खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत सोमवारी सकाळी (दि. 9) मुंबईला जाणारा एक टँकर पुण्याकडे जाणार्या लेनवरील दोन कारना धडकून उलटला. या अपघातात एका कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्हीकडील वाहतूक थांबविण्यात आल्याने एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगाच रांगा दिसून आल्या. मिळालेल्या माहितीनुसार गॅस भरलेला टँकर …
Read More »Monthly Archives: May 2022
रयत शिक्षण संस्थेच्या विकासात भरीव योगदानाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीयांचा हृद्य सत्कार
सातारा : हरेश साठे ज्ञानाच्या आधाराशिवाय प्रगती होत नाही. म्हणून ती संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे हे उद्दिष्ट पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे राहिले. त्यामुळेच रयत शिक्षण संस्था देशातील एक नंबरची संस्था झाली असून लोकनेते रामशेठ ठाकूर या संस्थेच्या कार्याला मदतीचा हात खुला करून देत असतात, असे प्रतिपादन रयत शिक्षण …
Read More »काँग्रेसमधील खदखद
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे, मात्र काही ना काही कारणांवरून या आघाडी सरकारमध्ये धुसफूस दिसून येते. एकेक राज्य काँग्रेसच्या हातून निसटून जात असताना या पक्षाने विचारधारा, ध्येय-धोरणे बाजूला सारून महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेचा वाटा स्वीकारला, मात्र इथेही परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नाही. …
Read More »कळमजे नदीवरील पूल धोकादायक
माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कळमजे गावच्या फाट्यावर असणारा गोद नदीवरील पूल दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याने पावसाळ्यात या नदीला मोठा पूर येतो. त्यामुळे या महामार्गावरून जाणारे वाहनांना धोका होण्याचा संभव आहे. दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीत हा पूल कमकुवत असल्याने शासनाकडून महामार्गावरील वाहतूक बंद केली जाते. ही वाहतूक रत्नागिरी, महाड, माणगाव बाजू …
Read More »जंजिर्यावर पर्यटकांसाठी जेट्टीची गरज
किल्ल्याचा चढ-उतार सुलभ होण्यासाठी मागणी मुरूड : प्रतिनिधी मुरूड राजपुरी येथे असणारा जंजिरा किल्ला हा संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असा किल्ला आहे. दरवर्षी हा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागामधून लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. 13 शिडाच्या होड्या तर दोन मशीन बोटीद्वारे या किल्ल्यावर पर्यटकांना पोहचवण्याचे काम केले जाते. किल्ल्यावर …
Read More »महाड भाजप महिला मोर्चातर्फे मातृदिनानिमित्त पोषण आहार वाटप
महाड : प्रतिनिधी जागतिक मातृदिनाचे औचित्य साधुन रविवारी (दि. 8) महाड भाजप महिला मोर्चाच्या वतीने आदिवाडीवरील मातांना पोषण आहार वाटप करण्यात आला. या वेळी जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर सह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. आदिवाड्यावरील माता आणि बालकांना आजही पोषण आणि संतुलीत आहार मिळत नाही. आदिवासींच्या वाट्याचे अन्न धान्य मोठ्याप्रमाणात काळ्या …
Read More »पनवेलमध्ये साकारतेय ऑक्सि पार्क; सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका आणि कोशिश फाऊंडेशनच्या माध्यमातून शहीद भोसले पेट्रोल पंपासमोरील जागेत ऑक्सि पार्क उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन महापालिका सभागृह नेते तथा कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) झाले.पनवेल शहरातील शहीद भोसले पेट्रोल पंपासमोरील जागेची दुर्दशा झाली होती. या संदर्भात आमदार …
Read More »महाडमध्ये आठ लाखांचा गुटखा जप्त
चार जणांना अटक महाड : प्रतिनिधी महाड तालुका आणि ग्रामीण भागात बेकायदेशीर गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती महाड पोलिसांना मिळाली होती. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर आणि बिरवाडी परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या छाप्यात सुमारे आठ लाख रुपयाचा गुटका जप्त करण्यात आला. त्याच बरोबर चार …
Read More »रयत शिक्षण संस्थेची डिजिटल शिक्षणामध्ये सरस कामगिरी; चेअरमन डॉ. अनिल पाटील यांचे प्रतिपादन
सातारा ः हरेश साठे कोरोनाने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आव्हाने निर्माण केली. असे असले तरी रयत शिक्षण संस्थेने या आव्हानांना सामोरे जात डिजिटल शिक्षणात सरस कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी येथे केले. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीने गुणवंत रयतसेवक आणि प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा …
Read More »पनवेल देवीचा पाडा येथील शेकापच्या माजी सरपंचासह समर्थक भाजपमध्ये
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे शेतकरी कामगार पक्षाच्या देवीचा पाडा येथील माजी सरपंच सविता फडके आणि रामदास फडके …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper