Breaking News

Monthly Archives: September 2020

दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा

शोकसभेत पत्रकारांची मागणी कर्जत ः बातमीदार – माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रविवारी (दि. 13) कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी पोलिसांना निवेदन दिले. कर्जत येथे झालेल्या शोकसभेत कर्जतमधील पत्रकारांकडून दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना जिल्ह्यातील सर्व राजकीय …

Read More »

रायगडात 893 नवे पॉझिटिव्ह; 14 रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 12) कोरोनाचे 893 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 14 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 659 जण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, कर्जत व रोहा प्रत्येकी दोन तसेच खालापूर व अलिबाग येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण …

Read More »

फ्रिज जळून फ्लॅटचे नुकसान

पोलादपूर : प्रतिनिधी शहरातील प्रभातनगर पूर्व भागातील ओम अपार्टमेंटच्या ए विंग मधील एका फ्लॅटच्या भाडेकरूच्या फ्रिजला शुक्रवारी रात्री अचानक लागलेल्या आगीमध्ये किचनमधील सामान जळून खाक झाले. जागरूक सेवाभावी नागरिकांनी तातडीने ही आग विझविण्यात यश मिळविले असले तरी या घटनेने पोलादपूर शहरात नगरपंचायतीची स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा असण्याची आवश्यकता स्पष्ट झाली आहे. …

Read More »

पनवेल पालिका हद्दीतील पत्रकारांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पालिका क्षेत्रातील  पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची कोरोना टेस्ट शनिवारी (दि.12) पनवेल पालिका मुख्यालयात करण्यात आली. तरी सर्व पत्रकार बंधु आणि भगिनींनी टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले होते. या आव्हानाला पालिका क्षेत्रातील पत्रकारांनी चांगला प्रतिसाद देत 27 पत्रकारांनी स्वत:ची …

Read More »

पनवेल तालुक्यात 429 रुग्णांचा नवा उच्चांक

आठ जणांचा मृत्यू    333 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शनिवारी (दि.12) कोरोनाचे 429 नवीन रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 333 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 291 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 227 …

Read More »

मुरूडचे पर्यटन बहरतेय

घोडेस्वारीकडे पर्यटकांचा कल मुरूड ः प्रतिनिधी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी कालवधीत सर्वत्र हॉटेल्स तसेच लॉजिंग रेस्टॉरंट्स गेली अनेक महिने बंद होती, परंतु आता संचारबंदीत शिथिलता आल्यानंतर तसेच ई-पास रद्द केल्यामुळे लोकांना सर्वत्र जाण्याची मुभा मिळाली आहे. परिणामी आता पर्यटक हळूहळू बाहेर पडू लागले आहेत. मुरूड येथे आता शनिवार-रविवारी पर्यटक दिसू लागले …

Read More »

भाजपतर्फे सेवा सप्ताह अंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना महासाथीचा मुकाबला करताना ’संगठन ही सेवा’ या उपक्रमांतर्गत विविध सेवाकार्य भाजपचे कार्यकर्ते राज्यभर करीत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने सेवा सप्ताह, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम कोरोनासंबंधित सर्व …

Read More »

फेरीवाल्यांना मिळणार ‘पंतप्रधान स्वनिधी’चा लाभ

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन आढावा बैठक पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशातील ग्रामीण आणि शहरी भागातील फेरीवाल्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जून 2020 रोजी केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान स्वनिधी योजना जाहीर केली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांनाही या योजनेचा लाभ मिळण्याकरिता सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर

पनवेल ः रामप्रहर वृत्तदिवंगत ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यातर्फे पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. माथेरान येथे राहणारे पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनामुळे अकस्मात निधन झाले. सतत हसतमुख असणारे आणि लोकांच्या मदतीला धावणारे संतोष पवार यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यातील …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी तसेच त्यांच्या परिवाराला शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य मिळावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे …

Read More »