Breaking News

Yearly Archives: 2021

खोपोली-पेण मार्गावर कारला टँकरची धडक

खोपोली : प्रतिनिधी खोपोली-पेण मार्गावर शनिवारी (दि. 18) भरधाव टँकरची प्रवासी इको कारला धडक बसून झालेल्या अपघातात इको चालकासह पाच प्रवासी जखमी झाले. पेण येथून खालापूर हद्दीत असलेल्या पारले कारखान्यातील कामगारांना घेऊन शनिवारी सकाळी इको जात असताना, आपटी गावाच्या हद्दीत समोरून ओव्हरटेक  करत आलेल्या टँकरने इकोला धडक दिली. सुदैवाने एअर …

Read More »

नेने महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 उपक्रम

पेण : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या वतीने सामाजिक जाणिवेतून वर्षभरात 75 उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ महाविद्यालयात करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून असीम फाउंडेशन पुणे येथील सारंग गोसावी, प्रमुख अतिथी म्हणून सोबती संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. बापूसाहेब नेने व कार्यक्रमाच्या …

Read More »

एकलव्यनगर वाडीवर कातकरी उत्थान अभियानाचा शुभारंभ

माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यामध्ये महाराजस्व अभियानास प्रारंभ झाला. त्या अंतर्गत दि. 16 डिसेंबर रोजी माणगाव तालुक्यातील एकलव्यनगर (चांदे) आदिवासीवाडी येथे कातकरी उत्थान अभियान राबविण्यात आले. या वेळी माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर व तहसीलदार प्रियंका आयरे यांची प्रमुख उपस्थिती होती. माणगाव तालुक्यामध्ये एकूण 98 कातकरी वाड्या असून सुमारे 20 …

Read More »

सेंद्रिय शेतीचा पुरस्कर्ता : हेमंत कोंडिलकर

समाजातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या तरी आजाराने ग्रासले आहे, त्याला कारणे अनेक असतील पण शेतीकडे दुर्लक्ष आणि शेतीमधून पिकणारे पीक हे महत्त्वाचे शास्त्रीय कारण आहे. पूर्वी आपल्या कृषीप्रधान देशात शेती हा एकमेव व्यवसाय होता आणि त्यामुळे प्रत्येक घरातील माणसे ही बाराही महिने शेतीत मग्न असायची. त्यामुळे काय व्हायचे की शेतीत गुंतले …

Read More »

आजपासून किशोर गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

मुंबई ः प्रतिनिधी यजमान परभणी विरुद्ध नांदेड आणि गतविजेता ठाणे विरुद्ध सोलापूर यांच्यात किशोर, तर गतविजेते मुंबई उपनगर विरुद्ध पालघर आणि परभणी विरुद्ध लातूर यांच्यात किशोरी गटातील सामन्याने 32व्या किशोर गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला सोमवार (दि. 20)पासून प्रारंभ होईल. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अधिपत्याखाली परभणी …

Read More »

नवी मुंबई महापालिकेतर्फे ऑनलाईन स्पोर्ट्स फेस्टिव्हल

नवी मुंबई ः बातमीदार सध्याची कोव्हीड प्रभावित परिस्थिती व कोविड प्रतिबंधात्मक नियमावली लक्षात घेता नवी मुंबईकर नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करुन त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने अभिनव स्वरुपाच्या ऑनलाईन स्पोर्ट्स फेस्टिव्हल 2021-22चे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धांमध्ये बुद्धिबळ, योग तसेच बॉस्केटबॉल स्किल चॅलेंज, फुटबॉल स्किल चॅलेंज, …

Read More »

रायगड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा : नवजीवन पेझारी संघ विजेता

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथे आयोजित रायगड जिल्हा पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत नवजीवन क्रीडा मंडळ पेझारी संघाने विजेतेपद पटाकावले. ज्ञानेश्वर क्रीडा मंडळ कोळवे संघ उपविजेता ठरला, तर बजरंग बेली आणि गणेश दिवलांग या संघांनी तृतीय क्रमांक मिळवला. नवजीवन …

Read More »

विरोधी पक्षनेते दरेकर आज रायगड दौर्यावर

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर रविवारी (दि. 19) रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात दरेकर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. रायगड जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये एकूण सहा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 21) …

Read More »

कंपनीतील स्फोटाने खोपोली हादरली

सुदैवाने जिवीत हानी नाही, मात्र नागरिकांना जाणवला त्रास खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका हद्दीतील महिंद्रा सानियो लिमिटेड या स्टील उत्पादन करणार्‍या कारखान्यात ऑक्सिजन साठवणूक करणार्‍या टाकीचा अचानक स्फोट झाला. या स्फोटाने परिसरात खोपोली शहरात काही क्षणापुरते हादरे बसले. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही, मात्र स्फोटामुळे उधळलेल्या पावडरचा त्रास …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आरडीपीएलचे उद्घाटन

रसायनी ः रामप्रहर वृत्त रायगड डॉक्टर्स लेदर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मोहोपाडा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीस मार्केट्स क्रिकेट ग्राऊंडवर रायगड डॉक्टर प्रीमियर लीगचे (आरडीपीएल) आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय क्रिकेट लीगचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) झाले. या वेळी रायगड डॉक्टर्स …

Read More »