Breaking News

Monthly Archives: May 2020

नेऊली, आरसीएफ शाळेत कोरोना केअर सेंटर्स

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कोरोना केअर सेंटर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार अलिबाग येथे नेऊली येथील जिल्हा क्रीडा संकुल आणि आरसीएफ शाळेत कोरोना केअर सेंटर्सची उभारणी केली जात आहे. यात लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत. अलिबाग येथे …

Read More »

गडबमधील तरुणाची गगनभरारी; चार लघुग्रहांचे संशोधन

पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील गडब येथील अवकाश संशोधनाचा विद्यार्थी प्रज्ञेश म्हात्रे या तरुणाने संशोधन मोहिमेत चार लघुग्रहांचे संशोधन केले आहे. सध्या देशभर लॉकडाऊन असले तरी ऑनलाइन अभ्यास सुरू आहेत. रिसर्च संस्थेचाही ऑनलाइन अभ्यास सुरू असल्याने या तरुणाने एप्रिल ते मे महिन्यात नासाकडून आयोजित केलेल्या इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅब्रेशन मोहिमेत …

Read More »

मधमाशांचे पोळे होताहेत नामशेष; वृक्षतोड, वणवे, प्रदूषण ठरतेय कारणीभूत

माणगाव ः प्रतिनिधी  कीटकसृष्टीतील सामूहिक वर्तन करणारा मधमाशी कीटक व त्यांचे पोळे जंगलातून नामशेष होत असून एप्रिल-मे महिन्यात मिळणारे मधाचे पोळे दिसेनासे झाले आहे. पूर्वी समृद्ध अशा वनांमध्ये झाडांवर, कातळाच्या कड्यांना, झाडांच्या डोलीत मिळणारे मधाचे पोळे आता मिळेनासे झाले आहेत. वाढती वृक्षतोड, वणवे, कीटकनाशकांचा अतिवापर व वाढणार्‍या प्रदूषणामुळे मधमाशांचे नैसर्गिक …

Read More »

कोरोनामुळे रायगडात चौघांचा मृत्यू; 60 नवे रुग्ण

नवी मुंबईत पाच जण मृत्युमुखी; 79 व्यक्ती पॉझिटिव्ह पनवेल, नवी मुंबई : कोरोनामुळे रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 28) चार जणांचा मृत्यू झाला असून, 60 पॉझिटिव्ह आढळले आहेत. मृतांमध्ये पनवेल तालुक्यातील खारघर, उसर्ली खुर्द व करंजाडे तसेच म्हसळा तालुक्यातील दुर्गवाडी येथील व्यक्तीचा समावेश आहे. याशिवाय पनवेल महापालिका हद्दीत 18, अलिबाग 11, …

Read More »

इयत्ता दहावीच्या निकालाचा मार्ग मोकळा

मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दहावीच्या सामाजिक शास्त्रे पेपर-2 (भूगोल) व दिव्यांग कार्यशिक्षण या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या विषयांच्या गुणदानासंदर्भात शिक्षण मंडळाने पर्याय शोधला आहे. इतर विषयांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्या …

Read More »

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पनवेल दौरा

कोरोनाग्रस्तांच्या व्यवस्थेची पाहणी, चर्चा आणि आढावा पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 27) कामोठे एमजीएम रुग्णालय, कोन येथील इंडिया बुल्स आणि पनवेल महापालिकेला भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी …

Read More »

आघाडी सरकार खोटारडे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्राच्या जनतेला मित्र कोण आणि शत्रू कोण हे चांगलेच माहीत आहे. सरकारला आम्ही मदतच करीत आहोत, पण खोटे बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 27) येथे …

Read More »

कोविड-19 : सीकेटी महाविद्यालयात ऑनलाइन चर्चासत्र

देशभरातील आठशेहून अधिक प्राध्यापकांचा उर्त्स्फूत सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तशिक्षणासह कला, क्रीडा, गुणवत्ता आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या नॅक पुनर्मूल्यांकनद्वारे ए प्लस दर्जा मानांकित, विद्यापीठ अनुदान आयोगाचे श्रेष्ठत्व सक्षम महाविद्यालय दर्जा आणि मुंबई विद्यापीठाचे सर्वोत्कृष्टमहाविद्यालय पारितोषिक प्राप्त करणार्‍या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, …

Read More »

रायगड जिल्हा रेड झोनमध्ये जाणार नाही

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचा दावा अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणदेखील जास्त आहे. जे रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यापैकी एकालाही धोका नाही. त्यामुळे येत्या काळात रायगडा जिल्हा रेड झोनमध्ये जाणार नाही, असा दावा रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बुधवारी (दि. 27) …

Read More »

राज्य सरकार गोंधळलेले

विरोधी पक्षनेेते देवेेंद्र फडणवीस यांच्या घणाघाती टीकेमुळे हडबडून गेलेल्या सत्तधारी आघाडीने बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. इतक्या वेगाने आणि झपाट्याने सरकार कार्यरत असल्याचे याआधी कधी दिसून आले नव्हते. तसे ते असते तर महाराष्ट्राची कोरोनासंबंधात आज जी केविलवाणी अवस्था आहे तशी ती अर्थातच नसती. भारतातील कोरोना …

Read More »