पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील भाताण गावाजवळ एका अज्ञात वाहनाची धडक एकाला बसल्याने, त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत. अरविंद दसमी (24, रा. रायपूर) असे मयत व्यक्तीचे नाव असून रंग सावळा, केस काळे, पायात निळ्या रंगाची नवीन फुलपॅन्ट व काळ्या …
Read More »Monthly Archives: September 2019
ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचे दीर्घ आजाराने रविवारी (दि. 8) निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. गेल्या दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम जेठमलानी यांच्या मागे पुत्र व …
Read More »पक्षप्रवेश : शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खिडुकपाडा व रोडपालीतील शेकडो शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कळंबोली परिसरात शेतकरी कामगार पक्षाला हादरा बसला आहे. स्तुत्य उपक्रम : कृत्रिम अवयव प्रदान पनवेल : सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …
Read More »जासईत तरुणीची आत्महत्या
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील जासई येथील एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. 7) घडली. शिवानी अरुण म्हात्रे (20) असे या तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, इयत्ता बारावीत शिकत असलेल्या शिवानी म्हात्रे हिने शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि तरुणीचे पार्थिव …
Read More »गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप
शिवाजीनगर, गव्हाण : गेली सहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर शनिवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
Read More »उरणमधील पुरातन श्रीगणेश मंदिर
उरण : वार्ताहर उरण शहरातील गणपती चौक येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री गणपती मंदिर हे सर्व गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर सुमारे 250 वर्षे पुरातन असून मंदिराच्या प्रवेशद्वारी आणि गाभार्यामध्ये पुरातन लाकडाच्या कोरीव कामाचा सुंदर नमुना आहे. मंदिरातील सुंदर सुबक आणि कोरीव काळ्या पाषाणातून घडवलेली रिद्धी-सिद्धीसह असलेली श्रीगणेशाची मूर्ती …
Read More »मुसळधार पावसाचे गडचिरोलीत थैमान; 300 गावांचा संपर्क तुटला; तिघे वाहून गेले
गडचिरोली : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक मार्ग बंद पडून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 300 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गडचिरोलीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे लहान-मोठे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे 20 प्रमुख …
Read More »विसर्जन घाटावर भाविकांचे भक्तिभावाने स्वागत
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त शनिवारी (दि. 7) सगळीकडे पाच दिवसांच्या गणपतीचे भक्तिभावाने विसर्जन झाले. नवीन पनवेल सुकापूर येथील तलावातही परिसरातील अनेक गणपतींचे विसर्जन झाले. या वेळी उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ नवीन पनवेल, तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने गणपती विसर्जन घाटावर भाविकांचे स्वागत करण्यात आले. सिडको अध्यक्ष आमदार …
Read More »चांद्रयान-2; विक्रम लँडरचे ठिकाण सापडले
बंगळुरू : वृत्तसंस्था चांद्रयान-2 मोहिमेतील संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्त्रो) यश आले आहे. ‘चंद्रावरील विक्रम लँडरचे ठिकाण सापडले असून, ऑर्बिटरने या लँडरचे फोटो काढले आहेत. आम्ही त्याच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न करीत आहोत’, अशी माहिती के. सिवन यांनी दिली. देशवासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या चांद्रयान-2 …
Read More »उरण नगर परिषदेतर्फे विसर्जनासाठी चोख व्यवस्था
उरण : वार्ताहर माहेरपणाला आलेल्या गौरी आणि लाडक्या गणपती बाप्पांचे शनिवारी (दि. 7) उरण शहरासह ग्रामीण भागात विसर्जन करण्यात आले. या वेळी उरण नगर परिषदेने चोख व्यवस्था ठेवली होती. भाद्रपद शुद्ध चतुर्थीनिमित्त गणरायाचे मोठ्या उत्साहात व आनंदात ढोल-ताशाच्या गजरात आगमन झाले. बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाने दमदार हजेरी लावली होती, तरीही भक्तांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper