नगरसेविका वृषाली वाघमारे यांचे निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील सेक्टर 13 व 14 मधील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी केली आहे. या संदर्भात पनवेल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेविका वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत …
Read More »Monthly Archives: May 2020
पनवेलचे ज्वेलरी मार्केट सुरू करावे
सराफ आणि ज्वेलर्स असोसिएशनची मागणी पनवेल : वार्ताहर पनवेलच्या ज्वेलर्स आणि सराफ असोसिएशनने महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे ज्वेलरी मार्केट सुरू करावे, अशी मागणी एका पत्राद्वारे केली आहे. कोरानाच्या महामारीचा आर्थिक फटका अनेक उद्योजक, व्यापारी छोटे व्यावसायिक यांना बहुतांश ठिकाणी बसल्याने व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्याचप्रमाणे ज्वेलरी दुकाने …
Read More »नगरसेविका नेत्रा पाटील यांच्यामार्फत होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.4 खारघरच्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्यामार्फत कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप प्रभागातील सोसायटीमध्ये करण्यात आले. यामध्ये सर्व सामान्य नागरिक विशेषतः भाजी विक्रेते, सफाई कामगार, सोसायटीतील सुरक्षा रक्षक यांसह ऐरोलीतील एमबीए (म्युच्युअली बेनिफिशिअल अॅक्टीव्हीटीज) फाऊंडेशन या अपंग पुनवर्सन …
Read More »कंटेनर उलटून विषारी वायूची गळती
तात्पुरती वाहतूक बंद करून परिस्थिती आटोक्यात उरण : रामप्रहर वृत्त धूतुम हायवे रोडवरील आयओटीएल समोर रविवारी (दि. 24) सकाळी एक कंटेनर पलटी झाला. त्यामधून अत्यंत विषारी वायुची गळती होत होती. यामुळे डोळ्यांना तसेच श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. घटनास्थळी सिडको अग्निशमन दलाने धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. जेएनपीटी येथून सकाळी …
Read More »कोरोनावर मात केलेल्या परिचारिकेचे स्वागत
पोलादपूर : प्रतिनिधी – महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड 19 पॉझिटिव्ह झालेली परिचारिका तब्बल 14 दिवसांच्या उपचारानंतर पुर्णपणे बरी होऊन कोविड सेंटरबाहेर येताना तिचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. या वेळी सहकारी परिचारिका महाड येथील कोविड सेंटरला व्हेंटीलेटर सुविधा देण्यात आल्याने महाड येथून या परिचारिकेला अन्यत्र उपचारासाठी हलवावे लागले नाही. महाड …
Read More »शेतकर्यांची पावसाळापूर्व मशागत कामांची लगबग
श्रीवर्धन ः प्रतिनिधी – येत्या 15 ते 20 दिवसांत मोसमी पावसास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे देशावर जरी कोरोना महामारीचे संकट असले तरीसुद्धा शेतकर्यांना आपली शेतीची कामे करावीच लागणार आहे. त्या अनुषंगाने शेतकर्यांनी पावसाळ्याआधी कराव्या लागणार्या शेतीच्या मशागतीच्या कामांकडे जास्त लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. …
Read More »पोलिसांना आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप
कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुका मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून कोरोनावर मात करण्यासाठी 24 तास सुरक्षा देणार्या पोलीस दलासाठी आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्यात जाऊन कर्जत मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप केले. आयुर्वेद व्यासपीठ आणि जनकल्याण समिती यांचा या कार्यात सहभाग होता. कर्जत …
Read More »कर्जतमध्ये आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह
कर्जत ः बातमीदार – कर्जत शहरातील संजयनगर भागात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. ती व्यक्ती 21 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीला घेऊन कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आली होती, तर पाच दिवसांपूर्वी माथेरानमध्ये आलेल्या एका महिलेला कोरोना झाला असून त्यांची कोरोना टेस्ट 22 मे रोजी करण्यात आली होती. …
Read More »‘वर्क फ्रॉम होम’ला नेटवर्कचा खोडा
कर्मचार्यांच्या नाकी नऊ माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना महामारीच्या संकटात देशात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सर्वच कार्यालये बंद आहेत. केवळ बँका, सरकारी कार्यालये व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. काही कंपन्या, बँकांनी आपल्या कर्मचार्यांना वर्क फ्रॉम करण्याची मुभा दिली आहे, मात्र नेटवर्कच्या समस्येमुळे वर्क फ्रॉम होम करण्यास कर्मचार्यांना अनंत अडचणींना …
Read More »रायगड जिल्ह्यात कोरोनाचे थैमान
पनवेलपासून पोलादपूरपर्यंत 54 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू; एकूण कोरोनाबाधित सातशेपार पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसागणिक वाढू लागले असून, शनिवारी (दि. 23) एकाच दिवसात जिल्ह्यामध्ये तब्बल 54 रुग्ण आढळले. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 19, पनवेल ग्रामीण आठ, माणगाव 14, रोहा पाच, पोलादपूर तीन, मुरूड दोन, उरण, पेण, तळा येथील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper