Breaking News

Monthly Archives: May 2020

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

उरण : वार्ताहरकोरोना महामारीच्या काळात अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भाजप युवा मोर्चा उरणच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि. 31) उरणमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.  जेएनपीटी टाऊनशिप मल्टिपर्पज हॉल येथे सकाळी 9 ते दुपारी …

Read More »

कोरोनामुळे कर्जत, नेरळ बाजारपेठ तीन दिवस बंद

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात कोरोनाचे आणखी रुग्ण वाढू नयेत यासाठी खबरदारी म्हणून 28 ते 30 मे या कालावधीत कर्जत आणि नेरळ बाजारपेठ बंद राहणार आहे. नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन्ही प्रमुख शहरांतील सर्व व्यवहार ठप्प असून, कडकडीत बंद पाळला जात आहे.कर्जत तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 20 झाली …

Read More »

मुंबईतही टोळधाड? कीटक दिसल्याचा दावा

मुंबई : प्रतिनिधीआफ्रिकेतून निघालेली टोळधाड येमेन, इराण, पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचली. देशातील अनेक राज्यांत पिकांचे नुकसान करणारे हे कीटक आता मुंबईत दाखल झाले आहेत. विक्रोळी, ताडदेव, वरळी भागात मोठ्या संख्येने टोळ दृष्टीस पडल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या 27 वर्षांमधील सर्वांत मोठे टोळ संकट राज्यात आले आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा …

Read More »

भीती टोळधाडीची!

लोक एका विचित्र मन:स्थितीत आहेत. दोन महिने घरात कोंडून घेऊन राहणे ही सोपी गोष्ट अजिबातच नाही. त्यामुळेच आता खरोखरीच लोकांचा धीर हलकेहलके ओसरू लागला आहे. असेच किती काळ बसायचे ही भावना बळावते आहेच. पण त्याचवेळेला राज्यातील व विशेषत: मुंबईतील करोनासंदर्भातील वाढती आकडेवारी लोकांना धास्तावतेही आहे. कोरोनाच्या फैलावामुळे मार्चच्या अखेरीस देशात …

Read More »

कोपरखैरणे, तुर्भे विभागातील कंटेन्मेंट झोनमध्ये मास स्क्रिनिंग

नवी मुंबई : बातमीदार कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करताना विशेषत्वाने कोपरखैरणे व तुर्भे विभागात मागील काही दिवसात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेने कोपरखैरणे व तुर्भे या दोन्ही विभागातील कंटेन्मेंट झोनमध्ये मास स्क्रिनिंगची मोहीम हाती घेतली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालय आणि …

Read More »

लॉकडाऊनच्या काळातही आंबा निर्यातीला मोठे यश

नवी मुंबई : विमाका लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतुक सेवा मर्यादीत असताना कोकणातील आठ हजार 640 मे.टन आंब्याची निर्यात कृषि विभागामार्फत करण्यात आली. 1 एप्रिल ते 19 मे या कालावधीत केळी, कांदा, द्राक्षे, डाळिंब, लिंबू, मिरची, आले व इतर भाजीपाला व फळे मिळून एकूण दोन लाख 99 हजार 950 मे. …

Read More »

‘अमेया लॉजिस्टीक’ने जपली सामाजिक बांधिलकी

खोपटे येथे अन्नधान्यासह सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग मशीन पनवेल : वार्ताहर उरण तालुक्यातील खोपटे गावात धसाखोशी पाड्याजवळ वसलेल्या अमेया लॉजिस्टीक पार्क नामक कंटेनर यार्डने सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे समोर आले आहे. कंपनीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचे सीईओ पर्सी वापीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली खोपटा गावातील गरजू नागरीकांसाठी तांदूळ वाटप केले आहे. त्याचबरोबर खोपटे …

Read More »

पोलीस असल्याचे सांगून कामोठ्यात दागिन्यांची चोरी

पनवेल : बातमीदार पोलीस असल्याचे सांगून एका 70 वर्षीय पुरुषाच्या हातातील व गळ्यातील 60 हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना कामोठे येथे घडली आहे. अज्ञातांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामोठे, सेक्टर 21 येथील भीमराव भैरू पाटील हे सोसायटीच्या बिल्डिंगच्या खाली बसलेले होते. या वेळी त्यांच्याजवळ …

Read More »

मासळी सुकविण्याकडे विक्रेत्यांचा आता कल

उरण : प्रतिनिधी उरणमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन वाढल्यामुळे ग्राहकांनी मासळी खरेदीकडे पाठ फिरविली आहे.त्यामुळे मासेविक्रेत्यांवर आर्थिक संकट कोसळले असून त्यांच्यावर मच्छी मार्केटबाहेरच मासळी सुकविण्याची वेळ ओढवली आहे. उरणमध्ये दररोज मासेमारी करणारे आपल्या जीवावर उदार होऊन समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात आहेत. मोठ्या प्रमाणात मासेमारीसाठी मेहनत घेऊन मिळेल ती मासळी उरणच्या …

Read More »

’पंचमवेद’ची सावरकरांना सांगितिक आदरांजली

पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती गुरुवारी (दि. 28) झाली. यानिमित्त येथील पंचमवेद या संस्थेच्या वतीने एका ऑनलाइन दृक् श्राव्य सांगितिक सोहळ्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. संगीतकार व प्रसिद्ध व्हायोलीनवादक विजय मनोहर यांच्या संकल्पनेतून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. सध्याच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर …

Read More »