Breaking News

Monthly Archives: May 2020

अलिबागमध्ये साकारतेय कोविड केअर सेंटर

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन अलिबागजवळच्या नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात कोविड केअर सेंटरची उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास तुषार, सारंग, तिनवीरा येथील शासकिय विश्रामगृहांचे रूपांतरही केअर सेंटरमध्ये करण्याची चाचपणी सुरू आहे.सध्या जिल्ह्यातील …

Read More »

भाजप युवा मोर्चा पुन्हा रक्त तुटवडा भरून काढणार

जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्तरक्ताची गरज लक्षात घेता भारतीय जनता युवा मोर्चा पुन्हा एकदा रक्त तुटवडा भरून काढणार आहे, अशी माहिती युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी दिली. कोविड-19 महामारीदरम्यान अनेक अन्य रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. विशेषकरून थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्ताची वारंवार गरज लागते. …

Read More »

संकटकाळात समन्वय अन् एकजूट हवी!

सध्या संपूर्ण जगभरात कोरोना या महाभयंकर शत्रूविरुद्ध अनोखे व ऐतिहासिक युद्ध सुरू आहे. युद्ध म्हटले की एकजुटीने आणि सर्वशक्तिनिशी लढा द्यावा लागतो. कोविड-19 हा शत्रू अदृश्य स्वरूपात आहे. शिवाय तो झपाट्याने पसरतोय, वाढतोय. त्यामुळे त्याचा मुकाबला पूर्ण क्षमतेने तसेच अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणीद्वारे करण्याची आवश्यकता आहे. आपल्या राज्यात मात्र …

Read More »

नवी मुंबईत 74 नवे कोरोनाबाधित

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत शनिवारी (दि. 23) कोरोनाचे 74 रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या एक हजार 561 झाली आहे.तर दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 51 झाली आहे. गेले दोन दिवस बरे होणार्‍यांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंतेत असलेल्या नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. आजतागायत 9 हजार 943 …

Read More »

कारागृहातून पळालेल्या दुसर्या आरोपीलाही बेड्या

अलिबाग : प्रतिनिधी – अलिबाग येथील कारागृहातून पळून गेलेल्या  दुसर्‍या आरोपीला  पोलिसांनी अटक केली. एक आरोपी जखमी झाल्यामुळे तो ताबडतोब सापडला. दुसर्‍या आरोपीला शुक्रवारी (दि. 22) रात्री कोलाड येथे अटक करण्यात आली. अलिबाग कारागृहातून कैदी पळून जाण्या घटना यापुर्वीही अशा घडल्या आहेत. या घटनेमुळे तुरुंग व्यवस्थापनातील त्रुटी समोर आळ्या आहेत. …

Read More »

भाजपच्या आंदोलनाला पेणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पेण : प्रतिनिधी – कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपने संपूर्ण राज्यात राज्य सरकारच निषेध करीत ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ हे वाक्य घेऊन आंदोलन केले. या आंदोलनात पेणमधील भाजप कार्यकर्तेही सामील होत त्यांनी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. सरकारच्या विरोधात फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी भाजप आपापल्या …

Read More »

मृत महिलेच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह; ग्रामस्थांना दिलासा

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब रस्त्यावर नेरळ विद्या भवन धामोते या शाळेसमोर असलेल्या फार्म हाऊसमधील 63 वर्षीय महिलेला कोरोना झाला होता. त्या महिलेच्या संपर्कात असलेल्या 25 जणांच्या कोरोना टेस्ट घेण्यात आल्या असून, त्या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. दरम्यान, सदर महिला मृत झाल्याने निर्माण झालेली भीती त्या सर्वांचे रिपोर्ट …

Read More »

कोरोनाचे रायगडात वाढते रुग्ण

पोलादपूरात तीन जण पॉझिटिव्ह पोलादपूर : प्रतिनिधी – पहिल्या लॉकडाऊनवेळी पोलादपूर शहरांमध्ये तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून त्यापैकी एक महिला मृत झाली होती. तिसर्‍या लॉकडाऊन अखेरीस पोलादपूर तालुक्यात आलेले कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील निवाची वाडी येथील दोन रुग्ण आणि उमरठ फौजदारवाडी येथील एक रुग्ण, असे तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची …

Read More »

शिक्षकांच्या वाहन भत्त्यात कपात नको; प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

कर्जत ः बातमीदार महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे मे महिन्यातील पगार देताना शासन त्यांचा वाहन भत्ता कपात करू शकतो, अशी भीती शिक्षकवर्गाला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व शिक्षक घरी आहेत. परिणामी त्यांनी घेतलेल्या विविध प्रकारच्या कर्जांचे हप्ते फेडण्यास अडचणी येत असल्याने मे महिन्याचा पगार देताना त्यातून वाहन भत्ता कपात करू नये, अशी मागणी महाराष्ट्र …

Read More »

निजामपूर बाजारपेठ ठरावीक वेळेत सुरू राहणार

प्रांताधिकार्‍यांचे स्पष्टीकरण माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून निजामपूरसह माणगाव येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात होत्या. त्यामुळे विभागातील शेतकरी व छोटे व्यापारी हवालदिल झाले होते. अफवांमुळे निजामपूर शहरातील बाजारपेठ 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय निजामपूर व्यापारी असोसिएशन व लोकप्रतिनिधींनी घेतला होता, परंतु असे बाजारपेठ …

Read More »