Breaking News

Yearly Archives: 2019

सुरगडावर माहिती फलक, दुर्गवीर प्रतिष्ठानची मोहीम

पाली : प्रतिनिधी सुरगड किल्ल्यावर नुकतीच दुर्गवीर प्रतिष्ठानने माहिती फलक मोहीम राबविली. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या मोहीमेत एक मोठा महिती दर्शक फलक आणि ठिकठिकाणी स्थळ दर्शक लावले आहेत. त्यामुळे येथे येणार्‍या दुर्गप्रेमींना सुरगडाची व इतिहासाची माहिती मिळणार आहे.  साधारण पाच वर्ष टिकेल असा फलक बनवणे, त्याचा आकार ठरवणे, त्यातील माहिती – …

Read More »

खोपोलीत उद्यानाचे नामकरण

खोपोली : प्रतिनिधी येथील नगर परिषदेच्या वतीने विद्यानगर येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यानाचे रविवारी (दि.10) कै. डॉ. नरहर विष्णू भालेराव उद्यान असे नामकरण करण्यात आले.  जनता विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक स. के. आपटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील भालेराव यांनी केले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष …

Read More »

म्हसळा वाचनालयात बालदिन

म्हसळा : प्रातिनिधी येथील तालुका सार्वजनिक वाचनालयात गुरुवारी बालदिना निमित्त म्हसळ्यातील न्यू इंग्लीश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय म्हणजे काय? वाचन चळवळीचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व  या विषयी माहिती देण्यात आली. बालदिनाच्या निमित्ताने न्यू इंग्लीश स्कूलच्या सातवीतील  विद्यार्थ्यांनी गुरूवारी म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयाला   भेट दिली. शिक्षिका सविता शिंदे व शिक्षक चंद्रकांत गांजरे यांच्या …

Read More »

मुरूडमध्येही बालदिन उत्साहात साजरा

मुरुड : प्रतिनिधी पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना येथील अंजुमन इस्लाम जंजिरामहाविद्यालयामध्ये गुरुवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी बालदिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव  करण्यात आला. संस्थेचे खजिनदार अल्ताफ मलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते पं. नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. …

Read More »

बालदिनानिमित्त माथेरानच्या शाळांमध्ये कार्यक्रम

कर्जत : बातमीदार भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात येते. या बालदिनानिमित्त गुरुवारी (दि. 14) माथेरानमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, नगरपालिकेचे शिक्षण सभापती संदीप कदम व माजी शिक्षक सुनील कदम हे उपस्थित होते. माथेरान …

Read More »

विजेचा धक्का लागून माकड जायबंदी; प्राणीमित्र सरसावले

खोपोली : प्रतिनिधी शहरातील उषा नगरमधील समर्थ सोसायटी समोरील विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर गुरुवारी (दि. 14) सकाळी एका माकडाला विजेच्या धक्का बसून ते जबर जखमी झाले. त्या जायबंदी माकडाला सुरक्षितपणे काढून वाचवण्यासाठी येथील प्राणी मित्रांनी दोन तास मेहनत घेतली. विजेचा धक्का लागून माकड जायबंदी झाल्याची माहिती शहरातील प्राणी मित्र व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी …

Read More »

खोपोलीत महिलेवर चाकूहल्ला

खालापूर : प्रतिनिधी खोपोली शिळफाटा येथून कामावरून घरी चाललेल्या एका महिलेवर बुधवारी (दि. 13) सायंकाळी तीन ते चार बिहारी तरूणांनी धारदार चाकूने हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या महिलेने आरडाओरडा केल्याने हल्लेखोर पळून गेले. सदर महिलेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलांवर हल्ला करण्याची ही तिसरी घटना असल्याने शिळफाटा परिसरात …

Read More »

बिबट्याचे पुन्हा दर्शन, खालापुरातील नागरिकांत भीतीचे वातावरण

खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील नावंढे गावातून केळवली रेल्वे स्थानकाकङे जाणार्‍या रस्त्यावर सोमवारी ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले होते. मात्र या बिबट्याने पावसाळी वाढलेल्या गवतातून धूम ठोकली होती. गुरुवारी (दि. 14) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास केळवली गावाच्या शिवारात रेल्वेमार्ग ओलांडून बिबट्याने जांभरूंग गावाकडे धूम ठोकल्याचे ग्रामस्थांनी पाहिल्याने केळवली, खरवई, जांभरूंग गावात पुन्हा …

Read More »

चिवे आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील चिवे येथील अनुदानित आश्रमशाळेच्या दोन  विद्यार्थ्यांची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाली आहे. हे दोघेही डिसेंबर महिन्यात छत्तीसगड येथे होणार्‍या 65व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहेत. या निवडीमुळे चिवे आश्रमशाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. वाशीम येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी …

Read More »

ट्रेंट बोल्ट मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

मुंबई : प्रतिनिधी आयपीएलमधील गतविजेता संघ मुंबई इंडियन्स संघाने एक नवा खेळाडू आपल्या ताफ्यात सामील करून घेतला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला नव्या मोसमासाठी मुंबईने आपल्या संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. मागील वर्षी बोल्ट हा दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळला होता. बोल्टने 2014मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. …

Read More »