Breaking News

Yearly Archives: 2021

विकासासाठी भाजपला सत्ता द्या -आमदार रवींद्र चव्हाण

पालीत प्रचार रॅली व सभा पाली ः प्रतिनिधी आपल्या भारत देशाला सशक्त बनवायचे असेल तर सशक्त भाजप बनवावा लागेल. या दृष्टीने परिसराचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत ते संसद सर्वत्र भाजप सत्तास्थानी येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी …

Read More »

अनिल परबच गद्दार, राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेना संपण्याचा डाव

रामदास कदमांचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना नेते रामदास कदम यांनी शनिवारी (दि. 18) पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. परब हे शिवसेना संपवायला निघाले आहेत. तेच गद्दार असून रत्नागिरीतील शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप कदम यांनी या वेळी केला. …

Read More »

सहकार चळवळ पुढे नेणार – अमित शाह

अहमदनगर ः प्रतिनिधी सहकार क्षेत्राच्या चळवळीला आम्ही पुढे घेऊन जाऊ इच्छितो. त्यामुळे येणार्‍या काळात या क्षेत्राला काहीही मदत लागली तर नरेंद्र मोदी सरकार ती देईल, असे आश्वासन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी शनिवारी (दि. 18) दिले. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे आयोजित देशातील पहिल्या सहकार परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर रेल्वे …

Read More »

पाकिस्तानातून आलेले चिनी बनावटीचे ड्रोन बीएसएफने पाडले

नवी दिल्ली : भारतीय सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही थांबलेल्या नाहीत. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांचे घुसखोरी करण्याचे प्रत्यन सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला जगासमोर उघडे करणारी एक घटना घडली आहे. सीमा सुरक्षा दलाने शनिवारी (दि. 18) फिरोजपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानमधून आलेले एक ड्रोन यशस्वीरित्या पाडले. हे ड्रोन चिनी बनावटीचे असल्याचेही समोर …

Read More »

आजिवलीतील तरुणाने केले आई वडिलांचे स्वप्न साकार

पनवेल : रामप्रहर वृत्त स्वप्नांना पंख असतात असे म्हणतात, पण त्या पंखांमध्ये मेहनतीचेही बळ असते. अशाच एका तरुणाने जिद्दीने, चिकाटीने आणि मेहनतीने आपल्या स्वप्नपंखांमुळे यशस्वी भरारी घेतली आहे. उमेश मगर या तरुणाने आपल्या आई वडिलांना हेलिकॉप्टरमधून फिरवायचे स्वप्न स्वत:च्या वाढदिवसानिमित्त नुकतेच साकार केले. पनवेल तालुक्यातील आजिवली गावातील हा मुलगा गवंडी …

Read More »

पनवेल, उरण, नवी मुंबईत दत्त जयंती उत्साहात

पनवेल : वार्ताहर पनवेलच्या गावदेवीपाडा येथे श्री स्वामी समर्थ मठात दत्तजयंती नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ आरती संग्रह आणि स्वामीच्या पोथीचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी श्री स्वामी समर्थ मठाधिपति सुधाकर भाऊ घरत, नगरसेवक अजय बहिरा, पनवेल महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके, …

Read More »

अंधेरी कामगार राज्य विमा रुग्णालय सुरू त्वरीत सुरू करा

भारतीय मजदूर संघाची मागणी मुंबई :प्रतिनिधी अंधेरीतील कामगार राज्य विमा रुग्णालयाला 17 डिसेंबर 2018 आग लागली होती. या आगीत 14 रुग्णांचा मृत्यू झाला होता. गेल्या तीन वर्षांपासून हे रुग्णालय बंद असून ते त्वरित सुरू करावे अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाद्वारे कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना …

Read More »

जासई हायस्कूलमध्ये अल्पसंख्यांक हक्क दिवस

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये 18 डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून  साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री  सुरेश पाटील हे होते. त्यांनी …

Read More »

सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाचे उदघाटन

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय विस्तारित व नुतनीकरणचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या हस्ते बुधवारी (दि. 15) सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय पोर्ट विभाग येथे झाले. यासोबत त्यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) सचिन सावंत यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. …

Read More »

कळंबोळी मंडलतर्फे पिशव्यांचे वाटप

कळंबोली : रामप्रहर वृत्त प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमार्फत मोफत धान्य वाटप सुरू असताना पिशव्यांचे वाटप कळंबोळी मंडलतर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम कार्यक्रमचे संयोजक संतोष मानसिंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी कळंबोली सरचिटणीस संजय दोडके व सरचिटणीस दिलीप बिष्ट, उपाध्यक्ष संदीप भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते देविदास खेडेकर, भिसे व रवी …

Read More »