वाशी पोलिसांना भाजपकडून निवेदन नवी मुंबई : बातमीदार वाशी परिसरातील विविध भागात मोठ्या प्रमाणत चोर्या होत आहेत. विशेष म्हणजे यातील काही ठिकाणी महत्त्वाची कार्यालये, वास्तू, मोठ्या गृह निर्माण सोसायट्या आहेत. त्यावर प्रतिबंध आणावा. यासाठी भाजपाच्या माजी नगरसेविका अंजली वाळूंज यांनी वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडे निवेदन देऊन केली आहे. …
Read More »तळोजा एमआयडीसीत औद्योगिक प्रदर्शन
मंत्री उदय सामंत, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार उद्घाटन पनवेल : वार्ताहर तळोजा एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांसाठी तळोजा एमआयडीसी एक्सपो 2023 नावाचा फेंडर डेव्हलपमेंट कम औद्योगिक प्रदर्शन कार्यक्रम प्रथमच 24 व 25 जानेवारी रोजी तळोजा एमआयडीसी कार्यालयासमोर आयोजित आल्याची महिती तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. …
Read More »पनवेलच्या सीएला अडकविण्यासाठी सिनेमास्टाईलने केलेला प्रयत्न फसला
पनवेल : वार्ताहर पनवेलच्या एका सनदी लेखापालाला बेकायदेशीर अग्निशस्त्र खरेदी करण्याच्या प्रकरणात अडविण्याचा सिनेमा स्टाईल प्रयत्न फसला. फसवणूक प्रकरणात सनदी लेखापालाने कार्यालयात 22 वर्षे काम करणार्या कर्मचार्याला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकविल्याचा राग मनात धरून या वादग्रस्त कर्मचार्यानेच सनदी लेखापालाला अडकविण्याचा प्रयत्न केला. बेंगलोरमधील कब्बन पार्क पोलीस ठाण्यात दाखल या घटनेचा …
Read More »अंगारकीनिमित्त पालीत भक्तांची मांदियाळी
व्यापार, व्यवसायाला मिळाली मोठी उभारी पाली ः प्रतिनिधी नववर्षातील पहिल्या व शेवटच्या अंगारक संकष्टी चतुर्थीला मंगळवारी (दि. 10) अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र पाली नगरीत भाविकांनी दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती. पहाटेपासून बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. या वेळी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत होता. रायगड जिल्ह्यासह राज्यातून हजारोंच्या संख्येने दाखल झाले …
Read More »गाड्यांची जाळपोळ करणारा माथेफिरू अटकेत
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात सात वाहनांची जाळफळ करणार्या माथेफिरूला अखेर पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. धर्मेंद्र गोळे असे या आरोपीचे नाव असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याने लावलेल्या आगीत ट्रॅक्टर, दुचाकी, आणि रिक्षा जळाली आहे. पनवेल शहरातील नंदनवन कॉम्प्लेक्स येथील सप्तगिरी बार समोर उभी ठेवलेली दोन …
Read More »भिंगारी येथे शॉटसर्किट मुळे कारला आग
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील भिंगरी येथील एचपी पेट्रोलपंपा जवळ एका महिंद्रा एक्सव्ही गाडीला शॉटसर्किट मुळे अचानकपणे आग लागल्याची घटना आज दुपारी एक वाजल्याच्या सुमारास घडली आहे. पळस्पे बाजूकडून पनवेल बाजूकडे जाणार्या रस्तावरुन सिल्वर रंगाची महिंद्रा एक्सव्ही गाडी नंबर एमएच 04 एफएफ 9329 घेऊन दोघेजण येत असताना अचानकपणे गाडीच्या बोनेट …
Read More »ओल्ड पनवेल नाही, तर पनवेल!
मिडल क्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाचे आवाहन; दिशादर्शकाला फासले काळे पनवेल : रामप्रहर वृत्त ओल्ड पनवेल असे लिहिलेल्या दिशादर्शकाला मिडल क्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने तसेच पनवेल शहरावर प्रेम करणार्या तरुणांनी काळे फासले, तसेच पनवेलच्या अस्मितेवर अन्यायाविरुद्ध आम्ही आवाज उठवू असा इशारा देण्यात आला. पनवेल शहराला ऐतिहासिक वारसा आहे. …
Read More »नवी मुंबईत प्रथमच सन थीम गार्डन
सीवूड येथील महात्मा ज्योतिबा फुले उद्यानाचे लोकार्पण नवी मुंबई ः प्रतिनिधी नवीन वर्षांत सीवूड सेक्टर 40 येथे नवी मुंबईतील पहिले सन थीम गार्डन साकारण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले उद्यानाचे नव्याने नूतनीकरण करण्यात असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची माजी नगरसेविका स्वप्ना गावडे यांच्या विशेष प्रयत्नांतून हे आकर्षक उद्यान साकारण्यात आले आहे. …
Read More »सारसोळेमधील पाणीप्रश्न अखेर मार्गी
भाजपच्या प्रयत्नाने अतिरिक्त जलवाहिनी टाकण्याच्या कामास शुभारंभ नवी मुंबई ः प्रतिनिधी नेरूळ सेक्टर 6 सारसोळे गाव आणि गावठाण परिसरात कमी दाबाने होणार्या पाणीपुरवठ्याची समस्या दूर होण्यासाठी पाम बिच सर्व्हिस रोड ते झुलेलाल मंदिर प्रयत्न अतिरिक्त जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी (दि. 5) ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आला. …
Read More »मुरुड नगरपरिषदेसमोर कोळी समाजाचे आंदोलन
मुरुड : प्रतिनिधी मुरुड शहरातील जुना पाडा महादेव कोळी समाज मुरुड सिटी सर्वे नंबर 65़ ड 2 या कोळी लोकांचे बिन आकारी होळीचे मैदान असून येथे मुरुड नगरपरिषदेचे गटाराचे बांधकाम सुरु असतानाच काळ भैरव देवस्थान मंदिर ट्रस्ट भंडारी समाज मुरुड यांनी गटाराच्या मूळ बांधकामात अनधिकृतपणे लोखंडी खांब उभे केले आहेत. …
Read More »