उरण ः प्रतिनिधी : उरण तालुक्यातील विजेचा लपंडाव व समस्यांचा पाढाच ग्रामस्थांनी वीज मंडळाच्या अधिकार्यांसमोर वाचला. यानंतर अधिकार्यांनी नेहमीच्या पद्धतीने लवकरच समस्या सोडवू, असे आश्वासन दिले. या वेळी उपस्थित ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला होता. उरण परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा मार्ग निघत नव्हता. दोन दिवसांपूर्वी …
Read More »पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी…
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, असे कवी सुरेश भट म्हणतात. हे खरे असल्याचा अनुभव आपल्याला पावलोपावली येत असतो. त्यामुळेच राज्यातील सीबीएससी आणि आयसीएसइसह सर्व परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक राहील याकरिता कायद्यात आवश्यक ते बदल करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधान परिषदेत …
Read More »मान्सूनच्या प्रतीक्षेने चिंता
प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पाण्याचे काहिसे उष्ण प्रवाह वाहतात, तेव्हा जी परिस्थिती उद्भवते, तिला एल निनो असे संबोधले जाते. गेल्या वर्षी 9 जूनला मुंबईत मान्सून अवतरला. 2009 खालोखाल मान्सूनला दुसर्या क्रमांकाचा विलंब 2016 साली झाला होता. त्या वर्षी मुंबईत 20 जून रोजी मान्सूनने हजेरी लावली होती. तेव्हाचाही विलंब एल निनोमुळेच …
Read More »रावे सरपंचपदी संध्या पाटील यांचा दणदणीत विजय
भाजपचा झेंडा फडकला; माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा करिष्मा पेण : प्रतिनिधी : तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या रावे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंचपदी भाजप शिवसेना युतीच्या संध्या नाषिकेत पाटील यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या रेखा जनार्दन पाटील यांचा 800 मतांनी पराभव केला. रावे …
Read More »रुपडे बदलले, समस्या तशाच
कोकणात अशक्य वाटणार्या दर्याखोर्यातून कोकण रेल्वे धावली. कोकण विकासाला गती यातून काही प्रमाणात मिळाली, पण कोकण रेल्वेचा म्हणावा तसा उपयोग कोकणी माणसाला झाला नाही. कोकण रेल्वेमार्गावरून केरळ व अन्य ठिकाणी जाणार्या गाड्या या मार्गावरून अधिक धावतात. कोकणातील प्रवाशाांकडून गाड्यांची मागणी केली जाते, पण त्या सुरू केल्या जात नाहीत. आता कोकण …
Read More »टँकरचे पाणी पुढे पोहचलेच नाही
कर्जत तालुका पाणीटंचाईग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो आणि या तालुक्यात किमान 50-70 गावे आणि वाड्या या दरवर्षी पाणीटंचाईग्रस्त असतात. त्यांना टँकरने पाणीपुरवठादेखील केला जातो, मात्र सर्व पाणीटंचाईग्रस्त गावे-वाड्यांना पाणी पोहचत नाही. तीच स्थिती यावर्षीही असून तालुक्यातील 84 गावे-वाड्या पाणीटंचाईग्रस्त असताना केवळ 21 गावे-वाड्यांत शासनाचे टँकर पोहचत आहेत. त्यामुळे शासनाची पाणीटंचाई …
Read More »मधुमेहाचा वाढता विळखा
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत वयाची चाळिशी उलटल्यानंतरच हा आजार आढळून येत असे. परंतु आता मात्र विशीतील तरुणांमध्ये देखील मधुमेह आढळतो. बायपासची शस्त्रक्रिया करणे भाग पडणार्या सुमारे 60 टक्के रुग्णांमध्ये त्याच्या मुळाशी डायबिटिस हे कारण असते. महानगरांमध्ये तर 60 च्या पुढे वय असणार्यांपैकी 40 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये मधुमेह आढळतो. रक्तातील साखरेचे सरासरी …
Read More »कलादर्पण प्रस्तुत शब्दधन संस्थेचे काव्यसंमेलन
पनवेल : बातमीदार : ‘कलादर्पण’ प्रस्तुत शब्दधन संस्थेच्या वतीने नवीन पनवेल येथे एका काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल येथील उद्योजक गिरिश समुुुुद्र यांच्या सौजन्याने हे संमेलन झाले. प्रसिद्ध साहित्यिक शंकर आपटे संमोलनाच्या अध्यक्षस्थानी होते. या संमेलनाला मधुमेहतज्ज्ञ डॉ. कीर्ती समुद्र, प्रसिद्ध दिग्दर्शक मोहन हिन्दुपूर, कवयित्री संगीता देशपांडे, गायिका पद्मजा …
Read More »आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिर
पनवेल : वार्ताहर : संपूर्ण जगभरात साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान व केएलई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कळंबोली येथील केएलई महाविद्यालयामध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये योगाचे महत्त्व, योगासनांच्या प्रकारांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली व उपस्थित प्रशिक्षणार्थींनी स्वतः आसनांचे प्रकार करून सराव केला. …
Read More »सीकेटी इंग्रजी माध्यमाचा योग दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त : येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या वतीने शुक्रवारी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी योग शिक्षिका रश्मी रामगरीया यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रामगरीया यांचा सत्कार इंग्लिश मीडियम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper