Breaking News

Yearly Archives: 2019

वैश्य समाज महासंघातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप

पनवेल : बातमीदार शहाबाज बेलापूर गटाच्या वतीने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना बालवाडी ते सातवीपर्यंतच्या मुलांना मोफत वह्या, पेन, पेन्सिल, खाऊ, तसेच पाट्या वाटपाचा उपक्रम पनवेल तालुक्यातील कळंबोली तर्फे तळोजा येथील ग्रामपंचायतीच्या शाळेमध्ये करण्यात आले.  या वेळी वैश्य समाज संघ, शहाबाज बेलापूर गटाचे गट सभापती ओंकार दिलीप गंधे, शिक्षण समिती सदस्य …

Read More »

वारदोली येथे आरएमसी प्लांटचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील वारदोली येथे पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांच्या सुनीता पाटील कंस्ट्रशन कंपनीचा आरएमसी प्लांट सुरू झाला आहे. या प्लांटचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 15) करण्यात आले. या वेळी पनवेल महापालकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, पळस्पे विभागीयत अध्यक्ष …

Read More »

आगरी साहित्य विकास मंडळाच्या उपाध्यक्षपदी धनंजय गोंधळी

चिरनेर : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे उरण, पनवेल, रायगड, नवी मुंबई परिसरात पत्रकारिता व साहित्य क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारे व आपल्या साहित्यिक, तसेच समाजसेवेतून जनतेला सहकार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोंधळी यांची आगरी साहित्य विकास मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. मंडळाचे अध्यक्ष मोहन भोईर यांनी वाशी (नवी मुंबई) येथील गुरव हॉलमध्ये …

Read More »

पनवेल व मोहो येथे विद्यार्थ्यांना वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मोहो गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. 15) करण्यात आले होते. हा कार्यक्रम भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्याचप्रमाणे पनवेल एसटी स्टँडजवळ असलेल्या श्री गुरुलिंगेश्वर मराठी प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप कार्यक्रमाचे …

Read More »

गुरू ः एक भावनासुद्धा!

मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा ते मातीच्या गोळ्याप्रमाणे असते. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला सुबक, घाटदार व चित्ताकर्षक मृत्तिकापात्र बनविण्यासाठी चांगल्या कुंभाराची गरज असते, त्याचप्रमाणे मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मार्गदर्शकाची अथवा गुरूची  आवश्यकता असते.  मुलाची वैचारिक बैठक पक्की करण्यासाठी तसेच त्याच्या विचारांना प्रगतिकारक दिशा देण्यासाठी गुरूची फार महत्त्वाची भूमिका असते. सुसंस्कृत विचार करण्याची …

Read More »

खांदा कॉलनीतील कराटेपटूंचे यश

पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथे झालेल्या आठव्या रायगड जिल्हा युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत खांदा कॉलनीतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत प्रत्येकी तीन सुवर्ण व रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण सात पदके जिंकली. विजेत्यांची 27 व 28 जुलै रोजी कोल्हापूर येथे होणार्‍या राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत हर्षदा …

Read More »

विम्बल्डन जेतेपदाचा जोकोविचचा ‘पंच’

लंडन : वृत्तसंस्था दोलायमान सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने दुसर्‍या मानांकित रॉजर फेडररला पराभूत करीत पाचव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकाविले. सुमारे चार तास 55 मिनिटे चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात जोकोविचने फेडररला 7-6, 1-6, 7-6, 4-6, 13-12 अशा सेटने पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सर्व्हिस राखली. फेडररलाच 2-1 या स्कोअरवर एक ब्रेकपॉइंट …

Read More »

‘त्या’साठी मी आयुष्यभर न्यूझीलंडची माफी मागेन : स्टोक्स

लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक क्षणी इंग्लंडला मिळालेल्या चार अतिरिक्त धावांबाबत विजयाचा शिल्पकार बेन स्टोक्सने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तशा प्रकारे धावा मिळविण्याचा माझा हेतू नव्हता. चेंडू माझ्या बॅटला लागून सीमारेषेपार गेला. त्यासाठी मी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची माफी मागितली. मी केनला म्हणालो की, या घटनेसाठी …

Read More »

इंग्लंड नवा विश्वविजेता

रोमहर्षक अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ‘सुपर’ विजय लॉर्ड्स : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने 50 षटकांत 241 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील 241 धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकारांच्या निकषावर …

Read More »

द्रोणागिरी हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धेसह शार्क संवर्धन दिन साजरा

करंजा : रामप्रहर वृत्त द्रोणागिरी हायस्कूल करंजा येथे रविवारी (दि. 14) जागतिक शार्क संवर्धन दिनानिमित्त वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेने संरक्षित सागरी जीव बचाव करण्यासाठी कार्यशाळेचे व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या वेळी सागरी जीव संशोधन करणारे स्वप्नील तांडेल यांनी शार्क माशांच्या संवर्धनासाठी मार्गदर्शन केले. या वेळी …

Read More »