Breaking News

Monthly Archives: November 2020

नांदगाव हायस्कूलसमोरील अनधिकृत बांधकाम हटवले

मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर अतिक्रमण करून भाजी विक्रीसाठी काही शेड उभारण्यात आल्या होत्या. मात्र त्याविरोधात मुख्याध्यापकांनी उपोषणाचा इशारा देताच संबंधीतांनी या शेड तात्काळ हटवल्या आहेत. मुरूड तालुक्यातील यशवंतनगर -नांदगाव येथे श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय ही माध्यमिक शाळा  आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील मुंबईकडे जाणार्‍या रस्त्यावर  अज्ञात इसमांनी …

Read More »

कळंबोली-अंजप रस्त्याची दुर्दशा

कडाव : प्रतिनिधी तालुक्यातील कळंबोली ते अंजप हा सुमारे दोन ते तीन किलोमीटर लांबीचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून नादुरुस्त झाला असून, त्यामुळे या रस्त्यावरून नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांनाही खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातील व ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्ते विकासापासून अनेक कोस दूर आहेत. …

Read More »

द्रुतगती महामार्गावर सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या

जीवितहानी नाही; वाहनांचे मात्र नुकसान खालापूर : प्रतिनिधी मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी (दि. 22) सकाळी सहा गाड्या  एकमेकांवर आदळल्या. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या सणानंतर सुट्टी संपल्याने द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर रविवारी सकाळी वाहनांची मोठी गर्दी होती. आडोशी …

Read More »

शाळांचा पुनश्च श्रीगणेशा

कोरोनामुळे बंद असलेल्या गोष्टी हळूहळू पुन्हा सुरू होत आहेत. सुमारे आठ महिने बंद असलेली मंदिरे काही दिवसांपूर्वी खुली झाली. आजपासून शाळांची घंटा वाजणार आहे. सुरुवातीला इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग भरणार आहेत. राज्य शासनाने शाळा सुरू करण्यासंबंधी निर्देश दिले असले तरी पालक मात्र पाल्यांना सध्या शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. राज्यातील …

Read More »

म्हसळा नगरपंचायतीचा अजब कारभार

भारतीय जनता पक्षाने केले सर्वेक्षणाचे आवाहन म्हसळा : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात म्हसळा, तळा व माणगाव या तीनही नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तीनही नगरपंचाय तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीची एकहाती सत्ता आहे, मात्र तेथे स्थानिक विकासाचं उद्दिष्ट किती पूर्ण झालं याचा अभ्यास त्या त्या …

Read More »

अखेर जंजिरा किल्ला खुला

पर्यटकांसह स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण मुरूड ः प्रतिनिधीआठ महिन्यांपासून बंद असलेला जंजिरा किल्ला अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. सोमवार (दि. 23)पासून येथून जलवाहतूक सुरू होणार असल्याने स्थानिक व्यावसायिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, मार्च महिन्यापासून किल्ला बंद असल्याने परिसरात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने सरपटणार्‍या प्राण्यांपासून पर्यटकांनीदक्ष राहण्याचे आवाहन करण्यात …

Read More »

मराठा मोर्चाचा सरकारविरोधात एल्गार

नवी मुंबईतील चौकसभा, रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद नवी मुंबई ः बातमीदार  युती सरकारच्या काळात मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सुप्रीम कोर्टात न टिकल्याने अखेर रद्द झाले आहे. त्याची झळ मराठा समाजातील तरुणांना बसणार आहे. विद्यमान मविआ सरकारला हे आरक्षण टिकवता न आल्याने मराठा समाजात असंतोष पसरला असून, सरकारविरोधातील रोष व्यक्त होत आहे. …

Read More »

आमदार रोहित पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक

मुंबई ः प्रतिनिधीगेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौरऊर्जा, इथेनॉल यांसारख्या क्षेत्रांत केलेले काम  निश्चितच उल्लेखनीय आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले आहे.रोहित पवार यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांनी धरले एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांना धारेवर

राज्य महामार्गाचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश सुधागड ः प्रतिनिधीवाकण-पाली-खोपोली या राज्य महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम ठप्प आहे. या संदर्भात पाली विश्रामगृहात झालेल्या बैठकीत आमदार रविशेठ पाटील यांनी एमएसआरडीसीचे अधिकारी व ठेकेदारांना धारेवर धरले. त्यानंतर मंगळवार (दि. 24)पासून रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी सुधागड तालुक्यातील इतरही समस्यांचा …

Read More »

महाविकास आघाडीच्या बैठकीत उडाला गोंधळ

सोलापुरात शिंदे समर्थकांची नारेबाजी सोलापूर ः प्रतिनिधीमहाविकास आघाडीच्या सोलापुरात झालेल्या बैठकीतील बॅनरवर ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्याचे दिसून आले. यावरून आघाडीतील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला, तर शिंदे समर्थकांनी या वेळी जोरदार नारेबाजी करीत निषेध नोंदवला.पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघडीची बैठक रविवारी (दि. 22) …

Read More »