Breaking News

Monthly Archives: July 2019

रोहा एसटी स्थानकातील मैला अखेर उचलला

रोहे ः प्रतिनिधी – येथील एसटी स्थानकामधील शौचालयातील मैला स्थानकाच्या आवारात व रस्त्यावर येत होता. त्यामुळे प्रवासी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्याची रोहा एसटी आगार व नगर परिषदेने गंभीर दखल घेतल्यानंतर ठेकेदाराने ताबडतोब हा मैला हटवण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून रोहा एसटी बस स्थानकातील शौचालयातील …

Read More »

गुरव समाजाबद्दल अपशब्द; कारवाईसाठी पोलिसांना निवेदन

खालापूर : प्रतिनिधी  – गुरव समाजाबद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरणार्‍या इसमावर कारवाई करण्याची मागणी गुरव समाजाने खालापूर पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्रात गुरव समाज अनेक पिढ्या वास्तव्यास आहे. हिंदवी स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी गुरव समाजाला मानाचे पान देऊन बहुमान केला होता. या समाजावर देव-देवळांची जबाबदारी …

Read More »

पक्ष संघटना मजबूत करणार -महेंद्र दळवी

अलिबाग : प्रतिनिधी – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपली रायगड जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. ही जबाबदारी मी स्वीकारली आहे. सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी रविवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत सांगितले. अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी या वेळी उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख …

Read More »

नेरळ भाजपकडून आदिवासी भागात छत्र्यावाटप

कर्जत : बातमीदार – नेरळ शहर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर यांच्या पुढाकाराने आदिवासी भागातील ग्रामस्थांना छत्र्या वाटप करण्यात आल्या. टपालवाडी आणि लव्हाळवाडीमध्ये जाऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी छत्र्या वितरित केल्या. टपालवाडी आणि लव्हाळवाडीमधील आदिवासींनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या आदिवासी ग्रामस्थांचे आभार मानण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य …

Read More »

पेणमध्ये भाजपचे सदस्य नोंदणी अभियान

पेण : प्रतिनिधी – माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण शहरातील प्रत्येक प्रभागात भाजप सदस्य नोंदणी व नवमतदार नोंदणी अभियान सुरू आहे. शहरातील कुंभारआळीमध्ये भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, उपाध्यक्ष अजय क्षीरसागर व नेते विनोद शहा यांच्या उपस्थितीत या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. माजी सभापती मयुर कुंभार, शहर चिटणीस …

Read More »

गणेशमूर्ती चित्रशाळांमध्ये शिरले पुराचे पाणी

जोहे, कळवे, तांबडशेत येथील कारागिरांचे नुकसान पेण : अनिस मनियार  – गेल्या चार-सहा दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील तांबडशेत, जोहे, कळवे येथील गणेशमूर्ती कारखाने व घरांमध्ये पाणी शिरले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. पेण तालुक्यातील जोहे तलाठी सजामधील तांबडशेत, जोहे, कळवे या गावांत कच्च्या गणेशमूर्तीचे …

Read More »

मिसेस इंडिया वर्ल्ड वाइडमध्ये चमकणार पनवेलचे सौंदर्य ; ग्रीस येथे होणार्या स्पर्धेसाठी डॉ. संगीता देवीकर यांची निवड

पनवेल ः वार्ताहर खांदा वसाहतीतील रहिवासी व नामांकित दंतचिकित्सक डॉ. संगीता देवीकर यांची ग्रीस येथे होणार्‍या मिसेस इंडिया वर्ल्ड वाइड स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. यानिमित्ताने पनवेलचे नाव सातासमुद्रापार जाणार आहे. ही स्पर्धा जिंकण्याच्या दृष्टिकोनातून  डॉ. देवीकर यांचा सराव सुरू आहे. त्यांना सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या आहेत. …

Read More »

अतिवृष्टीमुळे पनवेलमध्ये नुकसान; पंचनामे करण्यास सुरुवात

पनवेल ः बातमीदार शुक्रवारी व शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका पनवेलवासीयांना बसला. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी पूर बाधित घरांचे पंचनामे करण्यास पनवेल तहसील विभागाने सुरुवात केली आहे. तालुक्यातील वावंजे, कुंडेवहाळ, डोलघर, दिघाटी, बेलवली, कोळखे, केळवणे, सुकापूर आदी गावांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान …

Read More »

घरात घुसून चाकूच्या धाकाने 56 हजार रुपये लुटले

पनवेल ः वार्ताहर अरेंजा टॉवर इमारतीत घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने सदर इमारतीत राहणार्‍या रत्ना शिवदास नायर (55) या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या जवळची 56 हजारांची रोख रक्कम लुटून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या वेळी लुटारूसोबत झालेल्या झटापटीत रत्ना नायर किरकोळ जखमी झाल्या आहेत. सीबीडी पोलिसांनी अज्ञात लुटारू विरोधात …

Read More »

खांदा कॉलनीमध्ये युवोन्मेष ग्रुपचा जल्लोष

खांदा कॉलनी ः रामप्रहर वृत्त ब्राह्मणसभा, नवीन पनवेल प्रस्तुत ‘युवोन्मेष’ या संस्थेेेचा सांस्कृतिक कार्यक्रम सीकेटी महाविद्याय, खांदा कॉलनीमधे मोठ्या जल्लोषात झाला. या वेळी विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिडकोचे मुख्य अभियंता केशव वरखेडकर यांच्यासह ब्राह्मणसभा अध्यक्ष डॉ. अरविंद बेलापूरकर, उपाध्यक्ष शंकर आपटे, सचिव नृपाली …

Read More »