उरण ः वार्ताहर उरण शहरात पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 3) शरण्या यु-डायरेक्टर पोस्टल सर्व्हिस नवी मुंबई विभाग यांच्या हस्ते झाले. शहरातील कोटनाका येथील पोस्ट कार्यालय जीर्ण व मोडकळीस आल्याने हे पोस्ट कार्यालय काही महिन्यांपासून जेएनपीटी टाऊनशिप येथे स्थलांतरीत झाले होते. त्यामुळे उरण शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत …
Read More »Monthly Archives: March 2022
चिंध्रण गावात साकारतोय सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
सरपंच कमला देशेकर यांचे प्रयत्न कळंबोली : वार्ताहर सरपंच कमला एकनाथ देशेकर यांच्या दूरदृष्टीतून चिंध्रण गावातील संडपाण्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प लवकरच कार्यरत होत आहे. त्यामुळे गावातील साथीच्या रोगांना आळा बसणार आहे. यामुळे गावातील महिलावर्गात उत्साहाचे वातावरण असून त्यांनी सरपंच कमला देशेकर यांचे अभिनंदन केले आहे. सांडपाण्यामुळे सर्वत्र पाणीच पसरत असून …
Read More »कर्नाळा परिसरात वेगाला बसणार ‘ब्रेक’
आरटीओच्या सेफ्टी व्हेईकलची नजर; विशेष उपाययोजना सुरू पनवेल ः वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेलनजिक असलेल्या कर्नाळा अभयारण्य परिसरातून भरधाव वेगात जाणार्या वाहनांना आता ब्रेक लागणार आहे. कारण या वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी आरटीओची नजर असणार आहे. वार्याच्या वेगाने धावणार्या वाहनांवर आता रोड सेफ्टी व्हेईकलच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. यासाठी आरटीओने …
Read More »पाली बसस्थानकाची पुनर्बांधणी खोळंबली
अष्टविनायक क्षेत्र व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली येथील बसस्थानक देखणे व सुसज्ज असणे अपेक्षित होते. मात्र प्रदीर्घ प्रतीक्षा व पाठपुराव्यानंतर मंजूर झालेल्या या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम आजही रखडले आहे. जीर्ण आणि जर्जर झालेल्या पाली बस स्थानकाची इमारत जवळपास वर्षभरापुर्वी पाडण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी नवीन इमारतीच्या पुनर्बांधणीस व …
Read More »रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी बाईक रॅली
अलिबाग ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा वाहतूक शाखा तसेच रायगड बाईकर्स फेस्टिव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक अशोक दुधे …
Read More »नाला बंदिस्त करण्याची भाजपची मागणी
नवी मुंबई ः प्रतिनिधी सिवूडस दारावे सेक्टर 27 येथील नैसर्गिक नाल्याची साफसफाई करून नाल्याच्या बाजूला जाळी बसवावी, अशी मागणी भाजप नवी मुंबई युवा मोर्चा महामंत्री रणजित नाईक यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. या नाल्याच्या परिसरात नागरी वसाहत आहे. येथील वंडर पार्कच्या मागून वाहत जाणार्या या नाल्यातील …
Read More »नामुष्कीचे प्रयोग
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी जो काही प्रकार घडला, त्याने महाविकास आघाडी सरकारची उरलीसुरली अब्रूही गेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोणत्याही सुजाण नागरिकाची मानही खाली गेली असेल. महाराष्ट्रावर कुठली ना कुठली नामुष्की वारंवार का ओढवते याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे. गेले 28 महिने हे सरकार आपापल्या खुर्च्या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खारघर कार्निवलचे उद्घाटन
20 मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांची मेजवानी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथे भारतीय जनता पक्षातर्फे खारघर कार्निवल 2022चे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 2) झाले. या कार्निवलमध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृतीसह सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद, तर लहान मुलांना विविध …
Read More »युक्रेनमधून रायगडचे 10 विद्यार्थी सुखरूप घरी परतले
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले. यातील 10 विद्यार्थी जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत. त्यांनी रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाचा थरारक अनुभव घेतला आहे. आणखी आठ विद्यार्थी रोमानियात, तर सात हंगेरीत दाखल झाले आहेत. हे विद्यार्थी शुक्रवारी (दि. 11) भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. आर्यन पाटील, अभिजीत थोरात, …
Read More »शुक्रवारपासून बारावीची परीक्षा
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा शुक्रवार (दि. 4)पासून सुरू होत असून ती 30 मार्चपर्यंत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचल्यावर बोर्डातर्फे देण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. बारावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये …
Read More »