Breaking News

Monthly Archives: April 2021

आधी विकसित भूखंड व नागरी सुविधा द्या ः सुरेश पाटील

उरण : प्रतिनिधी    उरण-बेलापूर रेल्वेची पाहणी करण्यासाठी सिडकोचे व रेल्वेचे अधिकारी जासई येथे आले असता, जासई संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, यशवंत घरत, नरेश घरत तसेच ग्रामस्थांनी पाहणी अधिकार्‍यांना 12 टक्के विकसित भूखंड तसेच गावाच्या नागरी सुविधा आधी द्या. नंतर तुमचे काम सुरू करा, अशी मागणी केली. या वेळी सिडको …

Read More »

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारा जेरबंद; गुन्हे शाखेची कारवाई

पनवेल ः वार्ताहर सध्या देशभरात कोविडच्या उपचारासाठी लागणार्‍या रेमडेसिवीर या अत्यावश्यक इंजेक्शनचा तुटवडा असून, काही लोक त्याची चढ्या भावाने विक्री करीत आहेत. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष-2 (पनवेल)चे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहितीनुसार रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्‍या लॅब टेक्निशियनला गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. काही जण रेमडेसिवीरचा काळाबाजार करीत …

Read More »

देशाच्या मदतीला दिग्गज धावले!; मायक्रोसॉफ्ट, गुगलच्या सीईओंकडून मदतीची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाच्या पहिल्या लाटेत अवघ्या जगाच्या मदतीला धावून जाणार्‍या भारताला कोरोनाने दुसर्‍या लाटेने घेरले आहे. अशा वेळी अमेरिकेच्या दोन बड्या कंपन्या, ज्यांचे सीईओ भारतीय आहेत त्यांनी मोठी मदत देऊ केली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलने या मदतीची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी अत्यंत दु:खी असल्याचे …

Read More »

भाजपचे युवा शिलेदार सरसावले!

पनवेल : येथील महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू असून, भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कोविड वॅक्सिन सेंटरला भेट देत लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांना आवश्यक …

Read More »

ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत दाखल

कोविड रुग्णांना मोठा दिलासा अलिबाग ः प्रतिनिधीराज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर 45 मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनच्या तीन टँकरसह ही ऑक्सिजन एक्स्प्रेस सोमवारी (दि. 26) सकाळी 11.30 सुमारास कळंबोली येथे दाखल झाली.विशाखापट्टणम् येथून …

Read More »

नवीन पनवेलमध्ये लसीकरण केंद्र वाढवा, खांदा कॉलनीत सुरू करा!

सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तयेथील महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेलमध्ये कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र वाढविण्यात यावीत, तसेच खांदा कॉलनीत लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.नवीन पनवेल येथे लसीकरण केंद्र वाढविण्याबाबत प्रभाग समिती ’ड’ …

Read More »

एका सुरात तरी बोला

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात त्सुनामीसारखी आली तेव्हा या सरकारचे काय चालले होते? शंभर कोटीच्या वसुलीचे प्रकार घडू लागले होते. भ्रष्ट वर्तनापायी दोन-दोन मंत्र्यांना राजीनामे देण्याची नामुष्की स्वीकारावी लागली. तरीही हे सरकार अजुनही खुर्चीला घट्ट चिकटून आहे. याला काय म्हणायचे? कोरोनाच्या हाहाकारामध्ये महाराष्ट्र भरडून निघत असताना मदतीला धावले ते पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

ठाण्यात चार रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू; नातेवाइकांचा आरोप

ठाणे ः प्रतिनिधीठाण्यातील वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात चार कोरोना रुग्णांचा सोमवारी (दि. 26) मृत्यू झाला. ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे, तर रुग्णालयाने हे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, रुग्णांच्या आक्रोशानंतर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी रुग्णालयाला भेट देऊन या प्रकरणाच्या सखोल चौकशीची तसेच दोषींवर कडक कारवाईची मागणी …

Read More »

मोफत लसीकरणावरून श्रेयवाद

महाविकास आघाडीतील काँग्रेसची उघड नाराजी मुंबई ः प्रतिनिधीकेंद्र सरकारने 1 मेपासून देशभरात 18 वर्षांच्या पुढील सर्वांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. यादरम्यान अनेक राज्यांनी मोफत लसीकरण केले जाईल असे जाहीर केले असून, महाराष्ट्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व महाविकास आघाडी सरकारमधील नवाब मलिक यांनी …

Read More »

तालुकास्तरीय ऑनलाइन स्पर्धांचा निकाल जाहीर

पनवेल ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त तालुका स्तरावर मराठी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी चांगू काना ठाकूर मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वेशभूषा, चित्रकला आणि पोस्टर मेकिंग (तक्ता बनवणे) आदी स्पर्धांचा यात समावेश होता. या स्पर्धांचा निकाल …

Read More »