Breaking News

Monthly Archives: April 2019

पंचांवर चिडचिडप्रकरणी महेंद्रसिंह धोनीला दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था चेन्नई आणि राजस्थान संघांमधल्या सामन्याला सदोष पंचगिरीमुळे वादाचे गालबोट लागले. या वेळी ‘कॅप्टन कूल’ अशी ओळख असलेला चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे ‘अँग्री’ रूप क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाले. दरम्यान, पंचांवर चिडचिड केल्याप्रकरणी धोनीला सामन्याच्या मानधनाच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. सामन्याच्या अखेरच्या षटकात बेन स्टोक्सचा चौथा …

Read More »

चेन्नईची राजस्थानवर थरारक मात

जयपूर : वृत्तसंस्था अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने राजस्थान रॉयल्सवर चार गडी राखून मात केली. मिचेल सॅन्टनरने षटकार ठोकून चेन्नईला राजस्थान रॉयल्सवर सनसनाटी विजय मिळवून दिला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले …

Read More »

बारणेंच्या विजयाचा महायुतीचा निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचे जोरदार वारे पनवेल मतदारसंघात वाहत आहेत. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत्त पोहचून श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. त्याअंतर्गत तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पोयंजे, बारवई, भोर्ले गावात आणि रसायनी विभागात प्रचार रॅलीचे …

Read More »

विकासकामांच्या जोरावरच बारणे विजयी होणार

अरूणशेठ भगत यांचा दावा पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शेलघर, बेलपाडा आणि गव्हाण येथं शुक्रवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्रीरंग बारणे यांनी पाच वर्षांमध्ये केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहचवून श्रीरंग …

Read More »

पनवेलमध्ये महायुतीची प्रचारात जोरदार मुसंडी

कोळीवाड्यातील मतदारांकडून ढोल ताशांचा निनाद, फुलांची उधळण पनवेल : रामप्रहर वृत्त- भाजप, शिवसेना महायुतीचा विजय असो, खासदार बारणे यांचा विजय असो अशा जयघोषात निघालेल्या भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या प्रचार रॅलीला गुरुवारी पनवेल कोळीवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रचाराने महायुतीने जोरदार मुसंडी घेतल्याचे दिसून आले. आमदार प्रशांत ठाकूर, मनपा सभागृह नेते …

Read More »

राब भाजणी पद्धत टाळा

कृषी अधिकार्‍यांचे शेतकर्‍यांना आवाहन पाली : प्रतिनिधी भातशेतीत अजूनही पारंपरिक राब भाजण्याच्या पद्धतीचाच वापर सुरु आहे. मात्र ही मशागतीची ही अयोग्य पद्धत असून, शेतकर्‍यांनी भातशेती मशागतीसाठी सुधारित चतूःसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी केले आहे. भाताचे कोठार समजल्या जाणार्‍या रायगड जिल्ह्यात साधारण 1 लाख 10 …

Read More »

काजूगर उद्योग प्रक्रियेला रायगडात खीळ

Sorting cashew fruit माणगाव : प्रतिनिधी कोकणात आंब्याबरोबर काजू हे महत्वाचे फळ आहे. रायगड जिल्ह्यातही काजू मोठया प्रमाणात पिकत आहे. मात्र काजूगर प्रक्रियेसाठी लागणारे भांडवल सुशिक्षित बेरोजगार उद्योजकांकडे नसल्यामुळे रायगड जिल्ह्यातील काजूगर प्रक्रिया उद्योगाला खीळ बसली आहे.  रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव, रोहा, सुधागड, कर्जत या तालुक्यात …

Read More »

महाडमध्ये रुग्णांना स्वच्छता किटचे वाटप

महाड : प्रतिनिधी मेमन समाज स्थापना दिवसाचे औचित्य साधून येथील मेमन जमातीकडून गुरुवारी (दि. 11) महाड ट्रामा सेंटरमधील रुग्णांना स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला 11 एप्रिल हा मेमन समाजाचा स्थापना दिवस आहे. त्या निमित्ताने गुरुवारी येथील …

Read More »

पंकज पाटील यांची कर्जत तालुका भाजपच्या चिटणीसपदी नियुक्ती

कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका चिटणीस म्हणून पंकज पुंडलिक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंकज पाटील हे काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिक पाटील यांचे चिरंजीव आहेत. पेण येथे काही दिवसांपुर्वी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात कर्जत येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पंकज पाटील यांनी आपल्या अनेक सहकार्‍यांसह भाजपत प्रवेश …

Read More »

महात्मा फुले यांच्या जीवनाचा आदर्श सर्वांनी घ्यावा -मुख्याधिकारी गणेश शेटे

खोपोली : प्रतिनिधी शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. सर्वानी महात्मा फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा अभ्यास करून आदर्श घ्यावा, त्यांनी ज्याप्रमाणे स्त्रियांमध्ये शिक्षणाची जागृती केली त्याप्रमाणे प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागात कुठलीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी …

Read More »