Breaking News

Yearly Archives: 2019

निकालाच्या पार्श्वभूमीवर संयम व शांतता पाळावी ः वपोनि लांडगे

पनवेल : वार्ताहर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांनी संयम व शांतता पाळावी, असे आवाहन आज पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत केले. अयोध्या प्रश्नावरील निकाल लवकरच लागणार असून, संपूर्ण देशात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर …

Read More »

मांडूळ विकण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक

पनवेल : बातमीदार दुतोंडी असलेला मांडूळ हा दुर्मिळ जातीचा साप घरामध्ये ठेवल्यास ऐश्वर्य मिळत असल्याच्या भूलथापा मारून मांडुळाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पनवेलमधील एसटी आगाराजवळून रविवारी रात्री अटक केली. प्रसाद जाधव (20) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळ असलेला सुमारे 50 लाख …

Read More »

रोजगारासाठी पनवेल पालिकेचे अॅजप, केंद्र, राज्य सरकारच्या योजना, सवलतींसह बचत गटांची माहिती

पनवेल : बातमीदार नोकरी आणि व्यवसायातील विविध संधी धुंडाळून त्या मिळविण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने पनवेल महापालिकेच्या वतीने एक मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या मोबाइल अ‍ॅपमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, सवलती यासह महिला बचत गट, पालिका क्षेत्रातील रोजगार संधी यांची माहितीही मिळणार आहे. केंद्र सरकारने देशातील …

Read More »

एक्स्प्रेस वेवर डिजिटल स्पीडो मीटर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालील पाठपुराव्याला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील सुरक्षिततेवर कळंबोली येथील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी बोट ठेवले होते. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित यंत्रणांकडून पाठपुरावा केला होता. त्यानुसार महामार्गावरील खड्डे त्याचबरोबर इतर त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. आता या ठिकाणी वाहनचालकांना त्यांच्या वेगाची आठवण …

Read More »

अवघ्या 270 रुपयांसाठी पाच बळी

टोल वाचविण्यासाठी जुन्या हायवेवरून प्रवास खोपोली ः प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (दि. 4) खासगी बसच्या अपघाताला बसचालक बद्रिनाथ पोपट गोसावी हाच जबाबदार असून, टोलचे 270 रुपये वाचविण्यासाठी मारलेला शॉर्टकट पाच जणांचे बळी आणि 40 जणांना जखमी करणारा ठरला. सोमवारी पहाटे खासगी बस (क्रमांक एमएच-04-एफके-1599) कराडहून मुंबईच्या दिशेने 49 …

Read More »

माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे निधन

अकोला ः प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी जलसंधारण मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे मंगळवारी (दि. 5) मुंबईत निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी 11.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धाबा येथील घरी त्यांचे पार्थिव बुधवारी अंत्यदर्शनासाठी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा रेल्वे प्रवाशांशी संवाद

समस्या घेतल्या जाणून, अधिकार्‍यांना केल्या सूचना पनवेल ः रामप्रहर वृत्त दरदिवशी पनवेल रेल्वे स्थानकातून हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामुळे या रेल्वे स्थानकाचे महत्त्व अनन्यसाधारण असून प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 5) रेल्वे स्थानकाची पाहणी करून प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा …

Read More »

पेणमध्ये भिंतीवरील चित्रातून स्वच्छतेचा संदेश

पेण : प्रतिनिधी नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत असणार्‍या स्वच्छ अभियानांतर्गत कार्यालयाच्या आवारातील भिंतीवर विविध प्रकारची चित्रे रेखाटून, सुविचार लिहून नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम करण्यात आले आहे. स्वच्छता हीच सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत पेण नगर परिषदेने विविध उपक्रम हाती घेतले असून, शहरातील महिला, विद्यार्थी यांच्याबरोबर कर्मचार्‍यांनाही …

Read More »

लाच देऊ नका आणि घेऊ नका, उपअधीक्षक अधिकराव पोळ यांचे आवाहन

मुरूड : प्रतिनिधी शासकीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचार्‍यांना शासनाकडून पगार दिला जातो. त्यामुळे जनतेची कामे करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, मात्र ते काम पूर्ण करण्यासाठी ते अतिरिक्त रक्कम स्वीकारत असतात. अशा पद्धतीला आळा बसण्यासाठी लाचलुचपत विभागाची उभारणी करण्यात आली असून, लोकांनी या विभागाकडे तक्रार नोंदवावी व लाच पद्धतीला कायमस्वरूपी  प्रतिबंध …

Read More »

गव्हाण विद्यालयात वृक्षारोपण

गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमधील एसएससी परीक्षा मार्च 2020मध्ये प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षेचे आवेदनपत्र नोंदणीचा शुभारंभ विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून झाला. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ …

Read More »