नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र तुर्भे कॉलनीतील काही रहिवाशांनी या अभियानाला हरताळ फासले आहे. महापालिकेच्या वतीने घंटागाडी तुर्भे गावात सकाळ आणि संध्याकाळ या दोन सत्रात कचरा घरोघरी जाऊन संकलन करते. तरीही काही नागरिक रात्रीच्या वेळी कचरा रस्त्याच्या कडेला टाकत आहेत. …
Read More »Monthly Archives: March 2022
सिद्धिविनायक मंदिर समितीचा प्रश्न चिघळणार
आगरी समाजाचा आंदोलनाचा एल्गार पेण ः प्रतिनिधी मुंबई प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे आगरी समाजाच्या देऊबाई पाटील यांनी 1801 साली बांधलेले असताना या मंदिराच्या व्यवस्थापन समितीवर याच आगरी समाजाला डावलून परस्पर परप्रांतीयांना स्थान दिले जात आहे. याविरोधात आता आगरी समाज कमालीचा आक्रमक झाला आहे. शुक्रवारी (दि. 25) मुंबईतील …
Read More »दहिगाव बौद्धवाडीत भीषण पाणीटंचाई
आमरण उपोषणाचा इशारा; बीडीओंना निवेदन पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील दहिगाव बौद्धवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे गटविकास अधिकारी विजय यादव यांना निवेदन देण्यात आले आहे. काही दिवसांत येथील पाणी प्रश्न सुटला नाही, तर 7 एप्रिलला ग्रामस्थांसह रिकामे हंडे घेऊन पंचायत …
Read More »वढाव-बोर्झे खारभूमी योजनेला लवकरच नवीन ठेकेदार; तहसीलदारांचे आश्वासन
पेण ः प्रतिनिधी पाच वर्षांपासून रखडलेल्या वढाव-बोर्झे खारभूमी योजनेच्या कामासाठी नवीन ठेकेदार निवडण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू झाली आहे. या योजनेसाठी एप्रिलमध्ये नवीन ठेकेदार नेमण्यात येईल असे आश्वासन पेण तहसीलदारांनी दिल्याने मोठे वढाव ग्रामस्थांच्या मागणीला यश आले आहे. वढाव-बोर्झे खारभूमी योजना नादुरुस्त झाल्याने खारे पाणी शेतात शिरून वारंवार शेतीचे नुकसान …
Read More »खालापुरात भव्य सामुदायिक विवाह सोहळा; 70 जोडप्यांचे शुभमंगल सावधान
खालापूर : रामप्रहर वृत्त वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र आणि केप्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 27) खालापूर तालुक्यातील वाशिवली वाडी साई नगर येथे जनजाती समाजातील 75 जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात झाला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्री ग्लोबल कॅपिटल लि.चे विश्वस्त बेनी प्रसाद राऊका, सीएसआर नीता जोशी, …
Read More »रायगडातील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल!
समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी पसंती पाली : प्रतिनिधी कोकणातील मुंबई व पुण्याजवळचा जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य व मनमोहक गारवा देणार्या स्थळांना पर्यटक मोठी पसंती देत आहेत. त्यामुळे सागरी किनारे व अन्य पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. शनिवार व रविवार सलग लागून आलेल्या सुट्यांमध्ये पर्यटक एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडतात. …
Read More »फ्रान्सच्या परिवहनमंत्र्यांची जेएनपीएला भेट
भारत-फ्रान्सदरम्यान बंदर व्यापार संबंध होणार मजबूत उरण : प्रतिनिधी फ्रान्सचे परिवहनमंत्री जॉन बातिस्ते जेब्बारी यांनी रविवारी (दि. 27) जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) या भारतातील प्रमुख कंटेनर बंदरास भेट दिली. या भेटीमुळे भारत-फ्रान्स यांच्यातील जमीन, हवाई आणि सागरी वाहतूक व बंदर व्यापार संबंध अधिक मजबूत होणार आहेत. आपल्या भेटीदरम्यान फ्रान्सच्या …
Read More »भारतीय वस्तूंना जगभरात वाढती मागणी
पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 27) मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी भारताने 400 अब्ज डॉलर्सचे निर्यातीचे ध्येय गाठले आहे. हे भारताच्या क्षमतेला दर्शवते. याचाच अर्थ जगभरात भारतीय वस्तूंची मागणी वाढत आहे, असे सांगितले. पंतप्रधान …
Read More »मिस्टर युनिव्हर्स शरीरसौष्ठव स्पर्धेत अलिबागचे तीन बॉडी बिल्डर करणार भारताचे प्रतिनिधित्व
अलिबाग : प्रतिनिधी सध्या अलिबाग तालुक्यातील अनेक तरुण-तरुणी आपले नाव सातासमुद्रपार घेऊन जात आहेत. त्यात आता तालुक्यातील तीन बॉडीबिल्डर्सची आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने अलिबागकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुणे येथे होणार्या 15 ते 17 एप्रिलदरम्यान मिस्टर युनिव्हर्स या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी अलिबाग तालुक्यातील जयेंद्र मयेकर, …
Read More »नवीन पनवेलमध्ये राजस्थानी महिलांकडून दशामाता दिन
पनवेल ः प्रतिनिधी राजस्थानी महिलांनी रविवारी नवीन पनवेलमधील विचुंबे पुलाजवळ असलेल्या पिंपळाची पूजा करून त्याला दोरा गुंडाळून दशामाता दिन साजरा केला. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमीला बिहार आणि राजस्थानमध्ये दशामाता पूजा केली जाते. दहाव्या दिवशी महिला पारंपरिक पोशाख करून पिंपळा समोर पतवाढीची पूजा करतात. नंतर पिंपळाला सात प्रदक्षिणा मारून त्याला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper