कर्जत : बातमीदार महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी कर्जत तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतीने चौदा वित्त आयोगाच्या निधीतून ब्युटी पार्लर प्रशिक्षण सुरू केले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या या दोन दिवशीय ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन सरपंच चिंधु तरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच यशवंत भवारे, ग्रामसेवक अरुण राजपूत यांच्यासह …
Read More »Monthly Archives: November 2019
वनवासी आश्रमास साहित्यिकांची भेट
खोपोली : प्रतिनिधी कर्जत जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमाला खोपोली येथील साहित्यिकांनी भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी हितगुज करीत खाऊ व पुस्तकांचे वाटप केले. र. वा. दिघे यांच्या स्नुषा कवियित्री उज्वला दिघे, नलिनी पाटील, सुधा इतराज व स्वाती जोशी या साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी कर्जत तालुक्यातील जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमास …
Read More »माणगावची 108 रूग्णवाहिका ‘कोमात’, रूग्णसेवा ठप्प
माणगाव : प्रतिनिधी शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माणगाव उपजिल्हा रूग्णालयाला 108 क्रमांकाची रूग्णवाहिका मिळाली आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्याने ही रूग्णवाहिका गेल्या दोन महिन्यांपासून उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात उभी आहे, त्यामुळे अनेक गरजू व तातडीच्या रूग्णांना या सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. मुंबई -गोवा महामार्गावरील माणगांव येथे उपजिल्हा रूग्णालय आहे. या …
Read More »कर्जत तालुक्यातील दोन ग्रामपंचायतच्या 8 डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूका
कर्जत : बातमीदार तालुक्यातील वरई आणि तिवरे या दोन ग्रुप ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 8 डिसेंबर रोजी होत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच होत असलेल्या या दोन ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व मिळविण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्यातील तिवरे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच पद अनुसूचित जमातीतील महिलेसाठी राखीव असून तेथे थेट सरपंच आणि नऊ सदस्य …
Read More »भटक्या कुत्र्यांच्या त्रास वाढला; कर्जतमधील नागरिक वैतागले
कर्जत : बातमीदार शहरात मागील काही दिवसांत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भटक्या आणि मोकाट कुत्र्यांच्या हैदोसाने कर्जतमधील नागरिकांच्या त्रासात भर पडली पासून नगरपालिका प्रशासन मात्र याबाबत ढिम्म असल्याचे चित्र आहे. कर्जत शहराच्या हद्दीमध्ये अन्य शहरातील कुत्रे आणून सोडले जातात, अशी ओरड नेहमी होत असते. मग ते …
Read More »आरक्षणामुळे दिग्गजांचा अपेक्षाभंग, जि.प. अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव
अलिबाग : प्रतिनिधी पुढील अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी रायगड जिल्हा परिषदेचे (राजिप) अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाले आहे. या आरक्षणामुळे अनेक दिग्गजांचा अपेक्षा भंग झाला आहे. सध्याच्या सदस्यांमध्ये शेकापच्या दोन, शिवसेना व काँग्रेस यांच्या प्रत्येकी एक अशा चार अनुसूचित जाती महिला सदस्य आहेत. 2017 मध्ये झालेल्या रायगड जिल्हा परिषद निवडणूकीत …
Read More »धोनीमुळे माझे वर्ल्ड कपमधील शतक हुकले -गौतम गंभीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने एका गोष्टीबाबत आपले मौन सोडले आहे. विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यामुळे माझे शतक हुकले, असे गंभीरने म्हटले आहे. भारतीय क्रिकेट संघाने 2 एप्रिल 2011 रोजी आयसीसी वन डे वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे …
Read More »क्रिपझो कंपनीचे मालक आणि संचालकांविरोधात गुन्हा दाखल
अलिबाग : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात क्रिपझो इंजिनिअरींग कंपनीत झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंपनीचे मालक आणि संचालकांविरोधात माणगाव पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. निष्काळजीपणामुळे कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य 16 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर पोलिसांनी …
Read More »शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली नाही : शरद पवार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सरकार स्थापनेचे शिवसेना-भाजपला विचारा, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रम वाढवलेला असतानाच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झालीच नसल्याचे सांगून पवार यांनी राज्यातील सत्तास्थापनेचा सस्पेन्स अधिकच वाढवला आहे. सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम तयार करण्याचे आम्ही बोललोच नव्हतो. …
Read More »अजगराची हत्या लाईव्ह करणे पडले महागात
पेणमध्ये पाच जण अटकेत पेण : प्रतिनिधी सोशल मीडिया अर्थात समाजमाध्यमांवर लाइव्ह व्हिडीओ करण्याची के्रझ तरुणाईमध्ये हल्ली वाढत आहे. अशाच प्रकारे जंगलात अजगर पकडून त्याची हत्या करण्याचा लाइव्ह व्हिडिओ फेसबुकवर प्रसिद्ध करणे पेणमधील पाच तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. वनविभागाच्या अधिकार्यांनी या तरुणांना अटक केली आहे. पेण तालुक्यातील खरबाचीवाडी येथील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper