काजू मोदक, चॉकलेट …
Read More »कष्टाला पर्याय नाही ः आमदार प्रशांत ठाकूर
एकविरा मित्र मंडळाच्या वतीने सत्कार सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा, मेहनत घ्यावी, मन लावून अभ्यास करावा, कष्टाला पर्याय नाही, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहोळ्यात ते बोलत होते. एकविरा युवक मित्र मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे, असेही गौरवोद्गार त्यांनी …
Read More »पुराने कोलमडलेली शेती अर्थव्यवस्था सावरायला हवी
गेल्या काही दिवसांपासून पाऊस बरसत आहे. 15 दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रावर पुराचे संकट कोसळले. सारे होत्याचे नव्हते झाले. अनेकांचा संसार वाहून गेला. काही ठिकाणी माणसेही वाहून गेली. पुरामुळे शेतीला मोठा फ टका बसला. पश्चिम महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. मुसळधार पावसामुळे पूर आला व शेती आणि त्यावर आधारित अर्थव्यवस्था वाहून गेली. …
Read More »धडाडीच्या निर्णयांचे 100 दिवस
मोदी यांचे सरकार राष्ट्रीय सुरक्षितता, विकास आणि गोरगरिबांचे कल्याण यांचे प्रतीक बनले आहे. देशाचा विकास, जनतेचे कल्याण आणि राष्ट्राची सुरक्षा याकरिता गरज भासेल ते सारे काही करण्यास हे सरकार कटिबद्ध आहे. आर्थिक आघाडीवर परिस्थिती काहिशी बिकट आहे. परंतु सरकारने ते कदापिही नाकारलेले नाही. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सरकार हालचाली करतेच …
Read More »भामरागडला पुराचा वेढा
तिघे वाहून गेले; 300 गावांचा संपर्क तुटला गडचिरोली ः प्रतिनिधी पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती, प्राणहिता, वैनगंगा या नद्यांना पूर आल्याने भामरागडला मोठा फटका बसला आहे. 70 टक्के गाव पाण्याखाली आले आहे. सहाशेवर गावकर्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे 20 प्रमुख मार्गांवरील पूल पाण्याखाली आल्याने सुमारे 300 गावांचा दोन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper