Breaking News

Monthly Archives: April 2021

रेमडेसिवीर काळ्याबाजारातून खरेदी करू नका

जिल्हा इंजेक्शन, औषधे व मेडिकल मदत कक्षाचे आवाहन पनवेल : प्रतिनिधी रेमडेसिवीर या इंजेक्शनची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, हे इंजेक्शन डॉक्टरांनी जरी लिहून दिले तरी बाहेरच्या मेडिकलमध्ये कुठेही मिळणार नाही. जिल्हाधिकार्‍यांनी नेमलेल्या समितीमार्फत, रुग्ण ज्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे, फक्त त्या हॉस्पिटललाच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल, असा सरकारचा …

Read More »

घरपोच मद्यविक्रीला परवानगी

पनवेल : वार्ताहर जगात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरू आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार अवर सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार नमुना एफएल-2, फॉर्म इ-2 व एफएलडब्ल्यू-2 मद्यविक्री अनुज्ञप्ती मधून घरपोच (होम डिलिव्हरी) सेवा पुरवण्यास परवानगी देण्यात आलेली …

Read More »

नाकर्त्या राज्य सरकारमुळेच जनतेचा बळी

भाजपच्या प्रसाद लाड यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने राज्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहेत. यावरून ’घरात बसलेल्या’ सरकारने  कोरोनाची दुसरी लाट भयावह असणार आहे. याची कल्पना असूनही या काळात अत्यावश्यक असलेल्या सुविधांच्या निर्मितीसाठींही काहीही केले नाही. या नाकर्त्या सरकारमुळेच आज राज्यातल्या सामान्य …

Read More »

सर्वांत मोठे युद्ध

अतिशय वेगाने पसरणारा कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्याच्याशी मुकाबला करण्यात अपुरी पडणारी आरोग्य यंत्रणा यामुळे सध्या देशातील कोरोना आघाडीवरील परिस्थिती गंभीर आहेच. या परिस्थितीबद्दल विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात आरोपांची राळ उठवली असली तरी मोदीजींनी हे विदारक वास्तव दडविण्याचा वा दडपण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. उलटपक्षी परिस्थिती गंभीर असतानाही आपल्याला तिला धीराने …

Read More »

सततच्या पराभवानंतर कर्णधार मॉर्गनची नाराजी

मुंबई ः प्रतिनिधी कोलकाता नाइट रायडर्ससाठी यंदाच्या आयपीएलची सुरुवात धडाक्यात झाली खरी. सनरायजर्स हैदराबादवर कोलकाताने पहिल्याच सामन्यात 10 धावांनी विजय मिळवला होता, पण त्यानंतर मात्र कोलकाताला गेल्या चार सामन्यांमध्ये पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे कोलकाताचा कर्णधार मॉर्गन चांगलाच चिंतेत सापडला असून शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर मॉर्गनने ही बाब बोलूनदेखील दाखवली. …

Read More »

राजस्थानची केकेआरवर मात; गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप

मुंबई ः प्रतिनिधी भेदक गोलंदाजी आणि संजू सॅमसनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल सामन्यात केकेआरवर सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवला. या सामन्यापूर्वी राजस्थानचा संघ हा तळाला आठव्या स्थानावर होता, पण शनिवारच्या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला आणि गुणतालिकेत मोठा बदल झाला. राजस्थानने गुणतालिकेत आता सहावे स्थान पटकावले असून केकेआरचा …

Read More »

जुन्या पाठ्यपुस्तकांचे दान ठरतेय मोलाचे

हजारो मुलांच्या पालकांचा खर्च वाचला वैशाली जगदाळे यांचा उपक्रम यशस्वी पनवेल : वार्ताहर शैक्षणिक वर्ष संपले की ती पाठ्यपुस्तक आता रद्दीत दिले जातात. परंतु ही पुस्तक दुसर्‍या विद्यार्थ्यांसाठी वापरले जाऊ शकतात. याचे महत्त्व कामोठे येथील एका शिक्षकाने समाज माध्यमातून अनेक पालकांना पटवून दिले. त्यामुळे आता या पुस्तकांची आदली बदली करून …

Read More »

अनाथांच्या ‘संवेदना’ जाणून आर्थिक मदत

पनवेल : प्रतिनिधी शांतिवन आश्रमातील अनाथ वंचित मुलांसाठी अन्नधान्य आणि किराण्याच्या मदतीची गरज असल्याचे समजल्यावर पनवेलच्या संवेदना चॅरिटेबल संस्थेतर्फे 33,500 रुपयांचा धनादेश शांतिवन आश्रमाला देण्यात आला. ही माहिती अध्यक्ष सुनेत्रा गवाणकर यांनी दिली. अनाथ वंचित मुलांसाठी दोन घास हवे आहेत आणि यासाठी शांतिवनला अन्नधान्य आणि किराणा साठी मदतीची गरज आहे, …

Read More »

कोविड रोखण्यासंदर्भात एपीएमसीमध्ये बैठक

नवी मुंबई : प्रतिनिधी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक डक यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात तथा उपाययोजना करण्या संदर्भात एपीएमसीमार्केटमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त राजेश कानडे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, …

Read More »

कर्जतमध्ये महावीर जयंती साधेपणात

कोरोनामुळे मिरवणूकही रद्द कर्जत : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कर्जतमध्ये रविवारी (दि. 25) श्री महावीर जयंती केवळ महावीरांच्या मूर्तीचे पूजन  करून अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. दरवर्षी काढण्यात येणारी भगवान महावीरांच्या मूर्तीची मिरवणूक यंदा रद्द करण्यात आली. गेल्या वर्षीही महावीर जयंती साधेपणानेच साजरी करण्यात आली होती. श्री महावीर जयंती म्हणजे जैन …

Read More »