Breaking News

Yearly Archives: 2021

पाणीपुरवठ्यासंदर्भात उपाययोजना करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडको अधिकार्‍यांना सूचना पनवेल ः रामप्रहर वृत्तखारघर, कामोठे, कळंबोली व नवीन पनवेल येथील पाणीपुरवठा समस्यांबाबत तसेच भविष्यकालीन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचित केल्याप्रमाणे सिडकोने दखल घेतली. त्या अनुषंगाने बुधवारी (दि. 1) सीबीडी बेलापूर येथे सिडको भवनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या वेळी बोलताना आमदार …

Read More »

ठाकरे सरकारने लॉकडाऊनचा धंदा केलाय; भाजप आमदार आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी ‘ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे, वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे, तिथे निर्बंध कडक राहतात. रेस्टॉरण्ट, बारवरील निर्बंध त्याच धर्तीवर शिथिल करण्यात आले आहेत आणि वाटा न देऊ शकणारे मराठी कलावंत, नाटक कलावंत, मराठी लोककलावंत, धूप कापूर विकणारे हे घाट्यात आहेत,’ …

Read More »

माणगाव स्टेशनमधील समस्या सोडवाव्यात

रेल्वे प्रवासी संघटनेचे कोकण रेल्वेच्या प्रबंध निर्देशकांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी तालुका रेल्वे प्रवासी संघटना आणि मेवाड युवक मंडळाच्या प्रतिनिधींनी बुधवारी (दि.1) माणगाव रेल्वे स्थानकांत कोकण रेल्वेचे प्रबंध निर्देशक संजय गुप्ता यांची भेट घेवून स्थानकातील प्रवासी समस्या व सुविधांबाबत चर्चा केली व निवेदन दिले. कोकण रेल्वेचे प्रबंध निर्देशक संजय गुप्ता …

Read More »

पेण-खोपोली बायपासवर कार व ट्रकची ठोकर

पेण : प्रतिनिधी पेण-खोपोली बायपासवरील गणपतीवाडी येथे मंगळवारी (दि. 31) कार आणि ट्रकची ठोकर झाली.  या अपघातात कार चालक सुरेश कदम (रा. गणपतीवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. पेण-खोपोली बायपास मार्गावर पनवेलच्या दिशेने जाणारी कार (एमएच-06,बीई-3242) आणि समोरून येणार ट्रक (एमएच-12,आरएन-2393) यांची मंगळवार समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात कार चालक सुरेश …

Read More »

राज्य शासनाच्या अनियमिततेचा शिक्षण व्यवस्थेला फटका -अमर वार्डे

पेणमध्ये गुणीजनांचा सत्कार पेण : प्रतिनिधी  राज्य सरकारच्या अनियमित कारभारामुळे शिक्षण व्यवस्था दिवसेंदिवस खिळखिळी होत चालली असून त्याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होणार असल्याची भीती दत्ताजी खानविलकर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांनी पेण येथे व्यक्त केली. पेण येथील सोबती संस्था व बापूसाहेब नेने फाउंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने विविध …

Read More »

पालीतील नवीन बसस्थानकाच्या बांधकामास मुहूर्त काही मिळेना!

इमारत पाडली, पुनर्बांधणी रखडली! पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील पाली येथील मोडकळीस आलेल्या एसटी बसस्थानकाची इमारत पाच महिन्यांपूर्वी पाडण्यात आली आहे, मात्र त्या ठिकाणी नवीन इमारत बांधणीस अजूनही सुरुवात झालेली नाही. दरम्यान, बसस्थानक इमारती अभावी प्रवासी व परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांची गैरसोय होत आहे. अनेक वर्षे धोकादायक स्थितीतल्या पाली बसस्थानकाची …

Read More »

आदिवासी सेवा संघाकडून श्रवण भगतला आर्थिक मदत

कर्जत : बातमीदार खेळताना गंभीर जखमी झालेल्या श्रवण विलास भगत (वय 13, रा. भक्ताचीवाडी, ता. कर्जत) याला आदिवासी सेवा संघाने उपचारासाठी आर्थिक मदत केली. श्रवण भगत याचे वडिलांचे छत्र यापूर्वी हरवले आहे. आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्याची आई श्रवणवर उपचार करू शकत नव्हती. त्यामुळे आदिवासी सेवा संघाने या तरुणाच्या उपचाराचा …

Read More »

कर्जतमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात

कर्जत : बातमीदार श्री साई ट्रस्ट आणि कर्जत नगरपालिकेच्या समाजकल्याण सभापती वैशाली दीपक मोरे यांच्या माध्यमातून गुंडगे गाव आणि पंचशीलनगर येथील सुमारे 50 पूरग्रस्त कुटुंबांना ब्लँकेट, चादर आणि बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले. बुद्धविहार येथे झालेल्या या मदत वाटप कार्यक्रमाला नगरसेविका वैशाली मोरे, श्री साई ट्रस्टच्या चेअरमन लक्ष्मी अय्यर, गणेश …

Read More »

रोह्यात पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला साजरा

उत्सवावर कोरोनाचे सावट रोहे : प्रतिनिधी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन रोहा शहरासह ग्रामीण भागात गोकुळाष्टमी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. याही वर्षी शहरात मोठ्या दहीहंड्या लावण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे गोविंदा पथके हिरमुसल्याचे दिसून आले. कोरोनामुळे रोहे तालुक्यात गेली दोन वर्षे गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत …

Read More »

कशेडी घाटातील भुयारी मार्ग पूर्णत्वाकडे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी म्हणून भुयारी मार्ग काढण्यात येत आहेत. त्यापैकी एक भुयार नुकतेच आरपार झाले असून दुसरे भुयारही लवकरच आरपार होऊन या वर्षअखेरीस, भुयारी मार्गाचे काम पूर्ण होऊन 2022 मध्ये लोकार्पण केले जाणार आहे, अशी माहिती या भुयारी मार्गाचे इन्चार्ज नितीन रंजन यांनी प्रत्यक्ष भुयारी मार्गाचे कामकाज …

Read More »