तिघांचा मृत्यू; 32 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 12) कोरोनाचे 34 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 32 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 30 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तळोजा पानाचंद येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »Monthly Archives: June 2020
नालेसफाई कामास सुरुवात
नगरसेविका राजश्री वावेकर यांचा पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल सेक्टर 5 येथील नाल्याच्या साफसफाईच्या कामाला शुक्रवारी (दि. 12) सुरुवात करण्यात आली. नगरसेविका राजश्री यांनी यासंदर्भात सिडकोकडे पाठपुरावा केला होता. पनवेलच्या वॉर्ड क्रमांक 16 मधील सेक्टर 5 येथील नाल्यामध्ये बाजूची भिंत व फूटपाथ ढासळून त्या ठिकाणी नाल्यात सर्व माती …
Read More »आपण घेऊया खबरदारी -खंडागळे
पेण : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपर्यंत आपली जबाबदारी शासनाने घेतली होती. पुढे ही घेतील परंतु पूर्ववत जीवनशैली जगत असताना आपण ही या देशाचे राज्याचे नागरिक म्हणून आपण आपली आरोग्याची खबरदारी बाळगुया, असे आवाहन भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांनी व्यक्त केले आहे. आर्थिक चक्र रुळावर आणण्यााठी शासनाला लॉकडाऊनचे नियम …
Read More »डिनायल मोडमधून बाहेर या; अन्यथा कोरोनापेक्षा भयंकर परिस्थिती ओढावेल -देवेंद्र फडणवीस
दापोली : प्रतिनिधी राज्य सरकारने कोरोनासंदर्भातील खरी परिस्थिती नाकारण्याच्या स्थितीतून (डिनायल मोड) बाहेर यावे, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते शुक्रवारी दापोली येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, राज्यातील मंत्र्यांना कोरोना झाला, ही दुर्दैवी बाब आहे. त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. पण मुंबईतील परिस्थिती गंभीर आहे. …
Read More »व्यायामशाळा बंद असल्याने जिम व्यावसायिकांपुढे आर्थिक प्रश्न
पनवेल : बातमीदार टाळेबंदीमुळे जिम व व्यायामशाळा बंद असल्याने जिम व्यावसायिक व प्रशिक्षकांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. मार्च महिन्यापासून उत्पन्न पूर्ण थांबल्याने ’तंदुरुस्त’ असलेल्या या व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. ’कोरोना संसर्गामुळे जिम बंद ठेवणे योग्य होते; पण आता व्यायामात सातत्य नसल्याने लोकांना आरोग्याचे प्रश्न उद्भवू लागले आहेत. 14 मार्चपासून …
Read More »‘पनवेलमध्ये कोरोनाचे मृत्यू नियंत्रणात’
पनवेल : बातमीदार पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे झालेले मृत्यू केवळ कोरोनाची लागण झाली म्हणून नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे. पनवेलमध्ये आजवर 36 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील दोन रुग्णांना उपचार उशिरा मिळाल्यामुळे मृत्यू झाला. मार्च महिन्यात पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठ्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या …
Read More »पनवेलमध्ये सम-विषम नियमांचे उल्लंघन
आठ दुकानांवर मनपाची कारवाई पनवेल : बातमीदार ’मिशन बिगिन अगेन’अंतर्गत राज्य सरकारच्या आदेशाने पनवेलमधील दुकाने सम-विषमप्रमाणे सुरू करण्यात आली आहेत. मात्र काही दुकानचालकांकडून या नियमांचे उल्लंघन केले जात असल्यामुळे प्रभाग अधिकार्यांनी परवानगी नसताना उघडलेल्या दुकानांवर गुरुवारी कारवाई केली. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जनजीवन पूर्ववत होत असून नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर …
Read More »पनवेलमध्ये सात प्राथमिक शाळा अनधिकृत
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 19 प्राथमिक शाळा शिक्षण विभागाकडून अनधिकृत घोषित करण्यात आल्या आहेत. या अनधिकृत शाळांची यादी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये पनवेल तालुक्यातील सात शाळांचा समावेश आहे. या शाळांना मान्यता नसल्याने येथे प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी पालकांना …
Read More »रसायनीतील 12 रुग्ण कोरोनामुक्त
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना या विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला असताना रसायनी परिसरातही कोरोनाने शिरकाव करून भीती निर्माण केली होती, परंतु 12 रुग्णांनी धैर्य दाखवून या महामारीवर मात केली आहे. रसायनी-मोहोपाडा परिसरातील शिवनगरवाडीतील तीन, भटवाडी एक, श्रीहरी पार्क (हरिओम पार्क) दोन, रिस नवीन वसाहत-दुर्गामाता कॉलनी येथे दोन, दापिवली तीन आणि वावेघरमधील …
Read More »मुरूड तालुका अद्यापही अंधारात
मुरूड : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे मुरूड तालुक्यात वीज मंडळाचे अतोनात नुकसान होऊन 650पेक्षा जास्त पोल निकामी झाले, तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरसुद्धा निकामी झाले असल्याने तालुक्यातील वीजपुरवठा गेल्या 12 दिवसांपासून खंडित आहे. परिणामी मुरूड शहरासह तालुक्यातील 72 गावे अंधारात आहेत. अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण म्हणून तेथे तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला, …
Read More »