Breaking News

Monthly Archives: June 2019

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हा सण स्त्रीयांसाठी फक्त उपवासाचा दिवस नव्हे, तर हिंदू पतिव्रतेच्या ह्दयात अढळ स्थान असलेल्या सावित्रीच्या तत्त्वज्ञान, दृढनिश्चय, सुशिलता, त्याग, सदाचार, शालीनता, पतिव्रता  या गुणांची स्वामिनी असलेल्या गुणवती कुळवती लावण्यवती सावित्रीकडून शिकवण व अखंड आयुष्यभरासाठी प्रेरणा घेण्याचा दिवस म्हणजे वटपौर्णिमा आज तसा जास्तच  उशीर झाला होता. रस्त्यावर एका ठिकाणी बायकांची …

Read More »

वीजचोरीचे आव्हान

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर सततच्या दुष्काळामुळे मुळात कृषीक्षेत्राकडे महावितरणची सर्वाधिक थकबाकी आहे. खेरीज शासकीय सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, रस्त्यांवरील दिवे यांकरिता पुरवल्या जाणार्‍या विजेच्या किंमतीची वसुलीही मोठ्या प्रमाणात थकितच असते. खरे तर योग्य वेळेत वीजबिलांची वसुली झाल्यास संबंधित कंपनी ग्राहकांना उत्तम रीतीने वीजपुरवठा करू शकते. परंतु यासंदर्भातील दुष्टचक्र भेदणे अद्यापतरी संबंधितांच्या …

Read More »

सरफराजचे “नाचता येईना अंगण वाकडे”

मॅन्चेस्टर : वृत्तसंस्था यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भारत-पाकिस्तान सामना 16 जूनला खेळवण्यात येणार आहे. या मॅचआधीच पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. टीम इंडियाला अनुकूल अशा खेळपट्ट्या आयसीसीने बनवल्याचा आरोप सरफराज अहमदने केला आहे. वर्ल्डकपमध्ये सरफराज पाकिस्तानच्या टीमला मिळणार्‍या खेळपट्ट्यांवर नाराज आहे. आम्हाला मिळणार्‍या …

Read More »

टीम इंडियाला पुरेशा सुविधा नाहीत; बीसीसीआयची नाराजी

लंडन : वृत्तसंस्था पावसामुळे चार सामने रद्द झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियोजनावर टीका होत आहे. त्यात आणखी एक प्रकार समोर आला आहे. भारतीय संघाची ज्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली त्यात पुरेशी सुविधाच उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे खेळाडूंना नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. हॉटेलमधील जिममध्ये पुरेशी उपकरणे नसल्यानं खेळाडूंना व्यायामासाठी …

Read More »

पाकसाठी सचिनचा ‘मास्टर’प्लॅन

लंडन : वृत्तसंस्था पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना रद्द झाल्यानंतर सर्वांचे लक्ष रविवारच्या लढतीकडे लागले आहे. येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान हे पक्के शेजारी अन् कट्टर वैरी समोरासमोर येणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत या प्रतिस्पर्धींचा सामना पाहण्याची संधी कोणीच दवडू इच्छित नाही. या महत्त्वाच्या सामन्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं भारतीय संघाला एक …

Read More »

जिल्ह्यातील 25 हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी पूर्ण

अलिबाग : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या विविध भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा कमालीचा सुखावला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 15 जूननंतर बरसणारा मान्सून आधीच बरसल्याने शेतकर्‍यांनी शेतीच्या कामाच्या कामांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात एक लाख चार हजार भाताचे क्षेत्र आहे. त्यातील 10 टक्के क्षेत्रावरच भाताचे पीक घेतले जाते. …

Read More »

बारामतीकरांनी 14 वर्षे नीरेचे पाणी पळविले

उदयनराजेंची रामराजेंसह शरद पवारांवर टीका सातारा : प्रतिनिधी नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला घरचा अहेर दिला आहे. त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी 14 वर्षे पाणी बारामतीला पळविले. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवले, …

Read More »

अकरावी प्रवेश वेळापत्रकानुसार

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून अकरावी प्रवेशासंदर्भात विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात साशंकता असली तरी विद्यार्थ्यांचे नुकसान राज्य शासन होऊ देणार नाही, अशी ग्वाही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया नियमित वेळापत्रकानुसारच सुरू करण्यात येत असून या प्रक्रियेला कोणताही विलंब झालेला नाही. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मतभेद

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरत असलेले विरोधी पक्ष आता आपसातील जागावाटप आणि आघाडीच्या पेचात अडकले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू नये, अशी भूमिका काँग्रेसचे पदाधिकारी घेत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने विधानसभेच्या 50 टक्के जागांची मागणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकणार्‍या काँग्रेसला खिंडीत पकडण्याची राष्ट्रवादीची रणनीती …

Read More »

यंदाची ‘मौका मौका’ जाहिरात होतेय ट्रोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये सुरू असणार्‍या क्रिकेट विश्वचषकात रविवारी म्हणजेच 16 जून रोजी धमाकेदार सामना पाहण्याचीच तयारी सर्वत्र सुरू असल्याचे दिसत आहे. कारण भारत आणि पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच्या या वातावरणात सर्वाधिक चर्चेत आहे ती म्हणजे ‘मौका… मौका’ जाहिरात. 2015 पासून सुरू झालेल्या …

Read More »