उरण : प्रतिनिधी उरण नगर परिषद प्रशासनाने लवकरच मान्सून पूर्व नाले सफाईला प्रारंभ केला आहे. शहरातील दादर, कुंभारवाडा, कामठा, भिवंडीवाला गार्डन या मुख्य नाल्यांची सफाई ही ठेकेदारामार्फत करण्यात येत आहे. दरवर्षी उरण नगर परिषद मे अखेरिस मान्सूनपूर्व नाले सफाई करण्याची कामे हाती घेत असते, मात्र मागील वर्षी 2021च्या मे महिन्यात …
Read More »Monthly Archives: May 2022
वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे खारघर
भाजपकडून महावितरणकडे आंदोलनाचा इशारा खारघर : रामप्रहर वृत्त उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच गेल्या काही दिवसांपासून खारघर-तळोजा शहरामध्ये वेळीअवेळी वीजपुरवठा कोणत्याही पूर्वसूचना न देता खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कारभार उन्हाळ्यामध्ये नियोजन शून्य झालेला असून आठवड्यात अनेक …
Read More »कोळी बांधवांच्या समस्या सोडविणार
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री भगवंत खुबा यांचे आश्वासन पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यासह कोकणातील बहुतांश लोक उदरनिर्वाहासाठी मत्स्यव्यवसायावर अवलंबून आहेत, मात्र आजघडीला या घटकासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. कोळी बांधवांच्या अडचणी व त्यांना उद्भवणार्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियममंत्री भगवंत खुबा यांनी दिले. आमदार रमेश पाटील, चेतन …
Read More »राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बुधवारी लोणेरेत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात दीक्षांत समारंभ माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात बुधवारी (दि. 11) सकाळी 11 वाजता 24वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी भूषविणार आहेत. समारंभास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी …
Read More »महिलेचा विनयभंग करणार्यावर गुन्हा दाखल
पनवेल : वार्ताहर मेंढ्या चारण्यासाठी घेऊन जात असलेल्या एका महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्त्य करून तिचा विनयभंग केला. या वेळी महिलेने आरोपीस धक्का दिला असता झालेल्या झटापटी मध्ये महिलेच्या गळ्यातील डोरली तुटून नुकसान झाले. त्याबद्दल संबंधित व्यक्तीविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिला …
Read More »आंब्याच्या दुकानाला आग
जिवीतहानी नाही, मात्र मोठे नुकसान पनवेल : वार्ताहर शहरातील एका आंब्याच्या दुकानाला अचानकपणे लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या जवळील जय भारत नाक्यावरील एका आंब्याच्या दुकानाला सोमवारी (दि. 9) रात्री आग लागली. या आगीची माहिती मिळताच पनवेल महानगर पालिकेच्या अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी आली व जवानांनी …
Read More »आपले कर्तव्य बजावताना सतर्क राहा
पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांचे पोलीस पाटलांना आवाहन पनवेल : वार्ताहर पोलीस पाटील हे खर्या अर्थाने त्या गावाचे पोलिसच असतात त्यामुळे त्यांनी आपले कर्तव्य बजावताना सतर्क राहणे गरजेचे आहे. गावात काय चाललेय याची माहिती वेळोवेळी घेऊन काही गोष्टी समाज विघातक असल्यास त्याची माहिती नजीकच्या पोलिसांना द्यावी, असे आवाहन परिमंडळ 2 …
Read More »माडप येथे आरोग्य तपासणी, दाखले वाटप शिबिर
खोपोली : प्रतिनिधी आदिवासी सप्तसूत्री व कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत माडप येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खालापूर तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून आदिवासी महिलांसाठी दाखले वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिबिराची सुरुवात करण्यात आली. लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या …
Read More »कर्जतमध्ये महापुरुषांच्या नावाच्या पाट्या
कर्जत : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तब्बल 50 लाख खर्चून कर्जत शहरात महापुरुषांच्या नावांचे 190 फलक लागले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानमध्ये मोठे नामांकन मिळविण्यासाठी कर्जत शहराचे हे बदललेले रूप महत्वाचे ठरणार आहे. कर्जत शहरात आलेल्या नवख्या माणसाला निश्चित स्थळी जाण्यासाठी उपयोग व्हावा, यासाठी पालिकेने केलेल्या कामाचे …
Read More »कोंढाणे धरणाच्या पाणीवाटपावरून तिढा
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथे उल्हास नदीवर मोठे धरण बांधण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे, मात्र या धरणातील पाणी राज्य शासनाने नवी मुंबईमधील नैना गृहप्रकल्पांसाठी सिडकोला देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जत तालुक्याजवळ असलेले मोरबे धरण नवी मुंबई महानगरपालिकेला विकल्यानंतर तेथे असलेल्या नदीमध्ये नवी मुंबई महापालिका एक थेंबदेखील पाणी सोडत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper