पनवेल ः वार्ताहर बौद्धजन पंचायत समिती शाखा 801 व कामोठ येथील संघर्ष युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कामोठे सेक्टर 16 जयभीम स्तंभ येथे कँडल मार्च चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी युवक अध्यक्ष आशिष कदम, रमेश गमरे, विनोद गमरे, अरुण …
Read More »Monthly Archives: December 2019
भाजपचा एकही आमदार फुटणार नाही : आशिष शेलार
मुंबई : प्रतिनिधी आपल्या पक्षातील डझनभर आमदार फुटणार असल्याची चर्चा भाजपने स्पष्ट शब्दांत फेटाळली आहे. भाजपचा एकही आमदार फुटणार नाही. महाविकास आघाडीच्या आमदारांतच अस्वस्थता असून ते बंडाच्या तयारीत आहेत. त्यातून अशा अफवा पसरवल्या जात असून या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा पलटवार भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला. भाजपचे …
Read More »पनवेल महानगरपालिकेची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई
पनवेल : प्रतिनिधी पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नियंत्रणाखाली प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी नुकतीच पनवेल शहरात अनधिकृत बांधकामविरोधी धडक कारवाई केली. गीतांजली सोसायटी देशी दारू दुकानासह 13 दुकाने तसेच धोकादायक इमारतीत असणारे गाळे सील करण्यात आले. सर्व्हिस हौदामागे स्टेशन रोडवर 15 भंगार दुकाने …
Read More »हायकल कंपनीस ताकद दाखवणार
आमदार प्रशांत ठाकूर यांचा निर्वाणीचा इशारा पनवेल : प्रतिनिधी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील हायकल कंपनीमधील कामगारांना किरकोळ कारणावरून चुकीच्या पद्धतीने कामावरून निलंबित करण्यात आले होते. या कामगारांच्या हक्कासाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 5) हायकल कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »अभिमानाचा तुरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नव्या भारता’चे एक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भागीदार म्हणून सुंदर पिचाई यांच्याकडे पहावे लागते. त्यांनी अनेकदा या ना त्या कारणाने पंतप्रधान मोदींची भेट घेऊन भारताच्या वेगवान आर्थिक प्रगतीबद्दल आस्था व्यक्त केली आहे. जगभरात चीन वगळता बहुतेक सर्वच देशांमध्ये गुगलने आपली पाळेमुळे पसरली आहेत. किंबहुना, गुगलची उत्पादने न वापरणारा …
Read More »राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
विश्वभूषण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे, तर जगातील एक असामान्य असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या प्रकांड पांडित्याने, विद्वत्तेने आणि त्यांच्या विचार व कार्याने सार्या जगाला मोहून टाकले. करोडो लोकांच्या चेहर्यावर हास्य फुलवलेच, परंतु त्यांच्यात स्वाभिमानाची चिंगारी निर्माण करून आत्मभान मिळवून दिले. त्यामुळेच या देशातील आजचे चित्र हे बदललेले दिसते. …
Read More »डॉ. प्रियंका रेड्डी बलात्कार व हत्येच्या घटनेचा कर्जतमध्ये भाजपतर्फे निषेध
कर्जत : प्रतिनिधी हैद्राबाद येथील डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावर अमानुषपणे अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली, या घटनेचा कर्जत शहर भाजपच्या वतीने (दि. 4) निषेध करण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्षा कल्पना दस्ताने यांनी डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावर अत्याचार करून त्यांची हत्या करणार्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. …
Read More »खालापूरची पाताळगंगा नदी प्रदूषित, जलसंपदेसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात
खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका क्षेत्र व खालापूर तालुक्यातील अनेक गावांच्या पाणी योजना पाताळगंगा नदीवर अवलंबून आहेत. याच नदीच्या पाण्यावर येथील औद्योगिक क्षेत्र जिवंत आहे. मात्र तालुक्याची भाग्यविधाती असलेली पाताळगंगा नदी भरमसाठ प्रदूषणमुळे बेजार झाली आहे. पाताळगंगेचे प्रदूषण दिवसागणिक वाढत असल्याने या नदीतील जलसंपदा व नदी क्षेत्रातील हजारो नागरिकांचे आरोग्य …
Read More »ढगाळ हवामानाने आंबा, काजूपीक धोक्यात
म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यात गेले तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण आहे. गुरूवारी (दि. 5) पहाटे तालुक्यात काही ठिकाणी अवेळी पावसाचा शिडकाव झाला आहे. यामुळे आंबा व काजू बागायतदार हैराण झाले आहेत. बदललेले वातावरण आणि पावसाचा शिडकाव यामुळे आंबा व काजू पिकांच्या मोहराचे पर्यायाने पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. …
Read More »मजुराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल; शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार
कर्जत : बातमीदार नेरळजवळील ममदापुर येथील एका बांधकाम साईटवर महिला मजुराचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर बांधकाम साईटच्या ठेकेदाराने सदर मृतदेह कर्नाटक राज्यात गावी नेला. दरम्यान, या मृतदेहाचे शवविच्छेदन केले नसल्याने नेरळ पोलिसांनी ठेकेदारावर मनुष्यवधास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ममदापुर येथील ड्रीमज इन्फोटेक गार्डन व्ह्यू रेसिडेन्सी या इमारतीचे …
Read More »