खोपोली ः प्रतिनिधी आगामी पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जनहिताची जी कामे केली आहेत, कल्याणकारी योजना राबविल्यात त्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवावी, असे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 5) सूचित केले. खोपोली येथील पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. …
Read More »Yearly Archives: 2021
शिवसेना-शेकापमध्ये संघर्ष; मुरूडच्या ‘त्या’ जागेवरून जयंत पाटलांच्या आरोपाला महेंद्र दळवी यांचे प्रत्युत्तर
अलिबाग ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील विहूर येथील समुद्रकिनारी असलेल्या जागेच्या विक्री प्रकरणामुळे ग्रामस्थ संतापले असतानाच शिवसेना-शेकापमध्ये राजकारण तापले आहे. दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून शेकापच्या आरोपांना शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विहूर येथील त्या जागेवरून मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. मुरूडच्या नवाबाच्या वारसांनी ही जागा मुंबईतील एका व्यक्तीला विकली …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वांत लोकप्रिय नेते
नवी दिल्ली ः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांनी जगभरातील 13 नेत्यांना मागे टाकत ही लोकप्रियता मिळवली आहे. अमेरिकतील ग्लोबल लीडर अॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने यासंबंधी सर्वेक्षण केले होते, ज्यात पंतप्रधान मोदींना 70 टक्के गुणांकन मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, यूकेचे पंतप्रधान …
Read More »सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा
खोपोली : प्रतिनिधी दोन वर्षे कोरोना संकट व त्या अनुषंगाने लावण्यात आलेली बंधने व गरीब आदिवासी कुटुंबांवर ओढवलेले आर्थिक संकट याची जाणीव ठेवत खोपोली सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून रविवारी (दि. 5) आदिवासी व अन्य विविध समाजांतील 44 गरीब जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा साजरा करण्यात आला. कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी दोन …
Read More »पालीत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम
पाली : प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सुधागड-पाली अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी (ता. 4) पाली पंचायत समिती प्रांगणात करण्यात आले. या अभियानाची जनजागृती करण्यासाठी पोषण रॅली काढण्यात आली. या वेळी उपस्थितांनी पोषण शपथ घेतली. रांगोळी व गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सकस आहार प्रात्यक्षिक दाखविण्यात …
Read More »चौल नाक्यावर वाहतूक कोंडी
रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग व मुरूड रस्त्यावर वाढत्या वाहतुकीचा ताण मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चौल नाक्यावर पडत असून, येथे नित्य वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. दिवसेंदिवस अलिबाग व मुरूड तालुक्यात पर्यटकांच्या वाढत्या संख्येने येथील मुख्य रस्त्यावर वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी येथील रस्त्याला वाहतुकीचा ताण पडून वारंवार वाहतूक कोंडी …
Read More »माथेरानला पाणीपुरवठा करणारा शारलोट तलाव गळातच
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष कर्जत : बातमीदार माथेरानमधील पर्यटनस्थळांपैकी एक, तसेच संपूर्ण माथेरानला पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो त्या शारलोट तलावात गाळाचे साम्राज्य असून या वर्षीही शारलोट तलाव गाळमुक्त होण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. माथेरानमध्ये आलेला पर्यटक हा पर्यटनस्थळ शारलोट तलावाला आवर्जून भेट देतोच. सभोवताली गर्द वनराई, पश्चिमेला दरी असे …
Read More »बाप्पाच्या स्वागतासाठी श्रीवर्धन बाजारपेठ फुलली
नारळाबरोबरच यंदा केवडाही महागणार! श्रीवर्धन : प्रतिनिधी कोरोनामुळे गतवर्षी सण, उत्सव साजरे करण्यावर शासनाने काही बंधने घातली होती, मात्र यंदा निर्बंधात शिथिलता दिल्यामुळे गणेशोत्सवासाठी श्रीवर्धन बाजारपेठ चांगलीच सजलेली दिसत आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी लागणार्या सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ फुलली आहे. गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे तसतशी पूजा आणि सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची …
Read More »नवी मुंबई एपीएमसीत सुकामेव्याचे दर स्थिर
गणेशभक्तांसह ग्राहकांमध्ये समाधान नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या महिन्यात तालिबानच्या अफगाणिस्तानवरील कब्जाचे भारताच्या बाजारपेठेत पडसाद पाहायला मिळाले होते. लगेचच मुंबई एपीएमसी बाजारात सुक्यामेव्याच्या बाजारभावात वृद्धी झाली होती, परंतु गणेशोत्सवात तोंडावर आला असताना सुक्यामेव्याचा बाजारभाव स्थिर असल्याने गणेशभक्तांसह ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. सर्वांच्याच पसंतीचे आणि अधिक खाल्ले जाणारे बदाम …
Read More »पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक वाहने
पनवेल : वार्ताहर पोलीस लवकरात लवकर एखाद्या घटनेच्या ठिकाणी पोहचण्यासाठी शासनामार्फत नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत आता पोलीस ठाण्यांना अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा महिंद्रा बोलेरो जीप देण्यात आल्यामुळे पोलिसांचे काम अजून सुकर होणार आहे. एखादा अपघात घडल्यास, आग लागल्यास किंवा एखादी दुर्घटना झाल्यास पोलिसांना संबंधित ठिकाणी पोहचण्यासाठी कमीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper