Breaking News

Monthly Archives: July 2021

महाडकरांना माणगावकरांचा मदतीचा हात

माणगाव : प्रतिनिधी महाड शहर परिसरासह तालुक्यात दि. 22 जुलै रोजी जोरदार अतिवृष्टी होऊन सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांचे पाणी घरांतून आणि दुकानांमधून शिरून गंभीर पूरपरिस्थिती निर्माण होऊन क्षणार्धात महाडमध्येे होत्याचे नव्हते झाले. अनेकांचे संसार या पुराच्या पाण्यात वाहून गेले. या प्रसंगात महाडवासीयांच्या मदतीला माणगावकर मिळेल ती मदत घेऊन धावले. …

Read More »

पावसामुळे रस्ता गेला वाहून…

12 आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटला कर्जत : बातमीदार माथेरान डोंगरातील 12 आदिवासी वाड्यांना जाण्यासाठी असलेला रस्ता पावसामुळे वाहून गेला आहे. वनजमिनीच्या दळी भूखंडावर वस्ती करून राहत असलेल्या माथेरान डोंगरातील या आदिवासी वाड्यांना जाण्यासाठी वनविभाग पक्का रस्ता करू देत नाही. त्यामुळे स्थानिक आदिवासी दरवर्षी श्रमदान करून रस्ता बनवतात, मात्र हा रस्ता …

Read More »

हिमाचल प्रदेशात दरड कोसळून नऊ पर्यटकांचा मृत्यू

शिमला ः हिमाचल प्रदेशात दरड कोसळून नऊ पर्यटकांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. सांगला खोर्‍यात किन्नोरच्या बटसेरीत ही दुर्घटना घडली. दरड कोसळतानाची घटना कॅमेर्‍यात कैद झाली असून डोंगवरावरून दगडे वेगाने खाली खोर्‍यात कोसळत असल्याचे दिसत आहे. दरड नदीवर असणार्‍या पुलावर कोसळल्यानंतर पुल नदीत कोसळतानाही व्हिडीओत दिसत आहे. मृत …

Read More »

भारताच्या प्रिया मलिकला सुवर्णपदक; जागतिक कुस्ती स्पर्धा

हंगेरी ः वृत्तसंस्था हंगेरी येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताची कुस्तीपटू प्रिया मलिकने सुवर्णपदक जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचल्यानंतर जागतिक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिकने मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे आनंद व्यक्त होत आहे. प्रिया मलिकने जागतिक कुस्ती स्पर्धेच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. प्रियाने बेलारुसच्या …

Read More »

मासेमारीसाठी उरणमध्ये मच्छीमारांची लगबग

उरण ः वार्ताहर 1 जूनपासन शासनाच्या खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीनंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीला पुन्हा सुरुवात होणार आहे. पर्सियन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारातील सुरू होणार्‍या मासेमारीसाठी करंजा-मोरा-कसारा, ससून डॉक बंदरात हजारो मच्छीमार बोटींची लगबग सुरू झाली आहे. समुद्रातील 35 ते 40 वाव पृष्ठभागावरील मासेमारीला पर्सियन …

Read More »

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने विजयी सुरुवात केली आहे. ग्रुप स्टेज मॅचमध्ये सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा दारुण पराभव केला. सिंधूने पोलिकार्पोवाचा 21-7, 21-10 असा पराभव करून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. फक्त 29 मिनिटांत सिंधूने पोलिकार्पोवाला पराभवाची धूळ चाखली. रिओ (ब्राझील) ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता ठरलेल्या पी. …

Read More »

टोकियो ऑलिम्पिक : मेरी कोम अंतिम 16मध्ये

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉम हिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. सहा वेळा विश्व चॅम्पियन असलेल्या ‘सुपर मॉम’ मेरीने अंतिम 16मध्ये प्रवेश केला आहे. मेरीने डोमिनिकाच्या मिगुएलिना हर्नांडेज हिला 4-1ने पराभूत केले. मणिपूरची 38 वर्षीय मेरी कोम टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय दलाची ध्वजवाहक होती. …

Read More »

दिव्यांग तरुणाचा प्रामाणिकपणा

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील पाले गावातील रुपेश म्हात्रे या दिव्यांग तरुणाने त्याला सापडलेले पैशांनी भरलेले पाकिट हे त्याने पाकिटाच्या मालकाचा शोध घेऊन त्याला परत केले. त्याच्या या प्रामाणिकपणाचे अनेकांकडून कौतुक होत आहे. रुपेश म्हात्रे हा उरण तालुक्यातील पाले या खेडे गावातला तरुण आपल्या उदरनिर्वाहापोटी भेंडखळ येथील युएलए या …

Read More »

आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तू

मोहोपाडा : प्रतिनिधी वासांबे (मोहोपाडा) परिसरातील लोधीवलीवाडी, शिवनगरवाडी, शिदींवाडी, मोहोपाडावाडी, खोंडावाडी आदी भागातील 145 आदिवासी बांधवांना एकात्मिक विकास प्रकल्प, पेण यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे खावटी वाटपाचा कार्यक्रम मोहोपाडा व नवीन पोसरी येथील रास्त भाव धान्य दुकानाच्या आवारात झाला. या वेळी नवीन पोसरी येथे 36 तर मोहोपाडा रास्त भाव दुकानावर 112 खावटी …

Read More »

मेट्रो सेंटर कार्यालयाला पावसाचा फटका

पाणी घुसल्याने कागदपत्रे, फाईल्स भिजल्या पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल येथील सिडको इमारतीतील असलेल्या मेट्रो सेंटरला गेल्या तीन दिवस सुरू असलेल्या पावसाचा फटका बसला. इमारतीतील स्लॅबमधून पावसाचे पाणी जोरात कार्यालयात पडल्याने सर्व ठिकाणी पाणीच पाणी साचले होते. या वेळी या कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, फाईल भिजल्या. गेल्या पाच ते सहा दिवस …

Read More »