Breaking News

Monthly Archives: March 2020

चुकीचा मेसेज तरुणाला भोवला; नेरळमध्ये पोलिसांची कारवाई

कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील संचारबंदीच्या काळात नेरळ बाजारपेठ बंद असणार आहे, पण त्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात बाजार भरला जाणार आहे. दरम्यान, नेरळमध्ये कोरोनाबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती देणार्‍या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरळ गावातील बाजारपेठेमध्ये 23 मार्च रोजी पोलिसांना लाठीचार्ज करावा …

Read More »

कोरोना : समज-गैरसमज

कोरोनाचा संशयित किंवा कोरोनाबाधित व्यक्ती ही काही वाळीत टाकण्याजोगी नसते. अशा व्यक्तीची काही चूक देखील नसते. परंतु अशा व्यक्तींना जवळपास वाळीत टाकण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत आढळून आल्या आहेत. तर कोरोनाविषयीच्या या सार्‍याभ्रामक समजुती तातडीने दूर करायला हव्यात. किंबहुना, या लढाईचे स्वरुपच ते आहे. डोळ्यांनी दिसत नसलेल्या शत्रूशी लढणे अतिशय …

Read More »

निरोगी आरोग्याची गुढी उभारण्याचा संकल्प

पनवेल : रामप्रहर वृत्त गुढीपाडव्याचा सण बुधवारी (दि. 24) पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा निरोगी आरोग्याची गुढी उभारण्याचा संकल्प नागरिकांनी केल्याचे दिसून आले. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षारंभ होतो. भारतीय संस्कृतीत चैत्र महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. केवळ धार्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिकच नव्हे, तर आरोग्याच्या …

Read More »

आजपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची मोठी घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासह जगभरात कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसर्‍यांदा देशाला संबोधित करताना बुधवारी (दि. 24) संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याची मोठी घोषणा केली आहे. मोदी म्हणाले की, जनता कर्फ्यूने दाखवून दिले की देशावर ज्या वेळी कोणतेही संकट येते तेव्हा …

Read More »

बेपर्वाईची किंमत

कोरोना विषाणूची साथ किती गंभीर आहे याबद्दल पुरेशी जागरुकता समाजाच्या सर्व स्तरांमध्ये अद्याप निर्माण झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक लोकांना कोरोनाच्या महासंकटाबद्दल फारशी माहिती नाही. मास्क लावणे, वारंवार हात धुणे अशा सावधगिरीच्या क्रिया अनेकांना चक्क विनोदी वाटतात. कडक निर्बंध लादून सरकार अतिरेक करीत असल्याची भावना काही अर्धशिक्षित मध्यमवर्गीयांमध्ये दिसून …

Read More »

राज्यसभेची निवडणूक पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यसभेच्या 18 जागांसाठी 26 मार्च रोजी होणारी निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 26 मार्चला देशभरातील सात राज्यांमध्ये एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक होणार होती. राज्यसभेत रिक्त झालेल्या एकूण 55 जागांवर केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यायची आहे. त्यापैकी 37 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली …

Read More »

मास्कचा काळाबाजार करणार्यांना मोक्का लावा -आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी वांद्रे येथे मास्कचा काळाबाजार करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी मास्कचा साठा करून काळाबाजार करणार्‍यांवर मोक्कांतर्गत कारवाई करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत आहे, मात्र …

Read More »

राज्यात कोरोनाचा चौथा बळी

65 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू मुंबई : प्रतिनिधी जगभरात थैमान घालणार्‍या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच असून राज्यात मंगळवारी (दि. 24) कोरोनामुळे 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. या मृत्यूमुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा आता चारवर गेला आहे. मंगळवारी मृत्यू झालेला इसम 15 मार्च रोजी …

Read More »

गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा -राज्यपाल

मुंबई ः प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होतानाच यंदा आपले राज्य तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकटातून जात आहे. शासनातर्फे या संकटाला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याशिवाय हे शक्य नाही. यास्तव शासनाला सहकार्य …

Read More »

आपत्कालीन ग्रुपकडून सीसीटीव्हीची डागडुजी

खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या बिकट संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात संचारबंदी सुरू आहे. खोपोली शहरात पोलिसांच्या कार्याला मदत करणारा तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे व खांबाची स्थिती सुस्थितीत राखण्यासाठी खोपोली आपत्कालीन मदत ग्रुपच्या सदस्यांनी डागडुजी आणि दुरुस्ती केली. शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे खांब एकतर वाकले किंवा झुकले होते. त्यामुळे अपघाताच्या शक्यतेसह …

Read More »