Breaking News

Monthly Archives: June 2019

विजेच्या लपंडावाने हैराण नागरिकांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा

उरण ः प्रतिनिधी : विजेच्या लपंडावाने संपूर्ण उरण तालुक्याला अक्षरशः हैराण केले असून, पाऊस पडत नसल्याने उष्ण हवामानाने नागरिकांची झोप उडाली आहे. सतत आठ दिवस विजेचा लपंडाव सुरू असल्याने जनता उष्म्याने होरपळून निघत आहे. त्यातच अधूनमधून वीजपुरवठा पूर्ववत होत असतानाच अचानकपणे उरण-बोरी नाका येथील ट्रान्सफार्मरचा स्फोट झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी रात्रीच्या …

Read More »

संधी हुकल्यानंतर मी अधिक सकारात्मक झालोः ऋषभ पंत

लंडन ः प्रतिनिधी सलामीवीर शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे, भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान मिळाले. विश्वचषक स्पर्धेसाठी 15 जणांचा संघ घोषित करताना एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने पंतला डावलून दिनेश कार्तिकला संघात स्थान दिले. मात्र ही संधी नाकारल्यानंतर आपल्यामध्ये सकारात्मक बदल झाल्याचे ऋषभ पंत म्हणाला. …

Read More »

राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडण्याचा भारताचा इशारा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ’बर्मिंगहॅम येथे 2022 मध्ये होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी आणि तिरंदाजीला वगळण्यात आल्याने भारताने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. महिन्याभरात या दोन्ही खेळांसंबंधी निर्णय न घेतल्यास भारत राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडेल’, असा इशारा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी दिला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा …

Read More »

मलिंगा सुस्साट!

ग्लेन मॅकग्राचा विक्रम मोडला नवी दिल्लीः वृत्तसंस्था ’यॉर्करमॅन’ अशी ओळख असलेल्या लसिथ मलिंगाने शुक्रवारी इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात इतिहास रचला. वर्ल्डकपमध्ये खेळताना सर्वाधिक जलद 50 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्रा आणि श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन या दिग्गज गोलंदाजाचा विक्रम मोडीत काढला. शुक्रवारी श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यात …

Read More »

विराटची 27 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

साऊदम्प्टनः वृत्तसंस्था हिटमॅन रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध नकोसा विक्रम नोंदवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने दमदार खेळी केली. त्याने या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा संयमाने सामना करताना अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले. त्याने ऑस्ट्रेलिया ( 82) आणि पाकिस्तान ( 77) यांच्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धही अर्धशतक झळकावले. कोहलीची ही …

Read More »

कर्माचे फळ

देशाचे नाही पण राज्यातील राजकारणात तसेच समाजकारण व विविध क्षेत्रात चुलते (काका) पुतणे वाद चांगलाच परिचित आहे. अगदी सामान्यातील सामान्य कार्यकर्ता ते मोठ्यातील मोठा राजकारणी, समाजकारणी, समाजसेवक यांना पुतणेप्रेम घातक ठरले आहे. अगदी पूतनामावशीच्या प्रेमासम. कधी काकाचे प्रेम अपुरे पडत असेल किंवा हात आखडता घ्यावा लागला असेल, तर काका-पुतण्या वाद …

Read More »

देवेंद्रांनी उमटविला ठसा, विधिमंडळात आणि शिवसेनेतही

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर इतकी जबरदस्त पकड बसविली आहे की ज्याप्रमाणे राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी यांनी आपले स्थान अढळ आणि अटल निर्माण केले आहे, तसेच महाराष्ट्रातसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आपले स्थान मजबूत केले आहे. याचे संपूर्ण श्रेय जसे देवेंद्रांच्या बुद्धिचातुर्याला द्यावे लागेल तसेच या श्रेयाचे खरे मानकरी …

Read More »

योग दिन उत्साहात

पनवेल ः प्रतिनिधी पतंजली योग समिती पनवेल व रामशेठ ठाकूर विचार मंच यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस शुक्रवारी (दि. 21) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन पनवेल सेक्टर-8 येथील गोकुळ डेअरीसमोरील भूखंडावर सकाळी  पनवेलकरांनी सामूहिक योगासने केली. या शिबिराला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी दररोज योगाभ्यास करण्याचा संकल्प आजच्या जागतिक …

Read More »

कंत्राटी कामगारांच्या लढ्याला यश

पनवेल ः प्रतिनिधी कामगारांच्या हितासाठी तीन आमदार एकवटल्याने ’जल सेवक’ म्हणून सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव तसेच सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे भत्ते व सुविधा देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. सदर प्रस्ताव येत्या आठ दिवसांत वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने दोन महिन्यांसाठी सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष …

Read More »

शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी राजकीय पादुका बाहेर : लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि. 24) सकाळी 10 वाजता पनवेल, उरणमधील शेतकरी प्रकल्पग्रस्तांचा भव्य मेळावा पनवेलमधील आगरी समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या वेळी शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी राजकीय पादुका बाहेर ठेवून सर्वपक्षीय एकवटले आहेत, अशी माहिती …

Read More »