रोहा सिटीझन फोरमची मागणी धाटाव : प्रतिनिधी मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे काही दिवसांपुर्वी रोहे शहराचा पाणीपुरवठा बंद झाला होता. सहा दिवसांनंतर शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला खरा परंतु अनेक भागात अजूनही अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत आहे. रोहा तालुका सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाने गुरुवारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांची भेट घेतली आणि …
Read More »Monthly Archives: January 2022
रायगड जिल्ह्यातील करोना रुग्णवाढ झपाट्याने
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. जिल्ह्यात सहा दिवसात साडे तीन हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची वाढ वेगात होत असली तरी लसीकरण झाले असल्यामुळे परिस्थिती गंभीर होणार नाही, असा प्रशासनाला विश्वास आहे. जिल्ह्यात 1 जानेवारी 2022 रोजी 196 नवीन रुग्ण आढळले होते. त्यावेळी …
Read More »सुधागडात गावठी दारू निर्मिती व विक्री करणार्यांवर कारवाई
तिघांवर पाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पेंढारमाळ हद्दीत अवैधरीत्या गावठी दारू निर्मिती व विक्री करणार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पेंढारमाळ परिसरातील जंगल भागात अवैधरीत्या गावठी दारू निर्मिती व विक्री करण्यात येत असल्याची खबर मिळाल्यानंतर …
Read More »कर्जतच्या शारदा मंदिरामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
कर्जत : प्रतिनिधी येथील शारदा मंदिर इंग्लिश मिडीयम स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम सादर केला. कर्जत शहरातील शाळा मागील एक ते दिड वर्षांपासून कोरोना महामारीमुळ ऑनलाइन पद्धतीने सुरू होत्या. काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आणि मुलांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबविणार्या …
Read More »पेणमध्ये आदिवासींना वनहक्क दस्तऐवजाचे वाटप
पेण : प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त कातकरी उत्थान अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पेण नगर परिषदेच्या सभागृहात आदिवासींना वनहक्क दस्तऐवजाचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 16 आदिवासी, कातकरी लाभार्थ्यांना वनहक्क दस्तऐवजाचे वाटप करण्यात आले. आज खर्या अर्थाने लाभार्थी आदिवासी बांधव जमीनीचे मालक झाले असून त्याचा लाभ त्यांनी …
Read More »पाली शहरात खड्डे, धुरळ्याचा त्रास
महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक क्षेत्र आणि सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. डम्परमधून उडणार्या व खड्ड्यांतून निघणार्या धुरळ्याचा खूप त्रास होत आहे. यामुळे येथे येणारे भाविक व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. पालीतून होणार्या अवजड वाहतुकीमुळे खड्ड्यांनी डोकं वर काढले आहे. शिवाय खड्ड्यात टाकलेली खडी व …
Read More »पाली नगरपंचायत निवडणूक रिंगणात 17 उमेदवार; छाननीत 28 पैकी आठ अर्ज बाद
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायतीच्या चार प्रभागांतील चार जागांच्या निवडणुकीसाठी 28 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. मंगळवारी झालेल्या छाननीत यातील आठ नामनिर्देशनपत्रे बाद झाली. त्यामुळे आता एकूण 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी बुधवारी (दि. 5) दिली. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने पाली नगरपंचायतच्या …
Read More »पत्रकार दिनानिमित्त माणगाव उपजिल्हा रुग्णालयात औषध व फळवाटप
माणगाव : प्रतिनिधी पत्रकार दिनानिमित्त माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे येथील उपजिल्हा रुग्णालयात भाजपचे तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 6) औषधे व फळांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला संजयआप्पा ढवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील नेत्रारोगतज्ज्ञ डॉ. शंतनु डोईफोडे …
Read More »कर्जतमध्ये कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ; प्रशासन सतर्क
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार तालुक्यात पूर्वी एक-दोन कोरोना रुग्ण आढळत होते, आता त्यात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी (दि. 5) एका दिवसात चक्क 27 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. फार्महाऊसेस आणि त्यानंतर सुरू झालेल्या लहान-मोठ्या रिसॉर्टमुळे कर्जतची आता पर्यटन तालुका म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे शनिवार-रविवार, तसेच सुट्टीच्या …
Read More »रायगड जिल्ह्यातील जमिनी लाटण्याचा डाव
रायगड जिल्ह्यात मोठमोठाले प्रकल्प येत आहेत. त्यासाठी जमिनी संपादित करण्याचे काम सुरू आहे. नवीन प्रकल्पाच्या नावाखाली जमिनी घेतल्या जात आहेत, परंतु यापूर्वी औद्योगिक कारणांसाठी शेतकर्यांच्या जमिनी घेण्यात आल्या, मात्र त्यापैकी अनेक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे उद्योग सुरू करण्यात आलेले नाहीत. शेतकर्यांच्या पिकत्या जमिनी घेऊन त्या पड ठेवण्यात आल्या आहेत. हेच ‘उद्योग’ …
Read More »