खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन ब्रिजच्या जवळपास रविवारी (दि. 17) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कंटेनरच्या केबिनला आग लागल्याची घटना घडली आहे. किमी 46 पुणे मार्गिकेवर अचानक लागलेल्या आगीत जीवितहानी झाली नसली तरी कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. चालक व त्याच्या सहकार्याने प्रसंगावधान राखून बाहेर उड्या मारल्याने दोघांचे जीव …
Read More »Monthly Archives: January 2021
रस्ता सुरक्षा अभियानाचे आज अलिबागेत उद्घाटन
अलिबाग ः प्रतिनिधी पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व रायगड जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात 32व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी निधी चौधरी, तर प्रमुख उपस्थिती जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, …
Read More »तुला परत मानला रे ठाकूर!; विराटकडून मराठमोळ्या अंदाजात शार्दुलची प्रशंसा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 369 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताची फलंदाजी सुरुवातीला काहीशी डगमगली. भरवशाचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी भारताचा डाव सावरत शतकी भागीदारी केली. यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले आहे. भारताकडून पहिल्या डावात शार्दुल ठाकूरने सर्वाधिक …
Read More »स्वच्छतागृहावर चालविला हातोडा
नेरळ ग्रामपंचायतीचा अजब कारभार कर्जत ः बातमीदार 50 वर्षे जुने आणि बाजारपेठेत असलेले एकमेव स्वच्छतागृह नेरळ ग्रामपंचायतीने तोडायला घेतल्याने नेरळकर हैराण झाले आहेत. परिणामी नेरळ ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराला आता नेरळकर पुरते वैतागले आहेत.पनेरळ मुख्य बाजारपेठेत असलेल्या शिवसेना शाखेजवळील स्वच्छतागृह गेली अर्धा दशकाहून अधिक काळापूर्वी बांधण्यात आले होते. रायगड जिल्ह्यात नेरळ …
Read More »भारताचे शेपूट ऑस्ट्रेलियाला पडले भारी; शार्दुल-वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी
ब्रिस्बेन : वृत्तसंस्था चौथ्या व निणार्यक ब्रिस्बेन कसोटीत मराठमोळा शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या 123 धावांच्या भागिदारीच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या डावात 336 धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावांत 33 धावांची आघाडी मिळाली असून, तिसर्या दिवसाखेर त्यांनी बिनबाद 21 धावा केल्याने एकूण आघाडी 54 …
Read More »खारघरमध्ये कृत्रिम फुप्फुसांचे महापौरांच्या हस्ते अनावरण
खारघर : प्रतिनिधी खारघर शहरातील वातावरण फाऊंडेशनतर्फे खारघर सेकटर 7 येथील उत्सव चौक येथे श्वास घेणार्या कृत्रिम फुप्फुसांची (लंग्जबिलबोर्ड)चे पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते शनिवारी (दि. 16) अनावरण करण्यात आले. नुकतेच हवा प्रदूषणासंदर्भात वातावरण फाऊंडेशनने संशोधनपर अभ्यास केला. या संशोधन अभ्यासाअंती समोर आलेल्या माहितीनुसार खारघर-तळोजा-पनवेल येथील रहिवासी …
Read More »शिक्षकांकडून डॉक्टरांचा सत्कार
चिमुकल्यांनी दिले संदेशात्मक पत्र खारघर : प्रतिनिधी सैन्य दिनाच्या औचित्यावर पनवेलमधील एमएनआर शाळेच्या शिक्षकांनी डॉक्टरांची भेट घेत डॉक्टरांचा सत्कार केला. कोविड काळात डॉक्टरांनी देशसेवेसाठी आपले जीव धोक्यात घालुन रुग्णांची सेवा केली. देशाच्या सीमेवर ज्याप्रकारे सैनिक आपल्या जीवाची बाजी लावतात त्याचप्रकारे डॉक्टरांनी आपली सेवा बजावल्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »वावर्ले शाळेला पुस्तकांची भेट
कळंबोली : बातमीदार, पनवेल : वार्ताहर आदर्श शिक्षक वडील कै. गजानन गणू खारपाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पत्रकार मिलिंद खारपाटील यांनी वावर्ले शाळेला 4400 रुपये किमतीची 17 अनमोल पुस्तके भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. ते स्वतः पुस्तक प्रेमी असून त्याने अनेक ग्रंथालयांना आतापर्यंत एक लाखापेक्षाही जास्त किमतीची पुस्तके भेट दिली आहेत. …
Read More »शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त सचिन तांडेल मेमोरियल फाऊंडेशन, कळंबुसरे संस्थेच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त तसेच संस्थेचे सदस्य कै. रिंकू नाईक यांच्या स्मरणार्थ गुरुवारी (दि. 14) पहिली ते आठवीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात 146 विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. हा कार्यक्रम कै. रिंकू नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन सुरू करण्यात …
Read More »कोकण विभागात दोन हजार 765 आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरण पूर्ण
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे शनिवारी (दि. 16) कोकण विभागात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ विभागातील सामान्य रुग्णालयांमध्ये करण्यात आला. कोकण विभागात विविध ठिकाणी कार्यरत असलेले आरोग्य अधिकारी तसेच मान्यवरांनी पहिली लस टोचून घेऊन या मोहिमेची सुरुवात केली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी विविध केंद्रांवर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper