Breaking News

Yearly Archives: 2019

‘शासकीय योजनांच्या माध्यमातून पेण तालुक्याचा विकास साधणार’

पेण : प्रतिनिधी : सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून पेण तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास साधणार असल्याची ग्वाही पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी काळेश्री येथे दिली. पेण तालुक्यातील काळेश्री ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पेणच्या नगराध्यक्षा  प्रीतम पाटील, वढाव नवनिर्वाचित सरपंच पूजा अशोक पाटील, उपसरपंच ओमकार म्हात्रे, …

Read More »

संभाजी महाराजांचे शूरत्व जगावेगळे -वसंत कोळंबे

कर्जत : बातमीदार : छत्रपती संभाजी महाराज यांनी रणांगणात गाजवलेले शूरत्व हे सामान्य सैनिकांसाठी ऊर्जा आणि स्फूर्ती देणारे होते, असे गौरवोद्गाार इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी कर्जतजवळील किरवली येथे काढले. किरवली येथे छत्रपती संभाजी महाराज ग्रुपच्या वतीने नामकरण करण्यात आलेल्या श्री संभाजी महाराज चौकाचे उद्घाटन इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांच्या …

Read More »

कर्जत-लोणावळा मार्गावरील प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात; पॅसेंजर असोसिएशनची मागणी

कर्जत : बातमीदार व्यापार उदीम आणि आपल्या नातेवाईकांकडे कर्जत तालुक्यातील प्रवाशी मोठ्या संख्येने पुणे भागात जात असतात. मात्र पुण्याकडे जाण्यासाठी असलेल्या अपुर्‍या व्यवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असतात. त्यामुळे कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने रेल्वे मंत्रालयाला दिलेल्या निवेदनात पनवेल मार्गे जाणार्‍या व येणार्‍या सर्व मेल, एक्स्प्रेस गाड्यां तसेच पुणे रेल्वे स्थानकातून सुटणार्‍या …

Read More »

आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन अलिबाग : जिमाका : लोकसभा निवडणूक 2019 आचारसंहिता 10 मार्चपासून लागू झाली आहे. ही निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडतानाच आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर  भर दिला जाईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. 11) पत्रकारांना सांगितले. लोकसभा …

Read More »

महेश भिंगाकर ठरला ‘रायगड श्री’चा मानकरी

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथे झालेल्या आमदार प्रशांत ठाकूर रायगड श्री 2019 जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत महेश भिंगाकर याने रायगड श्री किताब पटकाविला. त्याला 51 हजार रुपये, मानाचा पट्टा व चषक देऊन गौरविण्यात आले. रायगड जिल्ह्याच्या अनेक भागांतून शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेऊन या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रायगड बॉडी बिल्डर्स …

Read More »

वोडाफोनच्या ‘या’ ग्राहकांना वर्षभराचा नेटफ्लिक्स फ्री

अन्य देशांप्रमाणे भारतातही ऑन डिमांड व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. अवघ्या वर्षभरात अ‍ॅमेझॉन व्हिडीओ आणि नेटफ्लिक्स अ‍ॅप्स चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. भारतातील टेलिकॉम कंपन्यांनी या अ‍ॅप्ससोबत करार केला आहे. वोडाफोनने सॅमसंगच्या नव्या फ्लॅगशीप स्मार्टफोन गॅलेक्सी एस10ई, गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 सोबत करार केला आहे. या तीनही …

Read More »

महिला ठरवणार रायगडचा खासदार

अलिबाग : प्रकाश सोनवडेकर नुकत्याच झालेल्या मतदार नोंदणीनुसार रायगड लोकसभा मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या 31 हजार 694ने जास्त आहे. त्यामुळे रागयडचा खासदार कोण असेल, हे महिला ठरविणार आहेत. रायगड लोकसभा मतदासंघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड हे रायगड जिल्ह्यातील चार आणि दापोली व गुहागर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन …

Read More »

स्वाईन फ्लू : आजार आणि उपचार

राज्यात सततच्या होणार्‍या तापमान बदलामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. स्वाईन फ्लू रुग्णाने त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. याबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वाईन फ्लूवर ऑसेलटॅमीवीर म्हणजेच ‘टेमिफ्लू’ हे औषध उपलब्ध आहे. स्वाईन फ्लू सदृश लक्षणे (सर्दी, ताप) दिसल्यास 24 तासांमध्ये टेमिफ्लूचे औषध …

Read More »

आमदार शरद सोनावणे शिवसेनेत

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार  शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेला धक्का बसला असून, विधानसभेतील मनसेची पाटी कोरी झाली आहे. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आमदार सोनावणे यांनी सोमवारी (दि. 11) शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची …

Read More »

कार अपघातात दोघांचा मृत्यू; तिघे जखमी

पनवेल : बातमीदार मुंबई-पुणे महामार्गावरील भोकरपाडा गावाजवळ रविवारी (दि. 10) रात्री 10.30च्या सुमारास झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला; तर इतर तिघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सर्वेश माळी (वय 22, रा. सावळे, ता. पनवेल), भानुदास मालकर (वय 40, रा. तळवळी, ता. पनवेल) यांचा समावेश आहे. सर्वेश आणि भानुदास हे दोघे आपल्या …

Read More »