Breaking News

Pravin Gaikar

एनडीएच्या विजयाचा बिगुल

बहुमतासाठीचा 272 जागांचा पल्ला एनडीए पार करील असे यापैकी बहुसंख्य चाचण्यांमधून सुचवण्यात आले आहे. निवडणुकांच्या निकालांनंतर दिल्लीत अस्थिरता निर्माण होईल असे गृहित धरून चंद्राबाबू नायडूंनी विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या दृष्टीने नुकत्याच शरद पवार, राहुल गांधी यांच्या भेटी घेतल्या आहेत. मायावती, अखिलेश यादव यांनाही ते भेटले. परंतु भाजपप्रणित एनडीएला 275 ते …

Read More »

नगर परिषद आज साजरा करणार माथेरानचा वाढदिवस

कर्जत : बातमीदार : पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचा वाढदिवस मंगळवारी (दि. 21) नगर परिषदेतर्फे साजरा होणार आहे. पर्यटकांना या वाढदिवसाचे साक्षीदार होण्याचा मान मिळणार आहे. ठाण्याचे तत्कालीन इंग्रज कलेक्टर एच. पी. मॅलेट यांनी 21 मे 1850 रोजी माथेरानचा शोध लावला होता. त्यास 169 वर्षे होत असून, हा वाढदिवस नगर …

Read More »

आगरकोट किल्ल्याला उर्जितावस्था

सह्याद्री प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम; 34 तोफा दगडी चौथर्‍यांवर अलिबाग, रेवदंडा : प्रतिनिधी : दुर्गसंवर्धनाचा वसा घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने रेवदंडायेथील आगरकोट किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या तोफांना उर्जितावस्था प्राप्त करून दिली आहे. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत तेथील तोफा व्यवस्थित रचून ठेवल्या. संस्थेच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून रेवदंडा येथील आगरकोट …

Read More »

कर्जत नगरपालिकेच्या कर वसुलीला वेग

कर्जत : बातमीदार : कर वसुली करण्यासाठी कर्जत नगर परिषद प्रशासनाने नियोजनबद्ध प्रयत्न सुरु केले असून, त्यामुळे सुमारे 90टक्क्यांपर्यंत कर वसुली झाली आहे. त्यात प्राधान्याने पाणीपट्टी आणि घरपट्टीचा समावेश आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षीची कर वसुली जास्त असल्याने नगर परिषद पदाधिकारी आणि प्रशासनाचे कौतुक होत आहे. यावर्षी कर्जत नगर …

Read More »

माथेरानचे रेल्वे प्रतिक्षालय अजूनही बंद

कर्जत : बातमीदार : नॅरोगेजवर चालणारी माथेरानची मिनिट्रेन कात टाकत आहे.गेल्या दीड वर्षांमध्ये मध्य रेल्वेने तब्बल 7 इंजिन नेरळ लोकोच्या ताफ्यात आणली आहेत. तसेच वेगवेगळ्या सुधारणाही केल्या आहेत, यामध्ये अमनलॉज स्टेशनवर प्रतिक्षालय बांधले आहे. मात्र गेल्या सात महिन्यापासून हे प्रतिक्षालय बंद असल्याने पर्यटकांना याचा त्रास होत आहे. 1 मे व …

Read More »

पोलादपूर तालुक्याची तहान भागणार

29 बोअरवेलची मंजूरी; कुडपण खुर्दचीही मागणी पोलादपूर : प्रतिनिधी : तालुक्याच्या पाणी पुरवठा कृती आराखड्यात मागणी केल्या पैकी 29 बोअरवेलना मंजूरी प्राप्त झाली आहे. संबंधीत ग्रामपंचायतीकडे  बोअरवेलसाठी निधी वर्ग करण्यात आला असून, पंचायत समितीचे शाखा अभियंता या कामी सर्व सोपस्कार पूर्ण करणार असल्याने बोअरवेल कागदोपत्री करण्याचे प्रकार थांबण्याची चिन्हे दिसत …

Read More »

विधात्या… तू इतका कठोर का झालास?

विधात्या… तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसर्‍या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस, पण मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणाकरा, आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? दृष्टिहीन जन्मदात्या पित्याला सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी सोडून देत मुलगा …

Read More »

चहा ‘तो’ की ‘ती’?

‘तो’ चहा की ‘ती’ चहा, हा प्रश्न तसा माझ्या मनात नेहेमीच उभा असतो. अगदी ‘टू बी ऑर नॉट टू बी’च्या धर्तीवर. कुणाला विचारावं, तर काय वेड लागलंय का माणसाला, अशा पद्धतीने बघण्याची भिती.  पण धीर करुन काही दिवसांपूर्वी मी तो फेसबुकवरच्या माझ्या मित्रांना विचारायचं ठरवलं आणि लगेच विचारलाही. आणि त्या …

Read More »

सकारात्मक मानसिकतेवर भर

लोकसभा 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या सातपैकी सहा टप्प्यांचे मतदान आटोपले असून एकूण परिणाम घोषित होण्यास काही दिवसांचाच अवधी आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप विरुद्ध इतर जवळजवळ सर्व पक्ष असे हे विषम युद्ध आहे. भाजप सत्तेवर येणारच असेल तर मोदींऐवजी दुसरा कोणीतरी मऊ भाजपवाला पंतप्रधान व्हावा म्हणूंनही हितसंबंधी शक्तींकडून फासे टाकण्यास सुरवात …

Read More »

सरस्वती तंत्रनिकेतनमध्ये योग वासंतिक शिबिर

खारघर : रामप्रहर वृत्त  : येथील सरस्वती तंत्रनिकेतन महाविद्यालयात एक महिन्याचे योग वासंतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सुरोशे सर यांनी केले. शिबिराला मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सुरोशे सरांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाचे काय महत्त्व आहे हे सांगितले. ‘सुखी जीवनाचा …

Read More »