Breaking News

Monthly Archives: June 2019

सीकेटी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन

पनवेल ः प्रतिनिधी : सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमात शुक्रवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इन्स्टिट्यूट ऑफ योग अ‍ॅण्ड आयुर्वेदतर्फे विद्यालयात विशेष योगशिक्षिका नयना म्हात्रे उपस्थित होत्या.  योग केंद्राच्या विद्यार्थिनी वैष्णवी जगे आणि हर्षा शिंदे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. प्रशिक्षिका नयना म्हात्रे यांनी …

Read More »

सौरशीतगृहांचे वरदान

फळे आणि भाजीपाला ही नाशवंत शेती उत्पादने असून, बाजारात पोहोचेपर्यंत ती खराब होण्यास सुरुवात झालेली असते. खराब मालाला दामही अल्प मिळतो. भारतात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर शेती उत्पादन वाळून जाते किंवा खराब होते. त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी शीतगृहे शेतकर्‍याला हितकारक ठरू शकतात. विजेची अल्प किंवा अत्यल्प उपलब्धता असणार्‍या …

Read More »

सुषमा पाटील विद्यालयात जागतिक योगदिन साजरा

पनवेल ः प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या वतीने कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, दिलीप पाटील, तसेच सुशील शर्मा, हॅप्पी सिंग, कमलाकर पाटील, रश्मी भारद्वाज, रेखा रावत, सुनीता शर्मा, काटकर सर, नाईक सर, म्हात्रे …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात एनसीसी विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

पनवेल ः प्रतिनिधी : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त शुक्रवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. एन. सी. सी. विभागातर्फे महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कला शाखेचे प्रमुख व एन. …

Read More »

लागावी मराठीची गोडी

मराठी भाषेची अवस्था शालेय शिक्षणात काहिशी दुर्लक्षित अशी आहे की काय, अशी शंका यावी असे व्यापक चित्र यंदाच्या राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालातही दिसून आले. मराठी शिक्षकांची अवस्था देखील फारशी बरी नाही असा सूर गेले अनेक महिने लागतो आहे. या सार्‍या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेले हे सुस्पष्ट विधान निश्चितच प्रभावी …

Read More »

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत रोडपाली परिसराची स्वच्छता

पनवेल ः प्रतिनिधी रोडपाली सेक्टर 20 येथील रिक्रिएशन ग्राऊंडमध्ये कचर्‍याचा ढीग पडला होता. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. त्याअनुषंगाने रोडपाली रेसिडेन्सी सेल्फवेअर असोसिएशनचे चेअरमन गिरीश जोशी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पनवेल महापालिका आणि सिडकोमध्ये तक्रार केली होती. त्यावर सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुढाकार …

Read More »

सुकापूर-पाली देवद हद्दीतील कचर्याच्या विल्हेवाटीसाठी उपाय करा

आमदार प्रशांत ठाकूर यांचा तारांकित प्रश्न पनवेल ः प्रतिनिधी कचर्‍यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आरोग्याला धोका निर्माण झाला असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्या अनुषंगाने सुकापूर-पाली देवद हद्दीतील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली, अशी विचारणा आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. सुकापूर-पाली देवद ग्रामपंचायत हद्दीतील …

Read More »

मोर्बे धरणाची तातडीने दुरुस्ती करावी : आ. प्रशांत ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे केली. त्या अनुषंगाने धरणाच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर प्रगतिपथावर असून लवकरच या धरणाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात होणार आहे. मोर्बे धरणाची दुरवस्था झाल्याने दररोज लाखो …

Read More »

सीकेटी विद्यालयाचे शिष्यवृत्तीत सुयश

पनवेल ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत फेब्र्ाुवारी 2019मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. नयन नारायण फडके, वैष्णवी नितीन शिंदे, जित विनोद गायकर अशी पूर्व …

Read More »

सुगंधी पोह्यासाठी भाताची ’कर्जत शताब्दी’ जात विकसित

कर्जत ः प्रतिनिधी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक व भात विशेषज्ञ डॉ. आर. एल. कुणकेरकर यांच्या नेतृत्वाखाली सुगंधी पोह्यासाठी ’कर्जत शताब्दी’ ही भाताची नवीन जात ’बोटवेल’ या स्थानिक जातीपासून उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आली आहे. ’कर्जत शताब्दी’ ही भाताची नवीन जात कमी उंचीची (बुटकी), न लोळणारी, 125-130 …

Read More »