महाड ः प्रतिनिधीपुराचे पाणी शिरून महाडमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर धावले असून, त्यांनी पूरग्रस्तांसाठी शनिवारी (दि. 24) अन्न-पाण्याचे वाटप सुरू केले. महाड शहर परिसरासह तालुक्यात अतिवृष्टी होऊन सावित्री, काळ आणि गांधारी या नद्यांचे पाणी घरे आणि दुकानांमध्ये शिरले होते. …
Read More »Monthly Archives: July 2021
रायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत दरड कोसळली असून तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेनंतर येथील 15 घरांतील 78 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याची दाणादाण उडवली आहे. संततधार पावसाने मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, जीवितहानीही प्रचंड झाली आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात …
Read More »मॅकडोनाल्ड कर्मचार्यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य
पनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्यांनी शुक्रवारी (दि. 23) काम बंद आंदोलन केले. याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांना माहिती मिळताच त्यांनी मॅकडोनाल्ड येथे जाऊन आंदोलकांची बाजू प्रखरपणे मांडली, तसेच पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांनीही …
Read More »समर्थ बूथ अभियानांतर्गत खालापूर भाजपची बैठक
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खालापुर तालुक्याची समर्थ बूथ अभियान अंतर्गत मोहोपाडा येथील पक्ष कार्यालयात शक्ती केंद्र प्रमुख व बूथ अध्यक्ष यांची बैठक झाली. या वेळी महाराष्ट्र राज्यातील व रायगड जिल्ह्यातील दरड संकटामध्ये बळी पडलेल्या बांधवाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानतंर सभा सुरू झाली. या वेळी खालापूर तालुका …
Read More »जनतेला पाठ दाखवणारे हे कसले पालकमंत्री
चित्रा वाघ अनिल परब यांच्यावर संतापल्या मुंबई : प्रतिनिधी गुरुवारची पहाट कोकणासाठी दहशतीची ठरली. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने कोकणातील जनजीवन कोलमडून गेले. अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. दरम्यान चिपळूणचे नागरिक संकटात असतांना पालकमंत्री अनिल परब पळ काढतात, अशी टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी …
Read More »‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’
मुंबई : प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. तसेच रायगड, रत्नागिरी, सातार्यात दरड कोसळून दुर्घटना सुद्धा घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील तळीये येथे दरड दुर्घटनेत तब्बल 44 जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही काही नागरिक बेपत्ता आहेत. राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीनंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा …
Read More »मुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वरातीमागून घोडे -प्रवीण दरेकर
मुंबई : प्रतिनिधी महाडच्या तळीये गावात दरड कोसळून तब्बल 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर शनिवारी (दि. 24) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीयेमध्ये आले होते. मुख्यमंत्र्यांच्या या दौर्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वराती मागून घोडे आहेत, अशी खोचक टीका केली …
Read More »लहानग्यांसाठीच्या कोरोना लसीचे सप्टेंबरपर्यंत निष्कर्ष येण्याची शक्यता
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतात सध्या 18 वर्षांवरील वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. आता लहान मुलांच्या कोरोना लसीसंदर्भात एक बातमी समोर आली आहे. एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलेय की, देशात लहान मुलांसाठी बनवली जात असलेली भारत बायोटेक कंपनीची कोरोना लस कोवॅक्सिनची चाचणी सध्या सुरू आहे. याचे …
Read More »गोवा, कर्नाटक, बिहारलाही अतिवृष्टीचा फटका; अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती
पणजी, पाटणा, बंगळुरू ः वृत्तसंस्था गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरून नुकसान झाले आहे. गोव्यात एक हजारांहून अधिक घरांना पुराचा फटका बसला आहे, तर हजारो लोकं बेघर झाली आहेत. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोव्याचे …
Read More »प्रख्यात कवी सतीश काळसेकर यांचे निधन
पेण ः प्रतिनिधी प्रख्यात कवी, संपादक, अनुवादक आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. पेण येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश काळसेकर यांचा जन्म सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील काळसे गावी झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण सिंधुदुर्गमध्येच झाले. पुढे मुंबईत महाविद्यालयीन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper