Breaking News

Monthly Archives: October 2021

आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेणमध्ये भाजपचे बूथ जनसंपर्क अभियान

पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेणमध्ये भाजपच्या जनसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत वढाव पंचायत समिती गणाची बैठक नुकतीच वढाव येथे झाली. भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी बूथ प्रमुखाची फार महत्त्वाची भूमिका असते, असे मत भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी या वेळी व्यक्त केले. …

Read More »

पेणमध्ये तलाठ्यांचे धरणे आंदोलन

पेण : प्रतिनिधी ई-महाभूमी प्रकल्प राज्य समन्वय अधिकारी रामदास जगताप यांनी तलाठी संवर्गासंदर्भात असंवैधानिक शब्द वापरल्यामुळे तलाठी वर्गात संताप उसळला आहे. पेणमधील तलाठी संघटनेने सोमवारी (दि. 11) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जगताप यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. तलाठी संघटनेचे पेण तालुका अध्यक्ष आर. जे. सूर्यवंशी, उपाध्यक्ष एस. एल. विधाते, …

Read More »

रायगडात मिशन कवच कुंडल

अलिबाग : प्रतिनिधी कोरोना विषाणू प्रादूर्भाव व त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात नवरात्रोत्सवादरम्यान ‘मिशन कवच कुंडल’ नावाने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत 8 ते 10 ऑक्टोबर या तीन दिवसात 75 हजार 627 जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात असल्याची माहिती …

Read More »

‘मिशन कवच कुंडल अभियान यशस्वी करू या’

कर्जत : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण शिबिरे आयोजित करून मिशन कवच कुंडल अभियान यशस्वी करू या, असे आवाहन प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी सोमवारी (दि. 11) येथे केले. मिशन कवच कुंडल अभियानांतर्गत येथील रॉयल गार्डन सभागृहात सोमवारी इनरव्हील क्लब आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष …

Read More »

माथेरानमध्ये मॅरेथॉनला प्रतिसाद; आशिष पुणतांबेकर प्रथम

कर्जत ः बातमीदार कोरोनामुळे पूर्णतः बंद असलेले माथेरान मागील चार महिन्यांपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर माथेरानचे पर्यटन पुन्हा बहरावे यासाठी मुंबई व पुणे येथील रनबडीज या संस्थेने रविवारी (दि. 10) माथेरानमध्ये मॅरेथॉनचे आयोजन करून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. या स्पर्धेत 50 किमी अंतराच्या पुरुषांच्या वरिष्ठ गटात आशिष पुणतांबेकर प्रथम …

Read More »

खोपोलीच्या खेळाडूंचे बेंच प्रेस स्पर्धेत यश

खालापूर ः प्रतिनिधी औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत खोपोलीतील खेळाडूंनी यश मिळविले आहे. वेगवेगळ्या वजनी गटात खोपोलीतील योगेश पुजारी, दिनेश पवार, प्रीतम मंडल यांनी सुवर्ण, अक्षय शनमुगन, योगेश पुजारी, कृणाल पिंगळे यांनी रौप्य आणि शुभम कंगळे याने कांस्यपदक जिंकले. यशस्वी युवक येत्या काही दिवसांत गोव्यात होणार्‍या राष्ट्रीय आणि …

Read More »

कोलकाताची बंगळुरूवर मात; ‘क्वालिफायर-2’मध्ये आज दिल्लीशी भिडणार

शारजा ः वृत्तसंस्था सुनील नारायणने (4/21 आणि 26 धावा) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चार गडी आणि दोन चेंडू राखून पराभूत केले. आता अंतिम फेरी गाठण्यासाठी बुधवारी (दि. 13) होणार्‍या ‘क्वालिफायर-2’च्या लढतीत कोलकातापुढे दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असेल. बंगळुरूने …

Read More »

राजकीय सुंदोपसुंदीमुळे रोजगाराची संधी जाणार

कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प अन्य राज्यात जाऊ नये, यासाठी फडणवीस सरकारने तो प्रकल्प रायगड जिल्ह्यात रोहे परिसरात आणण्याचा प्रयत्न केला, त्याला शह देण्यासाठी शिवसेनेने त्या ठिकाणी ‘बल्क ड्रग्ज पार्क’ उभारण्याचे जाहीर केले. मात्र त्याला दोन वर्षे झाली तरी महाराष्ट्र शासन जागा उपलब्ध करून देऊ शकले नाही आणि रिफायनरी प्रकल्पाबाबतही काही …

Read More »

वीजटंचाईचे सावट

गेल्या काही दिवसांपासून देशभरातच वीजनिर्मिती घटल्यामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली दिसते. तथापि हे संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून लवकरात लवकर वीजसंकट दूर करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मात्र नेहमीप्रमाणे याहीबाबत कांगावा करण्याची संधी सोडलेली नाही. प्रत्येक समस्येत ज्यांना राजकारण दिसते, त्यांच्याकडून कसलीच …

Read More »

कांस्यपदकविजेत्या सुभाष पुजारी यांचा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या हस्ते गौरव

पनवेल : वार्ताहर जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा 2021मध्ये भारतासह महाराष्ट्र व नवी मुंबई पोलीस दलाचे नाव उंचावणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी उजबेकीस्तान येथील स्पर्धेत कांस्यपदक पटकाविल्याबद्दल त्यांचे पनवेलचे उपमहापौर व भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन विशेष सत्कार केला. या वेळी नगरसेवक विक्रांत …

Read More »