महाड : प्रतिनिधी – शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत महाड जवळील चांभारखिंड डोंगरावर सामाजिक वनीकरण आणि चांभारखिंड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. महाड शहराला लागुनच चांभारखिंड गाव आहे. या गावालगत असलेला डोंगर झाडांविना बोडका आहे. यामुळे सामाजिक वनीकरण आणि चांभारखिंड ग्रामपंचायत यांच्या वतीने …
Read More »केएमसी महाविद्यालयाकडून जनजागृती
खोपोली : प्रतिनिधी – वृक्ष लागवड आणि संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी खोपोलीतील केएमसी महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा व शहरात रॅली काढण्यात आली होती. वृक्ष लागवड मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांनीही सहभागी होऊन पुढाकार घ्यावा तसेच लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन व्हावे, यासाठी शनिवारी येथील केएमसी महाविद्यालयात पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी …
Read More »कर्जतच्या वंजारवाडी येथे वृक्षारोपण
कडाव : प्रतिनिधी – 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत कर्जत वंजारवाडीमधील संरक्षित वन क्षेत्रात विभागिय वनाधिकारी मनिष कुमार, ठाणे दक्षका पथकाचे सस्ते, पनवेल उपविभागीय वनाधिकारी एन. एम. कुप्ते यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. दिडशेहून अधिक ग्रामस्थांसह सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनीही यावेळी वृक्षारोपण केले. 30 ऑगष्टपर्यंत सुरु राहणार्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत …
Read More »खोपोलीत तळ्यातून जलपर्णी, शेवाळ काढले
पालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमेसाठी निधी खोपोली : प्रतिनिधी – वरची खोपोली येथील विरेश्वर मंडळ व ग्रामस्थांनी शंकर मंदिर परिसरातील विरेश्वर तळ्यातील धोकादायक जलपर्णी व शेवाळ काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. मागील दहा दिवस दररोज एक ट्रॉली या प्रमाणे दहा ट्रॉली शेवाळ व जलपर्णी येथील ग्रामस्थांनी तळ्यातून बाहेर काढली. वास्तविक हे …
Read More »कर्जतमध्ये एसटी कर्मचार्यांचा प्रमाणिकपणा
कडाव : प्रतिनिधी – कर्जत तालुक्यातील पोटल येथील किसन बबन आगज रविवार (दि. 7) सकाळी जांमरुंग-कर्जत एसटी बसने प्रवास करताना त्यांच्या खिशातील पैशांचे पाकिट बसमध्येच पडले होते. एसटी बसचे वाहक दशरथ भोगरे व चालक ए. एस. गायकवाड या कर्मचार्यांना कर्जत आगारात बस गेल्यानंतर ते पाकीट आढळले. त्यांनी ते पाकिट बस …
Read More »रोह्यात कुंडलिका नदीला पूर
रोहे ः प्रतिनिधी – तालुक्यात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावून सोमवारीही जोर कायम ठेवल्याने सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. रोह्याची जीवन वाहिनी कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहू लागली असून, पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या वतीने कुंडलिका नदीच्या काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर रोह्यात …
Read More »सडवलीच्या आदिवासी वस्तीशाळेला दरडीचा धोका
पोलादपूर तालुक्यात 40 शाळा इमारतींची दुरवस्था पोलादपूर : शैलेश पालकर – तालुक्यातील सडवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वस्तीशाळा गेल्या आठवड्यापासून दरडीच्या भयाखाली असून मुख्याध्यापिका यांनी पोलादपूर पंचायत समितीला याबाबतचे लेखी पत्र देऊनही या घटनेचे गांभिर्य अद्याप प्रशासनाला उमगले नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पोलादपूर तालुक्यातील 40 शाळा इमारतींची तातडीने दुरूस्ती तर …
Read More »पावसामुळे रायगडातील जनजीवन विस्कळीत
अलिबाग : प्रतिनिधी – गेले काही दिवस संततधार पडणार्या पावसाने रविवारी रात्रीपासून जोरदार बरसत रायगड जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये पाणी शिरून नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. काही ठिकाणी सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसानही झाले आहे. दरम्यान, संबंधित ठिकाणचे प्रशासन …
Read More »पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू, कुलसचिवांसह पाच जणांविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
पुणे : प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्यासह पाच जणांविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यान्वये (अॅट्रोसिटी) चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. करमळकर, प्रफुल्ल पवार यांच्यासह सिनेट सदस्य संजय चाकणे, सुरक्षा संचालक …
Read More »महिला मोर्चा संयोजकपदी अश्विनीताई पाटील
खोपोली : प्रतिनिधी – कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघासाठी भाजप महिला मोर्चा संयोजकपदी रायगड जिल्हा उपाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल अश्विनीताई पाटील यांचा खोपोली शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षाच्या बैठकीत कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघांचे भाजप अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper