रसायनी ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. 4) झाली. या वेळी भाजपचे सतिष म्हस्कर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सरपंच म्हस्कर यांचे अभिनंदने केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी …
Read More »Monthly Archives: February 2022
सेतू प्रकल्पबाधित नवी मुंबईतील मच्छीमारांना गणपती बाप्पा पावला!
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवात नवी मुंबई ः प्रतिनिधी, बातमीदार एमएमआरडीएचा बहुचर्चित असा न्हावा-शिवडी सी लिंक प्रकल्प उभारण्यात येत असून प्रकल्पबाधित असलेल्या नवी मुंबईतील मच्छीमार बांधवांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मागणी व पाठपुराव्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या दिवाळे, बेलापूर व सारसोळे गाव …
Read More »फेसबुकवर मुलीशी मैत्री महागात; रायगडात 50 जणांना फटका
अलिबाग : प्रतिनिधी फेसबुकवर मुलीशी मैत्री करताय, मग सावधान! अन्यथा तुम्हाला लाखोंचा चुना लागू शकतो. रायगड जिल्ह्यातील साधारण 50 जणांना फेसबुक मैत्रीचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यात अलिबागमधील दोन जणांचा समावेश आहे. समाजात आपली बेइज्जत होईल या भीतीने पोलिसांत तक्रार करण्यास अनेक जण पुढे येत नसल्याचे चित्र आहे. …
Read More »माणगावचे ज्ञानदेव पवार काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत
माणगाव : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी नगराध्यक्षपदासाठी माणगाव विकास आघाडीतर्फे नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यावर शुक्रवारी (दि. 4) काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत माणगाव येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या वेळी ज्ञानदेव …
Read More »खारघरमध्ये आरोग्य शिबिराचे सभागृह परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघरमधील वास्तुविहारमध्ये भाजपचे युवा नेते तथा साई गणेश मंदिर ट्रस्टचे संस्थापक समीर कदम आणि प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती संजना कदम यांनी माघी गणेशोत्सव आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 4) केले होते. या शिबिराचे उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच …
Read More »पनवेल मनपाची इंग्रजी माध्यम शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव महासभेत येणार
पनवेल : प्रतिनिधी महापालिका क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. खाजगी इंग्रजी माध्यामांच्या शाळांची फी भरणे गरीब पालकांना शक्य नसते. ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन इंग्रजी माध्यामाची शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करण्यात येणार आहे. सद्यपरिस्थितीत बहुतांश पालकांचा ओढा हा इंग्रजी …
Read More »पूरपरिस्थितीच्या उपाययोजनांबाबत दिरंगाई होत असल्याने महाडकर नागरिक आक्रमक
प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा महाड : प्रतिनिधी महाड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून येणार्या पुरावर राज्य शासनाकडून केल्या जाणार्या उपाययोजनांबाबत दिरंगाई होत असल्याने महाडकर नागरिक आक्रमक झाले असून शुक्रवारी (दि. 4) सकाळी नागरिकांच्या वतीने महाड प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महाड शहरात सातत्याने पूर येत असल्याने व्यापारी आणि नागरिकांचे मोठे नुकसान …
Read More »कळंबोलीतील विशाखा कुरूप ठरल्या ‘फेस ऑफ दि इयर’
पनवेल : वार्ताहर कळंबोली येथे राहणार्या विशाखा अरुण कुरूप हिने जयपूर येथे आयोजित स्पर्धेत मिस इंडिया 2021चा फेस ऑफ दि इयर हा पुरस्कार पटकाविला. त्यामुळे त्यांचे नाव देशभरात पोहचले आहे. जयपूर येथे फॉरेव्हर स्टार इंडिया अॅवॉर्ड्सच्या माध्यमातून हॉटेल मेरिएटमध्ये नॅशनल लेव्हलवर चार दिवसीय मेगा ब्युटी आणि अॅवॉर्ड या कार्यक्रमाचे आयोजन …
Read More »पनवेलच्या ‘करूणेश्वर’ला मदतीचा हात
पनवेल : वार्ताहर पनवेलच्या गीतांजली ग्राहक संघाचा निधी वितरणाचा कार्यक्रम काश्यप हॉलमध्ये झाला. या वर्षी अलिबाग येथील गोपालन संस्थेला 71 हजार रूपये आणि पनवेलजवळील करूणेश्वर ओल्ड एज केअर हाऊस या संस्थेला 25 हजार रुपये निधी देण्यात आला. निधीचे धनादेश डॉ. समिधा गांधी व डॉ. ययाती गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »नवी मुंबईतील 19 पोलिसांना बढती
पनवेल : वार्ताहर राज्यातील 453 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस महासंचालक अस्थापना संजीवकुमार सिंघल यांनी बुधवारी (दि. 2) दिले आहेत. यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस दलातील 19 सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. बढती मिळाल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाबरोबरच मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper