Breaking News

Monthly Archives: September 2019

भामरागडला पुराचा वेढा

तिघे वाहून गेले; 300 गावांचा संपर्क तुटला गडचिरोली ः प्रतिनिधी पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती, प्राणहिता, वैनगंगा या नद्यांना पूर आल्याने भामरागडला मोठा फटका बसला आहे. 70 टक्के गाव पाण्याखाली आले आहे. सहाशेवर गावकर्‍यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे 20 प्रमुख मार्गांवरील पूल पाण्याखाली आल्याने सुमारे 300 गावांचा दोन …

Read More »

‘होमगार्डमध्ये सामील व्हा’

म्हसळा ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, रोहा, खालापूर (चौक), मुरूड, महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, तळा, पाली या तालुक्यातून होमगार्ड पथकांत भरती प्रक्रिया दि. 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या कालावधीत सुरू आहे. तरी आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त उमेदवारांनी भाग घ्यावा, असे आवाहन म्हसळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे …

Read More »

शेतकरी वसंत भोसले यांची सामाजिक बांधिलकी

नागोठणे : प्रतिनिधी रोहे तालुक्यातील बाळसई गावचे शेतकरी वसंत भोसले यांनी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले वसंत भोसले हे गेली 25 वर्षे गावातील विविध कार्यक्रमांत मोफत जेवण आणि शेतात राबून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून …

Read More »

वाहतूक कोेंडीचे विघ्न

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बिकट माणगाव : प्रतिनिधी कोकणवासीयांचे आराध्य दैवत गणपतीला शनिवारी भावपूर्ण निरोप दिल्यानंतर आपल्या मायभूमीतून कर्मभ्ाूमीकडे निघालेल्या चाकरमान्यांना पुन्हा एकदा परतीच्या प्रवासात मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव ते लोणेरे दरम्यान वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे चाकरमानी प्रवासी तासन्तास या महामार्गावर सकाळपासूनच वाहतूक कोंडीला तोंड देत होते. त्यामुळे चाकरमान्यांच्या वाट्याला …

Read More »

खोपोलीतील सार्वजनिक शौचालयांची होणार दुरुस्ती

खोपोली ः प्रतिनिधी खोपोली नगरपालिकेकडून स्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम सुरू आहेत. या मोहिमेंतर्गत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह व शौचालयांची दुरुस्ती करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंबंधी दोन दिवसांपूर्वी मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शौचालयांची पाहणी करून कामांच्या सूचना दिल्या. खोपोली नगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहांमधील असुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी …

Read More »

पुढच्या वर्षी लवकर या!

धो धो पावसातही खोपोली-खालापुरात विसर्जन खोपोली ः प्रतिनिधी भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाची व पवित्र गौराईची यथासांग भक्ती करून शनिवारी (दि. 7) खालापूर-खोपोलीत बहुसंख्य सार्वजनिक व हजारो घरगुती गौरी गणपती बाप्पांचे कोसळणार्‍या धो-धो पावसात अत्यंत भावपूर्ण वातावरणात विसर्जन करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असे सांगत बाप्पाला निरोप देण्यात …

Read More »

कोंढाणे धरण : सद्यस्थितीवर एक नजर

2011मध्ये राज्यात झालेल्या सिंचन घोटाळ्यात अडकलेले कोंढाणे धरण राज्य सरकारने सिडको महामंडळ यास विकले आहे. धरणाचे काम ज्यासाठी अडविले गेले, त्या घोटाळ्याचा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही. तसे असतानादेखील धरण अन्य यंत्रणेला विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र पूर्वीच्या नियोजनानुसार कोंढाणे धरणाचे पाणी हे उल्हास नदीमध्ये सोडले जाणार होते आणि …

Read More »

मतांचे आकडे बोलतात

2014च्या निवडणुकीनंतर भाजपच्या मतांमध्ये वाढ होऊ लागली आहे. झपाट्याने भाजपची मते वाढताना दिसताहेत. नवमतदार भाजपकडे आकर्षित होत आहेत. मागील निवडणुकांचा विचार केला, तर भाजपच्या मतांची टक्केवारी वाढल्याचे चित्र दिसून येते. राष्ट्रवादीची मते मात्र घसरताना दिसताहेत. चार निवडणुकांनंतर राष्ट्रवादीच्या मतांचा आकडा 17.4 टक्क्यांपर्यंत घसरला. म्हणजेच राष्ट्रवादीची मते 5.2 टक्क्यांनी घटली. आमदारांची …

Read More »

स्काय इज द लिमिट!

अवघड खेळपट्टीवर तेही प्रतिकूल परिस्थितीत एखादा फलंदाज जेव्हा नेत्रदीपक फटकेबाजी करतो तेव्हा तो दर्शकांची वाहवा मिळवतो. आपल्या संघाची आशा असणारा हा खेळाडू त्याच्या नियोजनबद्ध खेळीने विजयाला गवसणी घालणार असे वाटत असताना शेवटच्या क्षणी तो दुर्दैवीरीत्या बाद होतो… असाच काहीसा प्रकार भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या चांद्रयान-2 बाबतीत घडला आहे. …

Read More »

पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी खर्च करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती; मुंबईत मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन

मुंबई : प्रतिनिधी आजच्या घडीला देश पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना आपल्या शहरांची निर्मितीही 21व्या शतकातील जगाप्रमाणे करावी लागणार आहे. याच विचारासह आपले सरकार पुढील पाच वर्षांत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरवर 100 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 7) येथे दिली. …

Read More »