उरण : प्रतिनिधी उरण पूर्व विभागात कार्यरत असलेल्या आम्ही पिरकोनकर समूहातर्फे सालाबादप्रमाणे नुकतीच पावसाळी क्रिकेट स्पर्धा पिरकोन प्रीमियर लीग घेण्यात आली. गुणवंत स्पोर्ट्स हा संघ पीपीएलचा विजेता ठरला. पिरकोन गावातील आठ संघांकडून उरण पूर्व भागातील प्रत्येकी दोन आयकॉन खेळाडू खेळताना दिसले. या स्पर्धेत विजय स्पोर्ट्स संघ उपविजेता ठरला. उत्कृष्ट फलंदाज …
Read More »Yearly Archives: 2019
जाधवऐवजी जडेजाला संधी द्या : सचिन
मुंबई : प्रतिनिधी केदार जाधवऐवजी रवींद्र जडेजाला संघात संधी द्यायला हवी, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे. विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा 31 धावांनी पराभव झाला. या सामन्याचे विश्लेषण करताना सचिन तेंडुलकरने संथ फलंदाजी करणार्या जाधवऐवजी जडेजाला संधी देण्यात यावी, असे म्हटले. सचिन म्हणाला, इंग्लंडची सलामीच्या …
Read More »विजय शंकर ‘आऊट’; मयंक अग्रवालला संधी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अजून एक धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू विजय शंकर दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. आधी शिखर धवन आणि नंतर विजय शंकर दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्याने भारतीय संघासमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विजय शंकरच्या जागी मयांक अग्रवालला संधी देण्यात आली आहे. नेट प्रॅक्टिस …
Read More »भारताच्या पराभवाने पाकला धाकधूक
बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत निर्णायक सामन्यामध्ये दमदार खेळ करीत यजमान इंग्लंडने भारतावर 31 धावांनी विजय मिळवला. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या गोटात चिंतेच वातावरण पसरले आहे. उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी पाकला बांगलादेशविरुद्ध विजयासोबत इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून रहावे लागणार आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 337 धावा फटकावल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग …
Read More »रायगडातील प्रकल्पांना गती वाहतूक आणि पायाभूत ; सुविधांना शासनाचे प्राधान्य
मुंबई : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात ट्रान्स हार्बर लिंक, कॉरिडॉर, नैना आदी प्रकल्प विकासाच्या दृष्टिकोनातून शासन गतीने राबवत आहे. वाहतूक आणि पायाभूत सुविधांना शासनाचे प्राधान्य असून, त्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात येत आहे. मुंबई शहर व महानगर प्रदेश क्षेत्राचा विकास आणि समस्यांच्या अनुषंगाने विधानसभेत उपस्थित नियम 293च्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री …
Read More »जल संरक्षणासाठी सर्वांनी एकजूट व्हावे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील कोट्यवधी जनतेला विकास हवा आहे आणि त्यासाठीच त्यांनी मला सेवा करण्याची पुन्हा संधी दिली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 30) आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या दुसर्या कार्यकाळातील पहिल्याच मन की बात कार्यक्रमात त्यांनी जल संरक्षणासाठी सर्वांनी एकजूट होण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी या …
Read More »500 वारकर्यांची आरोग्य तपासणी ; कर्जत मेडिकल असोसिएशनकडून सुश्रुषा
कर्जत : बातमीदार आषाढी वारीमध्ये विठूरायाचा नामघोष करीत असंख्य वारकरी देहभान विसरून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. या वारकर्यांची सेवा करण्याचा स्तुत्य उपक्रम कर्जत मेडिकल असोसिएशनने राबविला. असोसिएशनच्या सदस्यांनी वारीतील सुमारे 500 वारकर्यांची आरोग्य तपासणी करून भक्ती व बांधिलकीचे अनोखे दर्शन घडविले आहे. कर्जत मेडिकल असोसिएशनचे एक पथक अध्यक्ष डॉ. गणेश …
Read More »अलिबाग, नागाव किनारे तेल तवंगाने काळवंडले
अलिबाग : प्रतिनिधी खवळलेल्या समुद्राच्या लाटांबरोबर तेलाचा तवंग मोठ्या प्रमाणावर किनार्यावर येत असल्याने सध्या अलिबाग व नागाव हे सुंदर किनारे काळवंडले आहेत. तेलामुळे किनारे चिकटही झाले असून, त्याचा त्रास पर्यटकांना सहन करावा लागतोय. तेल तवंगामुळे परिसर निसरडा होऊन लोक पाय घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. खोल समुद्रात मालवाहू जहाजे इंधन …
Read More »…अन् मुरूडकरांचा जीव पडला भांड्यात
मुरूड : येथील समुद्रकिनारी लोखंडी व त्यावर वाहनांचे टायर लावलेली वस्तू वाहून आल्याने स्थानिक नागरिकांत घबराट पसरली होती. सरतेशेवटी तो बोटींना दिशा दर्शविण्यासाठी असलेला बोया असल्याचे स्पष्ट झाल्याने मुरूडकरांचा जीव भांड्यात पडला. मोठ्या आकाराची वस्तू समुद्रकिनारी आल्याने स्थानिक नागरिक व पर्यटकसुद्धा धास्तावले होते. याबाबत तत्काळ मुरूड पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी …
Read More »उद्योजकांसाठी प्रदर्शन
पनवेल : अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद आणि पेडणेकर कुटुंबीय यांच्या वतीने समाजश्रेष्ठी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त लघू व गृहउद्योग करणार्या उद्योजकांसाठी उत्पादनाचे प्रदर्शन, विक्री आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नागरिक सभागृहात झालेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper