Breaking News

Yearly Archives: 2021

शिंपी समाजातर्फे आदिवासीवाडीत दिवाळी फराळ

पनवेल : वार्ताहर पनवेल येथील शिंपी समाज बांधवांतर्फे अलिबाग येथील बेलोशी-परळ वाडी येथील आदिवासी वाडीतील घराघरात जाऊन आदिवासी समाज बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी पनवेलचे संदीप शिंत्रे, मनीषा शिंत्रे, योगिता मांढरे, सुनील पोरे आणि एडवोकेट नागेश हिरवे हे उपस्थित होते. महाड पूरग्रस्तांसाठी भरीव मदत केल्यानंतर शिंपी समाज …

Read More »

स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या मैफिलीत पनवेलमध्ये आज दिवाळी पहाट

पनवेल : रामप्रहर वृत्त रसिक श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा मोर्चा पनवेलच्या वतीने शुक्रवारी (दि. 5) सकाळी 6 वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल ’दिवाळी पहाट’ …

Read More »

गव्हाण-कोपर येथे दिवाळी पहाटनिमित्त गाण्यांचा कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण-कोपर येथील श्री गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने दिवाळी पहाटनिमित्त गुरुवारी (दि. 4) अभंग, भावगीत, भक्तीगीत व नाट्यगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. गायिका सुप्रिया ठाकूर-घर, पखवाज तुषार घरत, तबला मिलिंद कडू, टाळ जितेंद्र घरत यांनी सुमधूर गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच माई …

Read More »

भाजपतर्फे मोहोपाड्यात दिवाळी पुर्वसंध्येला संगीतमय कार्यक्रम

मोहोपाडा : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष वासांबे (मोहोपाडा) यांच्या वतीने दिवाळी पुर्वसंध्या या सुमधूर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या शिवांजली इमारतीच्या सभामंडपात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करून श्रीगणेश, महालक्ष्मी प्रतिमेला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत झाली. …

Read More »

दिवाळीनिमित्त पनवेल परिसरात विविध कार्यक्रम उत्साहात

नवीन पनवेलमध्ये दिवाळी पहाटनिमित्त ’दिपज्योतीर्नमोस्तुते’ पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलच्या उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ आयोजित ’दिपज्योतीर्नमोस्तुते’ दिवाळी पहाट हा स्वर – झंकार प्रस्तुत मराठी-हिंदी संगीताचा कार्यक्रम गुरुवारी (दि. 4) नवीन पनवेलमधील बांठिया स्कूलच्या हॉलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून करण्यात आला.  भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी …

Read More »

माणगावात सर्पदंशाने बाळाचा मृत्यू

माणगाव : प्रतिनिधीमाणगाव तालुक्यातील खरीवली आदिवासीवाडी येथील दीड वर्षीय बाळाचा बुधवारी (दि. 3) विषारी साप चावल्याने मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुचिता किसन हिलम (वय 23, रा. खरीवली आदिवासीवाडी) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. माणगाव पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील मयत बाळ साहिल …

Read More »

देवद ग्रामपंचायतीच्या सदस्यांची भाजपत घरवापसी

पनवेल रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेल्या देवद ग्रामपंचायतीचे सदस्य निलेश जुवेकर आणि सुनंदा रणखांबे यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले आहे. देवद …

Read More »

कराडे खुर्दच्या प्रभारी सरपंचपदी भाजपच्या यशश्री मुरकूटे

मोहोपाडा : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती चितळे या काही कारणास्तव रजेवर गेल्याने सरपंपदाचा तात्पुरता कारभार पाहण्यासाठी भाजपच्या उपसरपंच यशश्री मुरकुटे यांना प्रभारी सरपंचपद बुधवारी (दि. 3) सोपविण्यात आले. यशश्री मुरकुटे यांची निवड होताच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर नागरिकांनी फटाके वाजवून जल्लोष केला. या वेळी माजी सरपंच विजय मुरकुटे, …

Read More »

भाजपच्या प्रयत्नांमुळे कामगारांना पगारवाढ; सुधीर ठाकूर, विजय घरत यांनी मानले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे कोपर अध्यक्ष सुधीर ठाकूर, गव्हाणचे उपसरपंच विजय घरत यांच्या प्रयत्नांमुळे 144 कामगारांना पगारवाढ आणि बोनस मिळाला आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सुधीर ठाकूर व विजय घरत यांच्यासह कामगारांनी आभार मानले आहे. न्हावा-शिवडी सी लिंकचे …

Read More »

कोरोनाबाबत हलगर्जीपणा केल्यास पुन्हा संकट; लसीकरण आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 100 कोटी डोस झाले असले तरी जर आपण हलगर्जीपणा केला, तर एक नवीन संकट येऊ शकते, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाच्या आढावा बैठकीत दिला. विदेश दौर्‍यावरून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 3) लसीकरणाचा आढावा घेतला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी 40 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांशी व्हिडिओ …

Read More »