पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील उन्हेरे बुद्रुक (धनगरवाडी) येथील राम धोंडू ढेबे यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत दोन लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल व रोख रक्कम जळून खाक झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही आग नक्की कशाने लागली याचे कारण समजलेले नाही. मात्र आग शॉर्टसर्किटमुळे लागली …
Read More »Monthly Archives: February 2022
शाईफेकीच्या निषेधार्थ मुरूड नगर परिषद कर्मचार्यांचे लेखणी बंद आंदोलन
मुरूड : प्रतिनिधी अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रविण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या निषेधार्थ मुरूड नगर परिषद कर्मचार्यांनी शुक्रवारी (दि. 11) काम बंद आंदोलन केले आहे. मुरूड नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक परेश कुंभार, बांधकाम विभाग अधिकारी संजय वेटकोळी, पाणीपुरवठा अधिकारी प्रशांत दिवेकर, नरेंद्र नांदगावकर, साहिल मुजावर, कपिल वेहेले, गोपाळ चव्हाण, राकेश पाटील, …
Read More »फणसाड अभयारण्य पर्यटकांना खुले; रानगव्यांची संख्या वाढली
मुरूड : प्रतिनिधी कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने फणसाड अभयारण्य 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने हे अभयारण्य आता पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. मुरूडपासून 14 कि.मी. अंतरावर असलेल्या फणसाड अभयारण्याचे क्षेत्रफळ 54चौ.कि.मी.आहे. याअभयारण्यात विविध वन्यजीव, अनेक सरपटणारे प्राणी व औषधी वृक्षांची संपदा आहे. बिबट्या, रानमांजर, …
Read More »माथेरानमधील आकाशगंगा निरीक्षण केंद्र बंद
कर्जत : बातमीदार माथेरान नगर परिषदेने आकाशगंगा हा अवकाश निरीक्षण प्रकल्प उभारला आहे. काही खगोलप्रेमी या केंद्रावर येऊन अवकाश दर्शन करायचे. मात्र कोटीच्या घरात खर्च करून उभारलेला हा प्रकल्प गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. आकाशगंगा निरीक्षण केंद्रात आल्यानंतर पर्यटकांना सुरुवातीला ग्रह आणि तार्यांविषयी माहिती दिली जाते. त्यानंतर 35 आसनी थिएटरमध्ये …
Read More »नेरळ ग्रामपंचायतीच्या कामगारांचे प्रश्न मार्गी
कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकार्यांनी सकारात्मक भूमिका घेत कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. कर्जतचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांच्या दालनात नेरळ ग्रामपंचायत कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. गटविकास अधिकार्यांसह नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, सदस्य उमा खडे, गीतांजली देशमुख, श्रद्धा …
Read More »वाशीच्या खाडीत डॉल्फिनचे दर्शन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीच्या खाडीमध्ये शुक्रवारी (दि. 11) डॉल्फिन मासा पहायला मिळाला. मासेमारी करणार्या युवकाने पाण्यामधून बाहेर उडी मारणार्या डॉल्फिन माशाचे दृश्य आपल्या मोबाइलमध्ये कैद केले आहे. मागील वर्षीदेखील नवी मुंबईत डॉल्फिन पाहायला मिळाला होता. नवा व्हिडीओ व्हायरल झाला असून आता नवी मुंबईकर डॉल्फिनला पाहण्यासाठी खाडीकिनारी गर्दी करताना …
Read More »जनतेला गुंडराज नकोय -पंतप्रधान मोदी
लखनऊ : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसर्या फेरीच्या मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि. 11) कासगंज येथे प्रचारासाठी आले होते. या वेळी त्यांनी पहिल्या टप्प्यात भाजपला प्रचंड बहुमत मिळेल, असा दावा केला तसेच जनता तुम्हाला स्वीकारणार नाही, जनतेला गुंडराज नको आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना टोला लगावला. …
Read More »आंबेत पुलाची पुन्हा होणार डागडुजी; याआधी खर्च केलेेले 12 कोटी पाण्यात
महाड : प्रतिनिधी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणार्या आंबेत पुलाच्या दुरुस्तीसाठी नुकतेच 12 कोटी खर्च करण्यात आले होते, मात्र पुलाचे पिलर झुकल्याचे निदर्शनास येताच या पुलावरील अवजड वाहतूक पुन्हा एकदा बंद करण्यात आली असून, पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. दरम्यान, भविष्याचा धोका लक्षात घेऊन याठिकाणी नव्या पुलाची उभारणी …
Read More »राजभवनातील दरबार हॉलचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : प्रतिनिधी राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 11) करण्यात आले. या सोहळ्याला राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व इतर मान्यवर उपस्थित होते. आपल्या संविधानानुसार आम्ही भारताचे लोक हा देशाच्या सार्वभौमत्वाचा …
Read More »माथेरानची मिनीट्रेन लवकरच रूळावर
माथेरान : प्रतिनिधी नेरळ ते माथेरानदरम्यानच्या मिनीट्रेनचा रेल्वेमार्ग अतिवृष्टीत वाहून गेला होता. त्यामुळे मध्य रेल्वेकडून या मार्गावर आवश्यक ती कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता असून पर्यटकांचे खास आकर्षण असलेली मिनीट्रेन लवकरच रूळावर येणार आहे. सन 2019मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे मोठ्या प्रमाणात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper