माथेरान ः प्रतिनिधी दरवर्षी माथेरान नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासकामे केली जात असतात. काही ऑनलाइन निविदा प्रक्रिया असतात तर काही ऑफलाइन असतात. यामध्ये ऑफलाइन निविदांची बहुतांश कामे ही स्थानिकांना दिली जात नाहीत. परिसरातील आपल्याच एखाद्या मर्जीतील व्यक्तीला इथल्या विकास कामांमध्ये समाविष्ट केले जात आहे. तर स्थानिक कार्यकर्ते हे केवळ निवडणुकीपुरता झेंडा हाती …
Read More »Yearly Archives: 2019
कुर्ला-भीमाशंकर बसला खालापुरात अपघात
खालापूर ः प्रतिनिधी कुर्ला बस स्थानकाची एसटी महामंडळाची बस भीमाशंकर येथे जात असताना मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर कलोते गावच्या हद्दीत माधवबागसमोर बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही बस दोन्ही मार्गाच्यामध्ये जाऊन आदळली. या अपघातात दोन प्रवासी व बसचा चालक जखमी झाल्याने या सर्वांना महात्मा गांधी रुग्णालय कळंबोली येथे दाखल करण्यात आले …
Read More »धनगर समाजाने केली माथेरानमध्ये वृक्षलागवड
माथेरान ः प्रतिनिधी माथेरानमध्ये पावसाळ्यात विविध संघटना तसेच राजकीय, सामाजिक मंडळींनी वृक्षारोपण करण्यासाठी सुरुवात केल्यानंतर इथला स्थानिक धनगर समाजसुध्दा मागे पडला नाही. धनगर समाजाने आपल्या समाजबांधवांना सोबत घेऊन गावातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करून गावात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिलांनीसुद्धा स्वेच्छेने पुढाकार घेत या गावातील …
Read More »कर्जतमध्ये शिधापत्रिका व गॅस जोडणी विशेष मोहीम
कर्जत ः बातमीदार सर्वसामान्य आणि गरीब लाभार्थी यांना शिधावाटप दुकानात नियमानुसार धान्य मिळावे, यासाठी महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचवेळी गॅस जोडणीमधील त्रुटी दूर करून गॅस जोडणी सहज उपलब्ध व्हावी, यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेची सुरूवात कर्जत तहसिल कार्यालयात करण्यात आली, त्यावेळी सबंधित यंत्रणांना …
Read More »शासनाच्या राष्ट्रीय अन्न योजनेला सुरुवात
चौक ः प्रतिनिधी शासनाच्या राष्ट्रीय अन्न योजनेअंतर्गत सुरू झालेल्या अभियानात महसूल अधिकारी, कर्मचारी, रेशन दुकानदार यांनी सामील होऊन हे अभियान यशस्वीपणे पार पाडावे, कुणीही पात्र लाभार्थी वंचित रहाता कामा नये, असे आवाहन पुठवठा विभाग कोकण आयुक्त शिवाजी कादबाने यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न योजनेअंतर्गत 100 टक्के शिधापत्रिका वाटप, …
Read More »पुराच्या पाण्यात दहिवली गावाच्या स्मशानभूमीची शेड गेली वाहून
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उल्हासनदीच्या दहिवली-मालेगाव पुलालगत असलेल्या स्मशानभूमी अंत्यसंस्कार शेडचे पावसाच्या पाण्याने नुकसान झाले आहे. नदीच्या धामोतेकडील बाजूस असलेल्या स्मशानभूमी शेडचे लोखंडी खांब आणि पत्रे जमिनीवर पडून वाहून गेले आहेत. ही गरज लक्षात घेऊन दहिवली ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कोसळलेले पत्र्याचे शेड बाजूला करून …
Read More »खोपोलीतील 30 विद्यार्थी एसपीसीमध्ये सहभागी
खोपोली ः बातमीदार खोपोलीतील छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालयात रायगड जिल्हा पोलिस आयोजित एसपीपी (स्टुडंट पोलीस कॅडेट) या केंद्र शासनाच्या बहुउद्देशीय कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अभियानात माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीमधील 15 मुले व 15 मुली अशा 30 कॅडेट्सची निवड करण्यात आली. एसपीसीमध्ये विविध बाबींचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले …
Read More »भिलवले पूल धोकायदायक
खोपोली : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे भिलवले-वावंढळ रस्त्यावरील जिल्हा परिषदेच्या पुलाला धोका निर्माण झाला असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सतत पडणार्या मुसळधार पावसामुळे उंचीने कमी असलेल्या या पुलावरून पाणी जात होते. वाहून आलेल्या कचर्याचे साम्राज्य या पुलावर तयार झाले आहे. मोठमोठ्या खड्ड्यात हा पूल उभा असून पुलाचे कठडे दिसत नाहीत. …
Read More »कशेडीतील भुयारी मार्गाची चंद्रकांतदादांकडून पाहणी
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणादरम्यान पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात नियोजित भुयारी मार्गाचे काम सुरू झाले असून, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 14) येथे येऊन त्याची पाहणी केली. यासोबतच त्यांनी महामार्गावरून मोटारीने प्रवास करून ठिकठिकाणी चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. शनिवारी आंबेनळी घाटातून पोलादपूरमार्गे चिपळूण असा दौरा केल्यानंतर …
Read More »खेड, चिपळूणमध्ये पाणी शिरले
खेड, चिपळूण : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसामुळे जगबुडी आणि वाशिष्ठी नद्यांना पूर येऊन चिपळूण आणि खेडमध्ये सोमवारी (दि. 15) पाणी शिरले होते. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेला. याशिवाय दापोली मार्गही जलमय झाल्याने बंद करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत सुरू असलेला पाऊस आणि सातारा जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper