Breaking News

Yearly Archives: 2020

कारखान्यांतील सांडपाणी थेट नाल्यात; ‘सावित्री’चे प्रदूषण वाढले

महाड ः प्रतिनिधी महाड औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने पावसाचा फायदा घेत रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडत आहेत. हे रासायनिक सांडपाणी नाल्यांमार्गे थेट सावित्री खाडीला मिळत असल्याने सध्या ही खाडी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे खाडीकिनारी असणारी शेती आणि मासेमारी धोक्यात आली आहे. या प्रकारामुळे स्थानिकांत असंतोष पसरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

आरटीई अंतर्गत विद्यार्थी प्रवेशाची प्रतीक्षा संपणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्तसन 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी सोडत मार्च महिन्यात झाली होती, मात्र कोरोनामुळे तब्बल तीन महिने ही प्रक्रिया रखडली. दरम्यान या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता. शिक्षण संचालकांना पत्र देत याबाबत त्वरित …

Read More »

सरसकट तीन महिन्यांचे वीज बील पाठवू नका

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : प्रतिनिधीविधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राज्यातील नागरिकांच्या वीज बिलाची समस्या मांडली आहे. लॉकडाऊन काळात ग्राहकांच्या घरातील मिटरचे रिडिंग न घेतल्यामुळे सध्या एकदम तीन महिन्यांचे बिल नागरिकांच्या माथी मारले जात असून, हे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.देवेंद्र फडणवीस …

Read More »

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन उपाययोजना करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची पनवेल मनपा प्रशासनाला सूचना पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ही चिंतेची बाब लक्षात घेता प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन केली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आज रक्तदान शिबिर

अलिबाग : प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रायगड जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णांना उपचारादरम्यान रक्ताची गरज भासत आहे. ही गरज लक्षात घेऊन रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने 24 जून रोजी अलिबागमध्ये पहिल्या टप्प्यातील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अलिबाग शहराजवळील कुरूळ येथील क्षात्रैक्य माळी समाज …

Read More »

अधांतरी भवितव्य

कोरोना विषाणूच्या महामारीच्या थैमानामुळे एरव्ही मार्च-एप्रिलमध्ये होणार्‍या परीक्षा यंदा त्या काळात होऊ शकल्या नाहीत. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने पदवी परीक्षांसंबंधी परिस्थितीचा व्यापक विचार न करता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बेधडक जाहीर केला, परंतु संबंधित अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे मागून विरोधी पक्ष म्हणून भाजप आपली भूमिका चोख बजावत …

Read More »

‘आशा सेविकांचे मानधन वाढवून वेळेत द्या’

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात काम करीत असलेल्या आशा सेविकांना उल्हासनगर महापालिकेप्रमाणे मानधन वाढवून आणि वेळच्या वेळी देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून डॉक्टर आणि आरोग्यसेवकांच्या बरोबरीने आशा सेविका काम करीत आहेत. घरोघरी जाऊन सर्व्हे करणे, आजारी …

Read More »

‘भरमसाठ वीज बिले माफ करा’

महाड ः प्रतिनिधी कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे रोजगार गमावलेल्यांवर भरमसाठ वीजबिलांची कुर्‍हाड कोसळली आहे. अशा नागरिकांची वीज बिले माफ करावीत, अशी भूमिका घेत दक्षिण रायगड भाजपच्या वतीने सरकारकडे मागणी करण्यात आली. याबाबत वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले. लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले. कोरोनाची वैश्विक महामारी, निसर्गाची अस्मानी व आघाडी सरकारची …

Read More »

रायगडात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

पनवेल तालुक्यात 62 नवीन रुग्ण पनवेल ः पनवेल तालुक्यात मंगळवारी 62 नवीन रुग्ण आढळले असून, सहा जणांचा मृत्यू  झाला आहे. 65 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 53 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 56 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात …

Read More »

दि. बा. पाटील : एक लढवय्या नेता!

लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचा आज सातवा स्मृतिदिन. 24 जून 2013 रोजी ते अनंतात विलीन झाले, पण अखेरच्या क्षणापर्यंत ते लढवय्ये म्हणूनच जगले. शरीरात त्राण नसतानाही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर प्रकल्पग्रस्तांच्या मोर्चाचे नेतृत्व स्ट्रेचरवर जाऊन त्यांनी खंबीरपणे केले. यामागे प्रकल्पग्रस्तांविषयी असणारी आस्था व त्यांच्याविषयी असलेला जिव्हाळा हेच प्रमुख कारण होते. …

Read More »