Breaking News

Monthly Archives: July 2021

उरण तालुक्यातील 715 पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात उद्भवलेल्या पूरस्थितीचे पंचनामे उरण तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले असून तालुक्यातील एकूण 715 घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामधील सर्वाधिक चिरनेर गावाला पुराचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. मागील आठवड्यात मुसळधार पावसाने उरणला झोडपले होते. या मुसळधार पावसामुळे मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरामध्ये पाणी …

Read More »

आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास कार्यक्रमास प्रारंभ

पनवेल ः रामप्रहर वत्त भारतीय बौध्द महासभा, जिल्हा रायगड अंतर्गत तालुका पनवेलच्या वतीने आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास कार्यक्रमाचा प्रारंभ, कळंबोली येथील आम्रपाली बुद्ध विहार येथे शनिवारी (दि. 24) सायंकाळी संस्थेचे तालुकाध्यक्ष सुनील वाघपंजे यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आला. यावेळी पूजनीय भन्ते धम्म सूर्या यांनी धम्मदेसना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे …

Read More »

धोकादायक ट्रान्सफॉर्मरचे खांब बदलले

माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त धोकादायक झालेले ट्रान्सफॉर्मरचे खांब माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे महावितरणकडून त्वरित बदलण्यात आले. पयोनियर विभाग संघमित्रा सोसायटीजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरचे खांब कुचकामी झाले होते आणि ते कोणत्याही क्षणी पडून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही गंभीर बाब कार्यक्षम …

Read More »

अनेक स्तरांतून पूरग्रस्तांसाठी मदतीचा महापूर

कोटगाव ग्रामस्थ मंडळ व प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था उरण : वार्ताहर   येथील उरण कोटगाव ग्रामस्थ मंडळ व कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था यांच्या वतीने सोमवार (दि. 26) जुलै रोजी महाड येथील तहसीलदार सुरेश कासिंद यांच्याकडे जीवनावश्यक वस्तू स्वाधीन केल्या. महाड, पोलादपूर, चिपळूण, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंब …

Read More »

महाडचे आबा गेले; माजी आमदार माणिक जगताप यांचे निधन

महाड : प्रतिनिधीमहाडचे माजी आमदार तथा काँग्रेसचे सरचिटणीस माणिक जगताप यांचे रविवारी (दि. 25) रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू होते. कै. माणिक जगताप यांच्यावर महाड येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. विद्यार्थी काँग्रेसमधून जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. …

Read More »

‘मुंबईकरांना मदत करण्यास विसरू नका’

मुंबई : प्रतिनिधी अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदत करताना मुंबईतील नुकसानग्रस्तांना मदत करण्यास विसरू नका. तसे झाले तर मुंबई भाजप तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांना आणि महाविकास आघाडीला दिला. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना विनानिकष मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे, त्यावरून …

Read More »

भाजप नेते मेघनाथ म्हात्रे यांचे निधन

उरण : वार्ताहर जासई परिसरातील भाजपचे उमदे नेतृत्व समजले जाणारे जासई विभागीय भाजपचे अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे यांचे वयाच्या 45व्या वर्षी रविवारी (दि. 25) अल्पशा आजाराने निधन झाले. युवा नेतृत्व हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कै. मेघनाथ म्हात्रे यांच्या पार्थिवावर जासई …

Read More »

जनतेचा आक्रोश समजून घ्या!; भास्कर जाधवांच्या वर्तनावर फडणवीसांनी सुनावले

मुंबई : प्रतिनिधीशिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. मदतीसाठी आक्रोश करणार्‍या एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच दमदाटी केल्यामुळे राज्यभरातून भास्कर जाधव यांच्यावर टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकटकाळात जनतेचा आक्रोश समजून घ्यावा, असे म्हणत भास्कर जाधव यांच्या या …

Read More »

महाडकरांसाठी भाजपचा मदतीचा हात; नागरिकांना दररोज भोजन, बिस्किटे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील महाडच्या तळीयेत महापूर आणि दरड कोसळल्याने मोठी हानी झाली. येथील नागरिकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आस्मानी संकटातून सावरण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाडकरांना मदतीचा हात देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नुकसानग्रस्त नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. गुरुवारी (दि. 22) तळीये गावात दुर्दैवी …

Read More »

पहिल्या टी-20मध्ये भारताचा श्रीलंकेवर विजय; मालिकेत 1-0ने आघाडी

कोलंबो : वृत्तसंस्था कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 38 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 165 धावांचं आव्हान ठेवले होते, मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेचा संपूर्ण संघ 18.3 षटकात गुंडाळला. श्रीलंकेचा संघ केवळ 126 धावा करू शकला. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमारने …

Read More »